वेध माझा ऑनलाईन
कराड
घणसोली येथील शेतकरी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील 2 दिवसात या शाळेतील 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे विद्यार्थी 8 ते 12 या वयोगटातील असल्याची माहिती मिळाली आहे. उद्यापासून ही शाळा ७ दिवस बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
राज्यात शाळा सुरु झाल्यानंतर 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंतेत भर पडली आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तो मुलगा याच शाळेत येत होता. दरम्यान, या परदेशी व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
शेतकरी विद्यालयातील 800 विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट केली आहे. घरी राहिलेल्या विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट मनपा घरी जावून करणार आहे. कोरोनाची लागण झालेल्या 18 विद्यार्थ्यांवर वाशी येथील सिडको एक्झिबिशन कोरोना सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. सर्व मुलांची प्रकृती ठीक आहे. घेत आहेत या शेतकरी विद्यालयात 8 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयातील 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन चिंतेत आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांची आज कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जातेय.
No comments:
Post a Comment