Thursday, December 30, 2021

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर नितेश राणें म्हणतात... "गाडलाच'... अधिकृत फेसबुक पेजवरुन नितेश राणेंची पोस्ट व्हायरल...


वेध माझा ऑनलाईन - 
संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून जिल्हा बँकेवर भाजपचाच झेंडा फडकला आहे. या निवडणूकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेकांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की, महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागले होतं. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. परंतु, त्यांच्या अधिकृत फेसबुक पेसवरुन निवडणूक निकालांसंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे. 
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जोरदार चूरस रंगली होती. महाविकास आघाडीला 4 तर, भाजपला 4 जागा मिळाल्यात. कणकवलीत अटीतटीच्या लढतीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झालेत. सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समसमान मतं मिळाल्यानं ईश्वर चिठ्ठीने निकाल जाहीर केला आणि नशिबाची साथ भाजपच्या विठ्ठल देसाईंना मिळाली. या निकालानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर नितेश राणेंच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन 'गाडलाच' या आशयाची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 

फेसबुक पोस्टमध्ये भाजप आमदार नितेश राणे सतीश सावंत यांच्या मानेवर उभे राहिले आहेत. या पोस्टरवर 'गाडलाच' असं कॅप्शन लिहिलं आहे. 





No comments:

Post a Comment