Saturday, December 18, 2021

आता ग्रामीण महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव ; पुणे जुन्नरमध्ये आता ओमायक्रॉनचे तब्बल सात नवे रुग्ण...

वेध माझा ऑनलाईन
कराड
जगभरात चिंतेचा विषय ठरलेल्या ओमायक्रॉननं ग्रामीण महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. जुन्नरमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल सात नवे रुग्ण समोर आले आहेत. ओमायक्रॉनबाधित सात जणांपैकी पाच जणांनी लशींचे दोन्ही डोस घेतले होते. सातही जण 2 आणि 3 डिसेंबरला यूएईमधून परतले होते. बाधितांच्या संपर्कातील 15 जणांची तपासणी पूर्ण झाली असून अहवालाची प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागात ओमायक्रॉनने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेबरोबरच नगरपालिका प्रशासन अधिक सतर्क झालं आहे.
महाराष्ट्रात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 40 वर पोहोचली आहे.  देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, यामधील 25 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 109 वर पोहचली आहे.

No comments:

Post a Comment