Saturday, December 25, 2021

पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत कराड शहरातील विविध रस्ते कामांचा शुभारंभ...

वेध माझा ऑनलाईन
कराड
नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या रस्ते कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे त्या माध्यमातून पालिकेचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत येथील विविध रस्ते कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला...

यामध्ये देशपांडे कॉलनी व पारगावकर कॉलनी रस्ता डांबरीकरण करणे कामाचा शुभारंभ राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत झाला त्यानंतर सूर्या कॉम्प्लेक्स दत्त चौक ते पंचायत समिती रस्ता डांबरीकरण करणे तसेच कोयना दूध कॉलनी जिव्हेश्वर मंदिर रस्ता व कोयना दूध कॉलनी अंतर्गत 3 रस्ते डांबरीकरण करणे तसेच  रणजीत टॉवर ते पंकज हॉटेल ते पूना बेंगलोर हायवे लगतचा रस्ता डांबरीकरण करणे आदीं कमाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला
यावेळी यादव गटाचे सर्व नगरसेवक नगरसेविका  तसेच कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते

No comments:

Post a Comment