Thursday, December 30, 2021

मुंबई लॉक डाऊनच्या उंबरठ्यावर ?

वेध माझा ऑनलाईन
एकीकडे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांचं आयोजन केलं जात आहे, तर दुसरीकडे कोरोना  पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 3 हजाराच्या पुढे गेली आहे.

मुंबई महापालिकेच्या शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार, गेल्या 24 तासात मुंबईमध्ये तब्बल 3671 नवे रुग्ण आढळले आहे. मागील तीन दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहे. तर 371 रुग्ण आज बरे झाले आहे.
दोन दिवसांपासून मुंबईत कोरोनाबाधित संख्या वाढत आहे. मंगळवारी सुद्धा मुंबईमध्ये एकाच दिवशी कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली. एकाच दिवसात 2172 रुग्ण आढळले होते. 2172 पैकी 1377 रुग्ण एकट्या मुंबईत होते.  तर बुधवारी एकाच दिवसामध्ये कोरोनाचे 2510 नवे रुग्ण आढळून आले होते.

No comments:

Post a Comment