Friday, September 30, 2022

कराड आरटीओ कार्यालयाचा भोंगळ कारभार !

 वेध माझा ऑनलाइन - कराड आरटीओ ऑफिसच्या मनमानी व भोंगळ कारभारा विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. पाडळी केसे येथे असलेल्या कार्यालयास विश्व इंडियन पार्टी, भिम आर्मी संविधान रक्षक दल आणि भिमशक्ती सामाजिक संघटनेने 13 सप्टेंबर रोजी निवेदन दिले होते. त्यामध्ये 9 मुद्दे उपस्थित करून 15 दिवसात विचार करण्यास सांगितले होते. परंतु त्यावर कोणतेही उत्तर न मिळाल्याने आरटीओ ऑफीसच्या दारात आमरण उपोषण सुरू केले आहे.

संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरटीओ कार्यालय एजंट मुक्त करावे, जी फाॅर्मच्या नावाखाली अधिकारी एजंटाच्या माध्यमातून जनतेची लूट करीत आहेत, ती थांबवावी, कर्मचाऱ्यांनी नियमित ओळखपत्र गळ्यात घालावे, गेले 4 ते 5 वर्षे एआरटीओ पद रिक्त असून ते त्वरित भरावे. सुपने ते पाडळी रस्त्यावर लोकांना ऑफिसमध्ये रस्ता क्राॅस करतेवेळी ठोस उपयायोजना नसल्याने वारंवारं अपघात होत आहेत. पूर्वी झालेल्या बोगस पावती घोटळ्याचे काय झाले, हे सविस्तपणे जनतेसमोर उघड करावे. कार्यालयात अनेक कर्मचारी वेळेवर येत नाहीत, त्यामुळे थम मशीनद्वारे हजेरी घ्यावी. कार्यालयात पूर्णपणे अस्वच्छता असून दुरावस्था झाली आहे. त्यांची दुरूस्ती करावी.तिन्ही संघटनांनी दिलेल्या निवेदनावर विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे, भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम थोरवडे यांच्या स्वाक्षरी आहेत. याबाबतचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आले आहे.  



आजपासून 5 जी सेवा सुरू...देशासाठी मोठा क्षण...

वेध माझा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5G सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. भारतात कर्मशियल 5G सेवेला आजपासून सुरुवात झाली आहे. १३ शहरांपासून या सेवेची सुरुवात होणार आहे. यासाठी खास मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल उपस्थित आहेत.देशातील काही मोजक्या 13 शहरात या सेवेची सुरुवात होणार आहे. देशासाठी हा सर्वात मोठा क्षण आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी जाहीर ; आता लवकरच पालिका निवडणुकांचेही बिगुल वाजणार!

वेध माझा ऑनलाईन - जिल्हा परिषदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे त्यामध्ये राज्यातील केवळ 9 ठिकाणी खुल्या गटासाठी आरक्षण पडले आहे तर 11 ठिकाणी महिलासाठी राखीव प्रवर्ग राहिला आहे आता सर्वांना पुढील अध्यादेशाची प्रतीक्षा आहे
दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे आता लवकरच प्रलंबित पालिका निवडणुकांचेही बिगुल वाजणार असे संकेत मिळत आहेत

याबाबतचे राजपत्र राज्यसरकारने रात्री उशिरा जाहीर केले आहे. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करत अनेकांना धक्का दिला आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. राज्यात केवळ रत्नागिरी आणि सातारा येथेच ओबीसी महिला आरक्षण पडले आहे.दरम्यान, प्रलंबित असणाऱ्या पालिका निवडणुकांचेही लवकरच बिगुल वाजतील असे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत
 
 

कराड पालिकेच्या प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून खास दखल ...ब्ल्यक फ्लाय सोल्जर प्रकल्पाचे कौतुक...

वेध माझा ऑनलाइन - मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर शासनाच्या नगर विकास विभागाने स्वच्छ सर्वेक्षण 2022 मधे बक्षीसपात्र महापालिका व नगर परिषदांनी या अभियानात केलेल्या विविध उपक्रमांचे प्रदर्शन आयोजित केले होते. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनात कराड नगरपालिकेच्या स्टालला भेट देऊन पाहणी केली. तसेच कराड पालिकेच्या ब्लॅक फ्लाय सोल्जर या प्रकल्पासह विविध प्रकल्पांची खास दखल घेतली. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता झाले. या प्रदर्शनात पुणे,उल्हासनगर,नागपुर,नवी मुंबई,अहमदनगर या महा पालिकांबरोबर कराड,सिन्नर,वाई सिन्नर व दौंड या नगर परिषदांचा सहभाग होता.उद्घाटनानंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक कक्षाला भेट देवुन विविध उपक्रमांची माहीती घेतली.

कराड नगर परिषदेच्या कक्षात एसटीपी प्लांट,बायोगॅस,मेडीकल वेस्ट,कचरा वर्गीकरण.ब्लॅक सोल्जर फ्लाय या उपक्रमांच्या प्रतिकृती ठेवल्या होत्या. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी कराड नगर परिषदेच्या कक्षाला भेट देवुन विविध उपक्रमांची सविस्तर माहीती घेताना ब्लॅक सोल्जर फ्लाय या ओला कचरा निर्मुलनात वैशिष्ठ्यपुर्ण ठरलेल्या उपक्रमात विशेष रस दाखविला. यावेळी त्यांना या उपक्रमाची सविस्तर माहीती मुख्याधिकारी रमाकांत डाके व प्रोजेक्ट इनचार्ज सुधीर एकांडे यांनी दिली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल,नगर विकास सचिव मोपलवार,स्वच्छ सर्वेक्षणचे प्रमुख सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या महापालिका व नगर परिषदांनी कचरा निर्मुलनात बीएसएफ या नाविन्यपुर्ण उपक्रमाचा अंगिकार करावा असे अवाहन केले.पालिकेचे अधिकारी शुभांगी पवार गणेश जाधव, सुधीर खर्जुले, प्रमोद जगदाळे, अमित कांबळे, पुनम गव्हाणे, आनंद डांगे, श्रीकांत लोहार, सुजित साळुंखे, प्रताप पाटील, सुधीर एकांडे यावेळी उपस्थित होते.

मल्लिकार्जुन खर्गे यांचा काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल ; आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिगग्ज उपस्थित...

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस अध्यक्ष पदासाठी आज दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, खा. मुकुल वासनिक, अविनाश पांडे हे महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते
या स्पर्धेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव घेतले जात होते शशी थरूर यांनीही निवडणूक अर्ज मागवला होता तर गेहलोत यांचे नाव याच पदासाठी सर्वात पुढे होते पण त्यांनी स्वतःचे मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी केलेले राजकीय नाट्य बरेच चर्चेत राहीले या चर्चा आजही ताज्या असतानाच आता मल्लिकार्जुन खरगे हे नाव या पदासाठी पुढे आले आहे त्यांनी आजच या निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवत होणाऱ्या या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला आहे 

सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 6 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे 12 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 3 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 0 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 1 वाई 0 व इतर 2
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 6 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 12 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

Thursday, September 29, 2022

कराडचे युवा नेते अतुल शिंदें, पोपटराव साळुंखे, आणि सागर बर्गें यांची शंभू स्मारकासाठी लाखाची मदत...



वेध माझा ऑनलाइन - 
येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणीस जिल्हाधिकाऱयांनी मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर या स्मारकाच्या उभारणीसाठी निधी संकलन करण्यावर भर देण्याचा निर्धार स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीने केला आहे. स्मारक प्रतिकृतीच्या अनावरणप्रसंगी माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी 1 लाख 11 हजार 111 रूपयांची देणगी जाहीर केली तर, स्मारक प्रतिकृती अनावरण कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी शिवराज ढाबातर्फे 1 लाख 11 हजार 111 रूपयांची मदत जाहीर केली. तर मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे यांनी देखील 1 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे

येथील अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये या स्मारकाच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. स्मारक उभारण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने कराड शहर व तालुक्यात शिव-शंभूप्रेमींकडून प्रयत्न करण्याची ग्वाही देण्यात आली. स्मारक समितीने यापूर्वीच कराड तालुक्यात शंभू स्मारक संवाद यात्रा सुरू केली आहे. त्यामाध्यमातून निधी संकलन करण्यात येत आहे.  
दरम्यान, माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी आपल्या दातृत्वाचा परिचय करून देत याच कार्यक्रमात स्मारकासाठी 1 लाख 11 हजार 111 रूपयांची देणगी जाहीर करत ती समितीकडे सुपुर्द केली. तर स्मारक प्रतिकृती अनावरण कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी शिवराज ढाबातर्फे 1 लाख 11 हजार 111 रूपयांची मदत जाहीर केली. तर मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे यांनी देखील 1 लाख रूपयांची मदत जाहीर केली

समितीच्या वतीने रणजितनाना पाटील यांनी त्यांचे आभार मानले.  
स्मारक उभारणीसाठी लोकसहभाग महत्वाचा असून शहरासह गावोगावच्या शिव-शंभूप्रेमींनी निधी संकलनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन रणजितनाना पाटील यांनी यावेळी केले.  


अविवाहित महिलांनाही 24 आठवड्यांपर्यंत मिळेल गर्भपाताचा अधिकार...सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय:

वेध माझा ऑनलाइन - गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज (29 सप्टेंबर 2022) रोजी ऐतिहासिक निकाल दिला आहे. विवाहित किंवा अविवाहित सर्व स्त्रियांना गर्भ राहिल्यापासून 24 आठवड्यांपर्यंत कायदेशीररित्या सुरक्षित गर्भपात करता येऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. याच निकालादरम्यान सर्वोच्च न्यायालयानं वैवाहिक बलात्काराविषयीही मत नोंदवलं आहे. महिलेच्या मनाविरुद्ध नवऱ्याने संबंध ठेवल्यामुळे गर्भधारणा झाल्यास त्याला वैवाहिक बलात्कार मानता येईल, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ‘लाईव्ह मिंट’ ने याबाबतचे सविस्तर वृत्त दिलं आहे.

“महिलेचं लग्न झालं आहे किंवा नाही, या आधारावर तिचा गर्भपात करण्याचा अधिकार हिरावून घेता येऊ शकत नाही. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अ‍ॅक्टच्या (MTP) अंतर्गत एकल माता किंवा अविवाहित महिलांना गर्भधारणेपासून 24 आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येऊ शकतो. गर्भपाताच्या कायद्याच्या आधारे विवाहित व अविवाहित महिलांमध्ये भेद करणं कृत्रिम व घटनाबाह्य आहे, ” असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, जे. बी. पर्डीवाला, ए. एस. बोपण्णा यांनी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अ‍ॅक्टच्या व्याख्येबाबत महत्त्वाचा निकाल दिला. एमटीपी कायद्याच्या सोयीस्कर अर्थ लावून गर्भधारणेपासून 24 महिन्यांपर्यंत गर्भपात करण्याच्या अधिकारात विवाहित व अविवाहित महिलेमध्ये भेदभाव करणारा आधी दिलेला निर्णय 23 ऑगस्ट 22 ला या खंडपीठानं बदलला होता. एमटीपी कायद्यानुसार पतीने केलेल्या लैंगिक अत्याचाराला वैवाहिक बलात्काराच्या क्षेणीत गृहित धरता येत असल्याने गर्भपाताच्या कायद्याअंतर्गत असलेली बलात्काराची व्याख्याही बदलली पाहिजे, त्यात वैवाहिक बलात्काराचा समावेश केला पाहिजे, असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. त्यामुळे अशा महिलांना गर्भपाताचा अधिकार मिळेल.

सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 6 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे 5 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 3 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 3 वाई 0 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 6 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 5 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

रयत कारखान्यात वीज, इथेनॉल प्रकल्प सुरू होणार ; ऍड उदयसिंह पाटील

वेध माझा ऑनलाइन - रयत सहकारी साखर कारखान्यास अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने चालवताना कराड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांचा विश्वास संपादन करण्यात यश आला. या जोरावर पुढील गळीत हंगामा पासून रयत कारखान्यात गाळप क्षमता विस्तारणीकरणा बरोबर वीज, इथेनॉल, आसवणी प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती चेअरमन ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी बोलताना दिली.

शेवाळेवाडी- म्हासोली (ता.कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याची 26 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्हा.चेअरमन आप्पासाहेब गरुड, अथणी -रयतचे युनिट हेड रवींद्र देशमुख, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, शामराव पतसंस्थेचे चेअरमन बळवंत पाटील, प्रा.धनाजी काटकर, हणमंतराव चव्हाण, सभेस कारखान्याचे संचालक बाजीराव शेवाळे, पी. बी. शिंदे, प्रशांत पाटील, अर्जुन पवार, आनंदराव पाटील, आत्माराम देसाई, शशिकांत साठे, जयवंतराव बोन्द्रे, विजया माने, माजी सभापती प्रदीप पाटील, किसनराव जाधव कारखान्याचे सभासद,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ऍड. उदयसिंह पाटील म्हणाले, 
रयत कारखाना उभारणी पाठीमागे संस्थापक काकाचा जो उद्देश होता, तो सफल होताना दिसत आहेत. आज आपल्यात काका नाहीत, मात्र त्याचे विचार जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. गेली 50 वर्षे काकांनी सहकार, समाजकारण, राजकारणाला मार्गदर्शन केले. रयत कारखाना सारख्या संस्था उभारल्या अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने येत्या हंगामापासून गाळप क्षमता विस्तारीकरण, वीज प्रकल्प उभारणी होणार आहे. रयत बीओटी तत्वावर इथेनॉल व आसवणी प्रकल्प कार्यन्वित करणेसाठी प्रयत्नशील आहे.




माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा एकनाथ शिंदेबाबत मोठा गौप्यस्फोट...काय म्हणाले...?

वेध माझा ऑनलाइन -  शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी सरकार स्थापन केले. यानंतर मागच्या दोन महिन्यात महाविकास आघाडीतील नेते, भाजप, शिंदे गट असा नवा वाद सुरु झाला आहे. या राजकीय धुमशानात नेते मंडळी जुन्या गोष्टी बाहेर काढत गौप्यस्फोट करत आहेत. दरम्यान राज्याच्या राजकारणाला आता नवे वळण आले आहे. माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी टाकलेल्या राजकीय गुगलीने एकनाथ शिंदे यांना पेचात टाकले आहे.

माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले कि, राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसेच हा प्रस्ताव चक्क सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन आल्याचे बोलले जात आहे. यामुळे अशोक चव्हाण यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे. 

मागच्या दोन महिन्यात एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. दरम्यान ते यावर काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे.
चव्हाण पुढे म्हणाले  कि, 2019 मध्ये युतीमध्ये निवडणूक लढवून बहुमत मिळालेले असतानाही शिवसेनेने शेवटी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत येऊन सरकार स्थापन केले. या घटनेने राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसला; पण आता भाजपसोबत राहायचे नाही, ही शिवसेनेची भुमीका त्यापूर्वी म्हणजे देवेंंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळातच झाली होती.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठनेते ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझी, माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असे चव्हाण यांनी सांगितले.

अशाप्रकारचे सरकार स्थापन करायचे असल्यास तुम्ही आधी शरद पवार यांच्याशी चर्चा करा, असे मी या नेत्यांना सांगितले होते. परंतु, ते पवार यांना पुढे भेटले किंवा नाही, याबाबत मला नंतर काहीही माहिती नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचे स्वागत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असून, मी नांदेड जिल्ह्यात त्यांचे स्वागत करतो. नांदेडच्या विकासाचे प्रश्न नव्या पालकमंत्र्यांनी मार्गी लावावेत, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.




Wednesday, September 28, 2022

सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 13 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे 7 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 1 खंडाळा 0 खटाव 1कोरेगांव 5 माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 1 सातारा 2 वाई 1 व इतर 1
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 13 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 7 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

आमदार बच्चू कडूनी पोलिसासमोरच दिली कार्यकर्त्यांच्या कानशिलात ; व्हीडिओ व्हायरल

वेध माझा ऑनलाइन - आमदार बच्चू कडू त्यांच्या आक्रमक कामाच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. त्यामुळे ते लोकांमध्येही चर्चेचा विषय ठरतात. मात्र, त्यांच्या याच पद्धतीमुळे ते अनेकदा वादातही सापडले आहेत. असाच एक प्रकार अमरावतीतील जिल्ह्यात घडला आहे. अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात बच्चू कडू एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले. मात्र, तेथे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने गदारोळ झाला आणि संतापलेल्या बच्चू कडूंनी थेट आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?
गणोजातील रस्त्याच्या कामावर एका कार्यकर्त्याने गंभीर आक्षेप घेतले होते. बच्चू कडू या रस्त्याचं उद्घाटन करण्यासाठी आले असताना या कार्यकर्त्याने हे आक्षेप बच्चू कडूंसमोरही मांडले. त्यावेळी बच्चू कडूंनी ठेकेदार आणि इंजिनियरसमोरच कार्यकर्त्याची बाजू ऐकून घेतली. मात्र, ठेकेदार रस्त्याचं काम योग्य झालं म्हणत होता, तर कार्यकर्ता कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत होता.
रस्त्याचं काम ज्या भागासाठी मंजूर झालं होतं त्या भागात रस्ता झाला नाही, असा प्रमुख आक्षेप तक्रारकर्त्या कार्यकर्त्याने केला. तसेच ज्या भागात रस्त्याचं काम झालं नाही तो कुठे गेला असा सवाल केला. यावर बच्चू कडू संतापले आणि तू मुर्खासारखे काहीही बोलतो असं वक्तव्य केलं.
यावर कार्यकर्त्यानेही बच्चू कडूंना प्रत्युत्तर देत मुर्खांना तुम्ही मुर्खात काढू नका, असं म्हटलं. त्यावर संतापलेल्या बच्चू कडूंनी तक्रारदार कार्यकर्त्याला तू पहिल्यांदा ऐकून घे, असा दम दिला. अशातच गावातील एका व्यक्तीने मध्ये हस्तक्षेप करत बोलण्याचा प्रयत्न केला असता बच्चू कडूंनी त्याच्या कानशिलात लगावली. तसेच त्यालाही शांत बस असं सांगितलं.
या घटनेनंतर कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

Tuesday, September 27, 2022

पाचगणी नगर पर‍िषद राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित ;

वेध माझा ऑनलाइन  : महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात बाजी मारली असून  सर्वोत्कृष्ट राज्याचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार आज राज्याला प्रदान करण्यात आला. यासह विविध श्रेणीतील एकूण 9 पुरस्कार राज्याला आज प्रदान करण्यात आले.
येथील विज्ञान भवनात जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2018-19 चे ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. दरम्यान, पर्यटकांना उत्कृष्ट नागरी सुविधा पुरविल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगर पर‍िषदेला राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रमुख 11 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तर उर्वरित पुरस्कारांचे वितरण केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 
पर्यटकांना उत्कृष्ट नागरी सुविधा पुरविल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील पाचगणी नगर पर‍िषदेला राष्ट्रीय पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी आणि पाचगणी चे मुख्यकार्यकारी अधिकारी गिरीष दापकेकर यांनी स्वीकारला. 

...तर मला मोदी देखील हरवू शकत नाहीत...भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे आश्चर्यकारक विधान...राज्यभर चर्चा...

वेध माझा ऑनलाइन -  मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हरवू शकत नाहीत असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडमधील अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यामित्ताने समाजातील "बुद्धिजिवी लोकांसोबत संवाद" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या.  त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. 

मी जनतेच्या मनात असले तर मोदीजीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत. काँग्रेस मध्ये वंशवादाचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा वंशवाद संपवत आहेत असे पकंजा मुंडे म्हणाल्या. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंशवाद संपवत आहेत हे सांगताना पंकजा मुंडे थोड्या थांबल्या आणि मी देखील वंशवादाचं प्रतिक असल्याचे त्या म्हणाल्या. पण मी तुमच्या मनात असेल तर मला कोणीही संपवू शकत नाही. जर जनतेच्या मनात मी असेल तर मोदीजी देखील माझं राजकारण संपवू शकत नाहीत, असं पंकजा मुंडे पुढं बोलताना म्हणाल्या. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणामध्ये आपल्याला वेगळेपण आणायचे आहे. आगामी काळात राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. परंतु, अलिकडे राजकारण हे करमनुकीचे साधन होत आहे. हे राजकारण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांना अपेक्षीत नाही. 
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी यापूर्वी देखील बोलताना अनेक वेळा नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे देखील त्यांनी या आधी म्हटले होते. त्यावेळीपासून त्यांना नेतृत्वाकडून डावलण्यात येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. ही खदखद पंकजा यांनी देखील आपल्या भाषणातून अनेक वेळा बोलून दाखवली आहे. त्यातच आता त्यांनी हे वक्तव्य केलंय.

सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 12 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे 15 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 6 खंडाळा 0 खटाव 1कोरेगांव 2 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 1 वाई 2 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 12 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 15 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.
वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 12 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे 13 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 6 खंडाळा 0 खटाव 1कोरेगांव 2 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 1 वाई 2 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 12 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 13 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या नियोजनामुळे 98 टक्के पेक्षा जास्त एफआरपी देणे शक्य झाले ; आमदार बाळासाहेब पाटील

वेध माझा ऑनलाइन - सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कारखाना वेळेत सुरू करून ऊस वेळेत गाळप करण्याचे नियोजन  कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मागील वर्षी राज्यात ऊसाचे प्रमाण जास्त असताना महाविकास आघाडी सरकारने केलेल्या नियोजनामुळे राज्यातील ऊस वेळेत गाळप झाला. तसेच पहिल्यादांच 98 टक्के पेक्षा जास्त एफआरपी देण्याचे कामही महाविकास आघाडीच्या नियोजनामुळे शक्य झाल्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 या ४९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक बजरंग पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शारदा पवार यांच्या शुभहस्ते व राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी संपन्न झाला.



MIM नेत्याचे भर रस्त्यात डोके फोडले...तिघाना अटक...

वेध माझा ऑनलाइन  : औरंगाबादेतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. MIM चे माजी नगरसेवक अज्जु नाईकवाडे यांना मारहाण करण्यात आली आहे. शहरातील चिश्तीया या भरचौकात त्यांना मारहाण करण्यात आली आहे. डोक्यात रॉड मारल्याने डोके फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे. उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुन्या वादातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. .

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर...

वेध माझा ऑनलाइन - ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांची निवड करण्यात आली आहे. 

१९५९ ते १९७३ या काळात आशा पारेख बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री राहिल्या आहेत. अभिनेत्री आशा पारेख यांनी ‘माँ’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. आशा पारेख भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. आशा पारेख यांचा मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट ‘दिल दे के देखो’ होता. हा चित्रपट यशस्वी झाला. सुमारे ८० चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेल्या आशा पारेख यांचे सर्व चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले. ज्यात ‘जब प्यार किसी से होता है’, ‘घराना’, ‘भरोसा’, ‘मेरे सनम’, ‘तीसरी मंजिल’, ‘दो बदन’, ‘उपकार’, ‘शिकार’, ‘साजन’, ‘आन मिलो सजना’ हे काही विशेष गाजलेले चित्रपट आहेत.







Monday, September 26, 2022

शिवसेना कोणाची? ; आज होणार फैसला!

वेध माझा ऑनलाइन - एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे.

शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे एकत्रित सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी करून स्थापन केलेल्या सरकारचे भवितव्य या याचिकांच्या निकालावर अवलंबून आहे.
दरम्यान, जनतेला सत्तासंघर्षाची सुनावणी लाईव्ह पाहता येणं शक्य होणार आहे. आजपासून सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. घटनापीठाच्या सुनावण्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय न्यायालयाच्या बैठकीत घेण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचं थेट प्रक्षेपण करण्यात यावं, याबाबत याचिका दाखल केल्यानंतर सुमारे चार वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्राचं प्रकरण कोर्टात कामकाजात समावेश केला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. 27 तारखेला सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राचे प्रकरण दुसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणूक आयोगाची कार्यवाही चालू ठेवायची की नाही याबाबत सुरुवातीला फैसला अपेक्षित आहे. 7 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं पुढील सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश दिले होते. त्यामुळे 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्ट महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता आहे.



वादग्रस्त विधाने करणाऱ्या तानाजी सावंत यांची हकालपट्टी करा ; नाना पटोले यांची मागणी

वेध माझा ऑनलाइन - वादग्रस्त विधान करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षण मागणी मागील अनेक वर्षापासून होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारी पातळीवर व न्यायालयीन पातळीवरही लढा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. 2014 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादि आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. आजही हा प्रश्न सुटावा व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो हे अत्यंत निषेधार्ह आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी आपला रोष व्यक्त केला.तानाजी सावंत हे सातत्याने वादग्रस्त विधाने  करुन वातावरण बिघडवण्याचे काम करत असतात. प्रसिद्धी माध्यमांबद्दलही त्यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले होते. या महोदयांनी याआधी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा केली होती.

तानाजी सावंत यांचे विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहित आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची शिंदे-फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

"ते' विधान तानाजी सावंत अनावधानाने बोलले, माफीही मागितली मग विषय संपला पाहिजे -मंत्री शंभूराज देसाई यांचे साताऱ्यात पत्रकार परिषदेत वक्तव्य...

वेध माझा ऑनलाईन - शिंदे गटातील तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई याना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत अनावधानाने बोलले, आता त्यांनी याबाबत माफीची मागितले आहे त्यामुळे हा विषय संपला पाहिजे असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल आहे ते सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

तानाजी सावंत यांनी आपल्या वक्तव्यावरून माफी मागितली आहे. मी अनावधानाने तस बोललो माझा तो उद्देश नव्हता असं म्हणत त्यांनी १०० वेळा मराठा समाजाची माफी मागितली आहे. अनावधानने चुकून त्यांच्याकडून असं वक्तव्य आलं, ते काय जाणीवपूर्वक बोलले नव्हते. आता त्यांनी माफी मागितल्यानंतर तो विषय संपला पाहिजे असं म्हणत शंभूराज देसाई यांनी या विषयावर पडदा टाकला.

काय म्हणाले होते तानाजी सावंत ?
उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणावरून भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले “मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्ष तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला.

मोठी breaking... गेहलोत काँग्रेस अध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर!; नवा ट्विस्ट आला समोर...

वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही काळापासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्ष होण्यावरून राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून गुढग्याला बाशिंग बांधून बसलेले सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करू नये यासाठी गेहलोत यांच्या ९० हून अधिक समर्थक आमदारांनी राजीनामे दिले होते. तर स्वत: गेहलोत यांनीच पायलट यांच्या नावाला काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींकडे संमती दर्शविली होती. असे असताना आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. 

राजस्थानमधील सत्ता टिकविण्यासाठी काँग्रेस हायकमांड अशोक गेहलोत यांच्या नावावर फुली मारण्याची शक्यता आहे. अशोक गेहलोत पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रेसमधून बाहेर पडू शकतात. आज  दिल्लीच्या १० जनपथ येथे बैठक होणार आहे. त्यापूर्वीच मोठी माहिती समोर येत आहे. केरळपासून जयपूरपर्यंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकाच स्वरात बोलू लागले आहेत. 
काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गेहलोत बाहेर पडल्याचे हे नेते बोलत आहेत. याचबरोबर ३० सप्टेंबरच्या आधी जे नेते निवडणुकीसाठी अर्ज दाखल करतील त्यांनाही बाहेर केले जाणार आहे. यामुळे मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, केसी वेणुगोपाल यांची नावे चर्चेत आहेत. गेहलोत ज्या पद्धतीने वागले ते पक्ष नेतृत्वाला आवडलेले नाहीय. यामुळे हायकमांडच्या अडचणी वाढल्या आहेत, असे सीडब्ल्यूसी सदस्य आणि पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. 
राजस्थानमधील घडामोडींनंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. या नेत्यांसोबत राजस्थानातील घडामोडींसह अध्यक्ष निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केके वेणुगोपाल 10 जनपथवर पोहोचले आहेत. राजस्थानचे निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीही बैठकीला हजेरी लावली आहे. राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामेश्वर दुडी हेही 10 जनपथवर आले आहेत. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

"त्या' देशद्रोह्यांवर कारवाई करा ; भाजप आणि हिंदू एकता आंदोलनाची मागणी...

वेध माझा ऑनलाईन - भारतीय तपास यंत्रणा व भारत देश या विरोधात चिथावणी देणाऱ्या विरोधात देशद्रोहाचे कलम लावून कारवाई करावी. तसेच त्या व्हिडिओ मध्ये जे देशद्रोही आहेत, त्यांची घरे बुलडोजरने पाडण्यात यावी आणि त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांनी केली आहे.

कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना हिंदू एकता आंदोलन व भाजप यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देताना भाजपाचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर यांच्यासह कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, प्रमोद शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 
निवेदनात म्हटले आहे की,  दि. 22/09/2022 रोजी राष्ट्रीय तपास यंत्रणा व दहशतवाद विरोधी पथक (महाराष्ट्र) यांच्या पथकाने संपूर्ण महाराष्ट्र व देशभरात छापे मारून दहशतवादाशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली शंभराहून अधिक व्यक्तींना अटक केली आहे.
याच संदर्भात कोंढवा (पुणे) येथे पीएफआय या संघटनेच्या कार्यालयावर छापे मारून काही व्यक्तींना अटक केले आहे. यानंतर बंड गार्डन पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेकायदा जमाव जमवून काही व्यक्तींना राष्ट्रीय तपास यंत्रणा व एटीएस विरोधात वक्तव्य करून नागरिकांना चिथावणी दिल्याचे वेगवेगळ्या व्हिडिओ मधून आमच्या निदर्शनास आले. तसेच याच व्हिडिओ मध्ये काही व्यक्ती पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचे देखील स्पष्ट होत आहे यासंदर्भात वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी बातमी देखील दिले आहेत हे चिंताजनक आहे. तरी, या सर्व प्रकारची सखोल चौकशी व्हावी.







सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...

जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे 8 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 1माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 0 वाई 0 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 1 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 8 जणांना घरी  सोडण्यात आले आह

संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीस सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मंजुरी...

वेध माझा ऑनलाइन - छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक कराडमध्ये व्हावे, अशी कराडवासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची स्थापना करून येथील जुन्या भेदा चौकात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला. त्याच्या उभारणीस आता सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी मंजुरीही दिली आहे अशी माहिती समितीचे सचिव रणजित नाना पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली 

यासाठी गेली दोन वर्षे सदर स्मारक समिती पाठपुरावा करत होती. नगरपालिकेने 16 फेब्रुवारीला ठराव करून जुन्या भेदा चौकातील जागा देण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर गेले सात महिने विविध शासकीय विभागाच्या परवानग्या मिळवल्या असून समितीने केलेल्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी 16 सप्टेंबर 2022 रोजी कराड येथील नियोजित स्मारकाच्या उभारणीस मंजुरी दिली आहे. 

यावेळी अध्यक्ष जयंत पाटील, सचिव रणजित पाटील, सदस्य एॅड. दीपक थोरात, प्रतापराव साळुंखे, प्रताप इंगवले, स्वाती पिसाळ, विद्या मोरे, भूषण जगताप यांच्यासह सर्व सदस्य पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

Sunday, September 25, 2022

गेहलोत गटाचे 92 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत ; राजस्थान मध्ये मोठं राजकीय वादळं...

वेध माझा ऑनलाइन - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, यानंतर लगेचच राजस्थानमध्ये काँग्रेससाठी राजकीय संकट उभं राहिलं आहे. गहलोत गटाचे आमदार सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या विरोधात आहेत. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यात येत असेल तर आपण सामूहिक राजीनामा देऊ, असा इशारा या आमदारांनी दिल्याचं वृत्त आहे.गहलोत गटातल्या 92 आमदारांनी राजीनाम्यावर सही केल्याच आमदार प्रतापसिह खाचरियावास यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं आहे

अशोक गहलोत यांच्या गटातील सगळे आमदार विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या घरी जात असल्याची माहितीही समोर आली आहे. 
याआधी काँग्रेस विधायक दलाच्या बैठकीसाठी दिल्लीहून पर्यवेक्षक म्हणून मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले, त्याआधी अशोक गहलोत दोन्ही पर्यवेक्षक थांबलेल्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना भेटले. या तिन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ बैठक चालली. यानंतर राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा मुख्यमंत्री निवासस्थानी आले. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही मुख्यमंत्री निवासस्थानी आले.
काँग्रेस विधायक दलाची बैठक संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार होती, पण 8.30 वाजेपर्यंत या बैठकीला सुरूवात झाली नाही. काँग्रेस आमदारांची एक वेगळी बैठक आमदार आणि मंत्री शांती धारीवाल यांच्या घरी सुरू आहे. अशोक गहलोत यांनी पुढच्या महिन्यात होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. अशोक गहलोत यांनी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलला जाण्याची शक्यता आहे दरम्यान,सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यात येत असेल तर आपण सामूहिक राजीनामा देऊ, असा इशारा या आमदारांनी दिल्याचं वृत्त आहे.तसेच गहलोत गटातल्या 92 आमदारांनी राजीनाम्यावर सही केल्याचही वृत्त आहे.

सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 13 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे 12 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 1 कराड 0 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 1माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 1 सातारा 8 वाई 1 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 13 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 12 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

मनसे आणि युवा सेनेने पाकिस्तान चा झेंडा जाळला तर, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करण्याबाबत भाजपचे निवेदन...पुण्यात वातावरण तापलं

वेध माझा ऑनलाइन - पुण्यात पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. आज पुण्यात त्याविरोधात युवासेना आणि मनसेनं आक्रमक आंदोलन करून पाकिस्तानचा झेंडा जाळला तर भाजपसह 12 हिंदुत्ववादी संघटनांनी थेट पोलीस आयुक्तालयातच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन देशद्रोहाचा गुन्हा करण्यासाठी निवेदनही दिलंय.

शुक्रवारी पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'ची एक घोषणा दिल्याचा आरोप होत आहे. यानंतर आज पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाबाजीने पुण्यातं वातावरण चांगलंच तापलं. याविरोधात युवासेना, मनसेसह भाजपही मैदानात उतरलं आहे.

पीएफआयच्या आंदोलनातील त्या एका घोषणेचा मुद्दा पुण्यात आता चांगलाच पेटलाय. याच मुद्यावरून रविवारी पुण्यात अतिशय आक्रमक आंदोलनं झाली. पहिलं आंदोलन झालं ते कलेक्टर ऑफिससमोर, तिथे युवासेनेच्या कार्यकर्त्यांची पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून फाडला. इकडे अलका चौकही मनसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी दणाणून सोडला. तिथं तर पाकिस्तानचा झेंडा एकदा नाहीतर दोनदा जाळला गेला.

सेना, मनसे ही अशी आक्रमक झाल्याचं पाहून भाजपही भाया सरसावून पुढे सरसावली त्यांनी तर चक्क पुणे पोलीस आयुक्तालयातच पाकिस्तान मुर्दाबादची घोषणाबाजी केली आणि पोलीस आयुक्तांना पीएफआयवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं. यावेळी त्यांच्यासोबत संघ परिवारातल्या 12 संघटना उपस्थित होत्या.सत्ताधारी पक्षांनीच एवढा जोर लावल्याने पोलिसांनीही त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लीप तात्काळ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून दिल्यात. तपासाअंती आवश्यक ती सर्व कलमं वाढवू, आणि दोषींवर कठोर कारवाई करू, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिलीय.

मुख्यमंत्री-गृहमंत्री काय म्हणाले?
दरम्यान कुठल्याही परिस्थितीत देशद्रोही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या घटनेनंतर म्हणाले आहेत. तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्यात पाकिस्तानचा झेंडा मनसे ने जाळला ; दिल्या हिंदुस्थान झिंदाबाद च्या घोषणा...

वेध माझा ऑनलाइन - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात देशव्यापी कारवाईनंतर पुण्यात या संघटनेच्या काही समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसेने आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते, यावेळी वंदे मातरम… हिंदुस्थान जिंदाबाद… पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी मसने कार्यकर्त्यांकडून देण्यात आली. तर काहीं जणांनी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला. तसेच पीएफआय विरोधी घोषणाबाजीही मनसेकडून करण्यात आली मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनांचीही चांगलीच धावपळ झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच या प्रकरणावरून ट्विट करत आपला संताप व्यक्त केला होता. पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे, असं राज ठाकरेंनी म्हंटल. देशद्रोह्यांचं समर्थन करत जर या पीएफआयच्या कार्यकार्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल,तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा, ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत, असं ठाकरेंनी ठणकावलं.



Saturday, September 24, 2022

मोठी breaking... पालकमंत्र्यांची नावांची यादी मुख्यमंत्री कार्यालयातून जाहीर...सातारचे पालकमंत्री म्हणून कोणाचे नाव झाले जाहीर... ?

वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार पालकमंत्र्यांची यादी जाहीर कधी करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ भाजप नेते गिरीश महाजन यांना धुळे,लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील - बुलढाणा, दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-

परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,

अतुल सावे - जालना, बीड, 

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर 

शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,

नवरात्रोत्सवात चुकीचे प्रकार झाल्यास कठोर कारवाई होणार ; हुल्लडबाजांना पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांचा इशारा ;

वेध माझा ऑनलाइन - नवरात्रोत्सवात विशेषतः महिलांनी काळजी घेवून सहभाग व्हावी. दागदागिने सांभाळून व घराबाहेर पडताना खबरदारी घेवून बाहेर पडावे. याकाळात बंद घरे चोरटे लक्ष करतात, तसेच सोन्यांच्या दागदागिण्यांवर डल्ला मारला जातो., तेव्हा नागरिकांनी व महिलांनी विशेष खबरदारी घ्यावी. महिलांच्याबाबत कोणतेही चुकीचे प्रकार झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा हुल्लडबाजांना कराड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिला आहे.

कराड येथील पोलिस भवन येथे कराड शहर पोलिस ठाण्यातील हद्दीतील मंडळाचे कार्यकर्ते व शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वाहतूक पोलिस शाखेच्या सरोजिनी पाटील, पालिकेचे नोडल ऑफिसर रफिक भालदार, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब ढेब, मनसेचे दादासाहेब शिंगण, केदार डोईफोडे, अॅड. विद्याराणी सांळुखे, विद्या मोरे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते व नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराडमध्ये सोमवारी नियोजित संभाजी महाराज स्मारकाच्या प्रतिकृतीचे अनावरण ; तालुक्यातील सर्व शिवशंभूप्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे ; रणजीत( नाना) पाटील यांचे आवाहन...

वेध माझा ऑनलाइन -  कराड शहर व तालुक्यातील  शिवशंभु प्रेमींनी कराडात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी गेले वर्षभर पाठपुरावा सुरू असून सोमवार दिनांक २६ रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर या भव्य स्मारकाच्या प्रतिकृतीचे (क्ले मॉडेल) अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती स्मारक समितीचे सचिव रणजीत पाटील यांनी दिली.

 कराड शहरातील जुन्या भेदा चौकात हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाची उंची ५५ फूट नियोजित आहे. त्यासाठी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची स्थापना करून त्या समितीच्या वतीने शासन स्तरावर सर्व विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. या स्मारक उभारणीच्या सर्व परवानगी मिळवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान हे स्मारक कसे असावे याबाबत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. त्याचे अनावरण सोमवार दिनांक २६ रोजी सकाळी११:३० वाजता अर्बन बँकेच्या शताब्दी सभाग्रहात  मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याबरोबरच स्मारक समितीने गेले वर्षभर केलेल्या कामाची माहिती तसेच नियोजित स्मारक उभारणीचा संकल्प याची माहिती कराड शहर व तालुक्यातील तमाम शिवशंभू भक्तांना व्हावी यासाठी या कार्याची चित्रफीत कार्यक्रम स्थळी उपस्थितांना दाखवण्यात येणार आहे. यात सर्व कामाचा आढावा घेण्यात येणार आहे .

कराड शहर व तालुक्यातील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या प्रतिकृतीचे अनावरण होणार आहे. कराड तालुक्यातील सर्व शिवशंभू प्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने रणजीत( नाना) पाटील यांनी केले आहे.

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक ; आजपासुन अर्ज प्रक्रिया सुरू ; "या' बड्या नेत्यांची काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एन्ट्री !

वेध माझा ऑनलाइन - आजपासून काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून प्रथमच काँग्रेस अध्यक्षपदी बिगर गांधी घराण्यातील व्यक्ती बसणार आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, मनीष तिवारी हि नावे चर्चेत असतानाच आता केरळमधील काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे देखील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. 

उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी शशी थरूर यांनी आपल्या प्रतिनिधीला निवडणूक प्राधिकरणाकडे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पाठवल आहे. शशी थरूर यांनी त्यांच्या विनंती पत्रात नामनिर्देशनपत्रांचे पाच सेट देण्याची मागणी केली आहे. शशी थरूर यांनी काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. मात्र या निवडणूक प्रक्रियेत आपण तटस्थ असू असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं आहे.
दुसरीकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेदेखील काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याने अखेर गेहलोत यांनी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं होत. त्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडण्यासही ते तयार आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांच्यातच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. १९ ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 



काँग्रेसचे प्रमुख होणे हा काय पार्ट टाइम जॉब आहे का? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल ...

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून तब्बल २४ वर्षानंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे मात्र तत्पूर्वीच G-23 गटातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केल आहे. काँग्रेसला पार्ट टाइम नव्हे तर फुल्ल टाइम अध्यक्षाची गरज आहे. अशोक गेहलोत जर एकाच वेळी काँग्रेस अध्यक्ष आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर राहिले तर आमचा विरोध राहील असं त्यांनी म्हंटल.दरम्यान, काँग्रेसचे प्रमुख होणे हा काय पार्ट टाइम जॉब आहे का? असा सवालही त्यांनी केला.एन डी टी व्ही च्या बातमीनुसार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “आम्ही कधीच एका कुटुंबाच्या विरोधात नव्हतो. पण जो कोणी अध्यक्ष होईल तो निवडणुकीच्या माध्यमातून व्हावा. राहुल गांधींना आजही निवडणूक लढवायची असेल आणि त्यांनी फॉर्म भरला तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं चव्हाण म्हणाले. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांचे आभार मानले. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा ही आमची मागणी पूर्ण झाली आहे. आता या निवडणुका पारदर्शीपणे पार पडाव्यात, असत मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली तरी गेहलोत यांना काही काळ राजस्थानचे मुख्यमंत्रीपद कायम ठेवायचे आहे, अशा चर्चा सुरु होत्या. याबाबत विचारले असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अशोक गेहलोत एक ज्येष्ठ नेते आहेत, चांगले नेते आहेत. त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे अजून ठरवायचे आहे. मात्र त्यांना दोन्ही पदांवर कायम राहायचे असेल तर आमचा विरोध असेल. 



आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करा..... ; मंत्री शंभूराज देसाई यांचा अजितदादांना टोला...

वेध माझा ऑनलाइन ; एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याचवेळी सत्ताधारी विरुद्ध विरोधक असाही राजकीय कलगीतुरा पाहायला मिळत आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ घेत आज मंत्री शंभूराज देसाई यांनी खोचक शब्दांत टोला लगावला. तसेच, स्थानिक राजकारणावरून त्यांनी अजित पवारांना सूचक इशाराही दिला आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.

आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करा
अजित पवार उपमुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत काम केल्याचं यावेळी शंभूराज देसाई म्हणाले आहेत. “कुणी कुणाला गद्दार म्हणावं? अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या दोन खात्यांचा मी राज्यमंत्री होतो. मी दादांचं काम जवळून पाहिलं आहे. पण अजित पवारांनी आम्हाला गद्दार म्हणताना एकाच गोष्टीचा विचार करावा की..... हा शिवसेनेतला अंतर्गत प्रश्न आहे... आम्ही आजही शिवसेनेतून बाहेर गेलेलो नाही... आम्ही शिवसेनेतच आहोत, असा सल्ला देत त्यांनी यावेळी हळुवार टोलाही लगावला... 



सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरचा फोटो शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांच्याकडून ट्विट ; राष्ट्रवादी आक्रमक ; फोटो बनावट असल्याचा राष्ट्रवादीचा दावा...

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीकडून शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला होता. त्यानंतर आता शिंदे गटातील शितल म्हात्रें यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला आहे.या फोटोमध्ये सुप्रिया सुळे यांच्या मागे मुख्यमंत्र्यांचा बोर्ड दिसत आहे.

सध्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून राज्यातलं राजकारण चांगलचं तापलं आहे. राष्ट्रवादीकडून शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला होता. हा फोटो ट्विट करून श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता. यावरून वाद निर्माण झाल्यानं श्रीकांत शिंदे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं होतं.
मात्र आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. फोटो ट्विट करत 'हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस चांगलेच आक्रमक झाले आहे, हा फोटो बनावट असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या वतीने शीतल म्हात्रे यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
तर श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला होता. यावरून वाद निर्माण झाल्यानं श्रीकांत शिंदे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं होतं. हे आपल्या घरातलं कार्यालय आहे, असं स्पष्टीकरण देताना श्रीकांत शिंदे म्हणाले, "हे सगळं हास्यास्पद आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्षम आहेत.१८ - २० तास काम करतात, कोणालाही त्यांचा कारभार सांभाळण्याची गरज नाही. फोटोमधलं कार्यालय घरातलं आहे. मी आणि शिंदे साहेब दोघेही याचा वापर करतो.

खडसे पुन्हा भाजपमध्ये येणार ? फडणवीस म्हणतात..... मला कल्पना नाही...

वेध माझा ऑनलाइन - भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते अमित शहांसोबत फोनवर चर्चा केल्यामुळे घरवापसीची चर्चा रंगली आहे. मात्र, या चर्चेवर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्याबद्दल मला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया देऊन पुढे बोलण्याचं टाळलं.

भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत एकनाथ खडसे हे दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. पण, अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही. पण एकनाथ खडसे यांची फोनवरुन अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे अशी माहिती खुद्द भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली. या खुलाशानंतर खडसेंच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. मात्र, याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याचं टाळलं आहे.
अमित शहा आणि एकनाथ खडसे यांनी फोनवर चर्चा झाली, याबद्दल मला कल्पना नाही, असी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद च्या दिल्या घोषणा ; ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल...

वेध माझा ऑनलाइन - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात देशव्यापी कारवाईनंतर या संघटनेचे समर्थकही निषेध करत आहेत. पीएफआय वरील कारवाई नंतर पुण्यातील मुस्लीम समाजातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाह हू अकबर अशा घोषणा देण्यात आल्या. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

पुणे पोलिसांनी या घोषणाबाजी प्रकरणामध्ये रियाज सय्यद आणि ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झाल्याचा उल्लेख पोलिसांनी यावेळी केला आहे.


कराड नगरपरिषदेने पुन्हा एकदा देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पटकवला अव्वल क्रमांक ; सलग चाैथ्या वर्षी मिळवला बहुमान

वेध माझा ऑनलाइन - कराड नगरपरिषदेने पुन्हा एकदा देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. सलग चाैथ्या वर्षी नगरपरिषदेने बहुमान मिळवला आहे. यावर्षीही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील शेकडो नगर परिषदांमध्ये कराड नगरपरिषदेने बाजी मारली आहे. याबाबतचे पत्र सोशल मिडियावर फिरत असून यामध्ये कराड नगरपरिषदेला दुसरा क्रमांक मिळाला असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.

या पत्रात, एक ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेचा बक्षीस वितरण देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते पार पडणार असल्याचे म्हटले आहे. 2018 साली सुरू झालेला हा स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेतील कराड नगरपरिषदे कायम अव्वल राहिली आहे. देशातील सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदा गटात कराड नगर परिषदेने सातत्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे.
दिल्ली येथे 29 व 30 सप्टेंबर रोजी देशातील अव्वल ठरलेल्या नगरपरिषदांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत केलेल्या कलाकृती तसेच राबवलेले उपक्रमावर आधारित प्रदर्शनाचे हे आयोजन केले असून कराड नगरपालिका ही या प्रदर्शनात भाग घेणार आहे. दोन दिवसाच्या प्रदर्शनानंतर एक आक्टोंबर रोजी पारितोषिक वितरण राष्ट्रपतीच्या हस्ते होणार आहे.

Friday, September 23, 2022

शिवाजी पार्कात उद्धव ठाकरेंना परवानगी...या निर्णयाविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार ...!

वेध माझा ऑनलाइन - शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.उद्या पर्यंत याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. 

हायकोर्टाने शिंदे गटाचे म्हणणे ऐकले नाही. तसेच सदा सरवणकरांची याचिका ही आमची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याची होती. सदा सरवणकरांचे म्हणणे हायकोर्टाने ऐकून घेतले नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या सुप्रीम कोर्टात करण्यात येणाऱ्या याचिकेत आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे त्यामुळे आम्हाला शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा करण्याची परवानगी द्यावी, असे याचिकेत म्हटले आहे.  तसेच ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील याचिकेत शिंदे गटाने केली आहे.  हायकोर्टाच्या निकालाची अंतीम कॉपी हातात आल्यानंतर आज किंवा उद्या याचिका दाखल करण्यात येणार आहे.

शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार ; कोर्टाने दिली परवानगी.

वेध माझा ऑनलाइन - मुंबई हायकोर्टाने आज सर्वात मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळावा घेतला जातो. पण यावर्षी हा दसरा मेळावा वादात सापडला होता. दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने मुंबई महापालिकेत अर्ज केला होता. पण मुंबई महापालिकेने कायदा-सुव्यवस्थेचं कारण सांगत दोन्ही गटाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गट दोघांच्या बाजून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच मुंबई महापालिका देखील कोर्टात गेली होती. या संबंधित सर्व याचिकांवर कोर्टात आज सुनावणी झाली. तीनही पक्षकारांकडून प्रचंड युक्तीवाद करण्यात आला. कोर्टाने तीनही पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून घेत मुख्य शिवसेनेला दसरा मेळावासाठी परवानगी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा येत्या दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क मैदानावर आवाज घुमणार हे निश्चित झालं आहे.

मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य होता. कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुनच पालिकेने परवानगी नाकारली, असं निरीक्षण कोर्टाने नमूद केलं. यावेळी पालिकेने 2017 मध्ये कशी परवानगी दिली हे पाहवं लागेल, असं न्यायाधीश म्हणाले. 2016 च्या आधी शिवसेनेला परवानगी मिळाली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्षांपासून होतोय. खरी शिवसेना कुणाचा यात आम्हाला जायचं नाही. 22 आणि 26 दोन्ही तारखेचे अर्ज पालिकेला आलेले होते. पालिकेकडून शिवसेनेला प्रतिसाद न मिळाल्याची याचिका आहे, असं न्यायाधीशांनी नमूद केलं.

पोलिसांनी पालिकेला कायदा आणि सुव्यवस्थेचा २१ तारखेला अहवाल दिला. कायदा-सुव्यवस्थेमुळे परवानगी न देण्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता, असं कोर्टाने म्हटलं. यावेळी कोर्टाने पालिका प्रशासनालाही सुनावलं. पालिकेचा निर्णय अंतिम नाही. दुसऱ्या गटाच्या अर्जाबाबत पालिकेला माहिती होतं. मुंबई पालिकेचा निर्णय तथ्यात्मक नाही. मुंबई पालिकेने कायद्याचा दुरुपयोग केला, असं कोर्टाने स्पष्ट म्हटलं.

गेल्या सात दशकांपासून शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय. दसरा मेळाव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा कधीच प्रश्न निर्माण झालेला नाही. त्यामुळे यावर्षी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही ना? अशी हमी कोर्टाने मागितली. त्यावर ठाकरे गटाने हमी दिली. त्यानंतर कोर्टाने ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली.


श्रीकांत शिंदे बसले चक्क मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर ? राष्ट्रवादी काँग्रेसने फोटो केला शेअर ; घेतला आक्षेप...

वेध माझा ऑनलाइन - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. या फोटोत श्रीकांत शिंदे हे चक्क मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने श्रीकांत शिंदे यांच्या या कृतीवरून आक्षेप घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्वीट केला असून त्यावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय .हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर? असं म्हणत त्यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

ऑक्टोबर महिन्यात 21 दिवस बँका राहणार बंद! ; कोणत्या ठिकाणच्या आणि कधी..... बँक राहणार बंद?

वेध माझा ऑनलाइन - तुमची काही महत्त्वाची बँकेतील कामं असतील तर ती याच महिन्यात करून घ्या. ऑक्टोबर महिन्यात सगळ्यात जास्त सुट्ट्या असणार आहेत. ऑक्टोबर सणांचा महिना असल्याने या महिन्यात देशभरात २१ दिवस बँक बंद राहणार आहे. दुर्गा पूजा, दसळा, दिवाळी आणि छट पूजा यासोबत आणखी काही सण असल्याने सुट्ट्या असणार आहेत.

संपूर्ण महिन्यात फक्त 9 दिवस बँका काम करतील. म्हणजेच 21 दिवस बँकांमध्ये सुट्टी असेल. त्यामुळे तुमच्याकडेही बँकिंगची काही महत्त्वाची कामे असतील, जी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन करावी लागणार असतील तर ती तुम्ही याच महिन्यात करून टाका.
ऑक्टोबरमध्ये देशभरातील बँका 21 दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयने सुट्ट्यांची जी यादी जाहीर केली आहे, त्यातील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय स्तरावरील आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. त्याच वेळी, काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तराच्या असतात. त्या दिवशी बँकेच्या शाखा फक्त त्याच्याशी जोडलेल्या राज्यांमध्येच बंद असतात. वेगवेगळ्या राज्यांसाठी सुट्ट्यांची यादीही वेगळी असते.

वेध माझाच्या वाचकांसाठी बँकांच्या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे...

1 ऑक्टोबर –बँक अर्धवार्षिक बंद (देशभर सुट्टी)

2 ऑक्टोबर – रविवार आणि गांधी जयंती सुट्टी

3 ऑक्टोबर – महाअष्टमी (दुर्गा पूजा) (अगरतला भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पटना, रांचीमध्ये बँक बंद)

 4 ऑक्टोबर – महानवमी/श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव (अगरतला, बेंगळुरु, भुवनेश्वर, गुवाहाटी, कोलकाता, चेन्नई, गंगटोक, कानपूर, कोच्ची, कोलकाता, लखनऊ, पटना, रांची, शिलांग, तिरुवनंतपुरम भागांमध्ये सुट्टी)

5 ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दशहरा (विजय दशमी) देशभरात सुट्टी

6 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (गंगटोकमध्ये सुट्टी)

7 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (गंगटोक बँक बंद राहणार)

8 ऑक्टोबर – दुसरा शनिवार मिलाद-ए-शरीफ/ईद-ए-मिलाद-उल-नबी (सुट्टी)

9 ऑक्टोबर – रविवार

13 ऑक्टोबर – करवा चौथ (शिमला इथल्या बँकांना सुट्टी)

14 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू, श्रीनगर)

16 ऑक्टोबर – रविवार

18 ऑक्टोबर – कटि बिहू (गुवाहाटी)

22 ऑक्टोबर – चौथा शनिवार

23 ऑक्टोबर – रविवार

24 ऑक्टोबर – नरक चतुर्दशी

25 ऑक्टोबर – लक्ष्मी पूजा

26 ऑक्टोबर – गोवर्धन पूजा

27 ऑक्टोबर – भाऊबीज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / दीपावली / निंगोल चक्कूबा गंगटोक, इंफाल, कानपुर, लखनऊमध्ये सुट्टी)

30 ऑक्टोबर – रविवार

31 ऑक्टोबर– छठ पूजा (अहमदाबाद, रांची आणि पटनामध्ये सुट्टी)






आदिमाया दुर्गा देवी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वेध माझा ऑनलाइन - 
येथील रविवार पेठेतील स्वयंभू श्री आदिमाया दुर्गादेवी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त नवरात्र उत्सवात नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील भोई गल्लीत 1972 साली नवरात्रात जमिनीत आदीमाया देवीची मूर्ती सापडली होती. त्यावेळी भाविकांनी तेथेच या देवीची प्रतिष्ठापना केली होती. यावर्षी या मंदिराचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त नवरात्र उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 सोमवार 26 रोजी घटस्थापना व अभिषेक होणार आहे. सायंकाळी पाच वाजता अभंग व भक्ती गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री नऊ वाजता लहान मुलांच्या स्पर्धा होणार आहेत. मंगळवार 27 रोजी सकाळी अकरा वाजता आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर होणार आहे. सायंकाळी पाच वाजता रामकृष्ण मित्र मंडळाचे भजन तर रात्री नऊ वाजता लहान मुलांच्या स्पर्धा होणार आहेत. बुधवार 28 रोजी सकाळी अकरा वाजता भजन, सायंकाळी पाच वाजता आप्पासाहेब खोत यांचा कथाकथनचा कार्यक्रम तर रात्री नऊ वाजता भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार 29 रोजी सकाळी अकरा वाजता शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप होणार आहे तर सायंकाळी पाच वाजता अभय भंडारी यांचे हिंदू संस्कृती उत्सव व नवरात्रीचे महत्त्व या विषयावर व्याख्यान होणार आहे. शुक्रवार 30 रोजी रामकृष्ण गीता मंडळ सप्तशती कार्यक्रम सकाळी अकरा वाजता होणार असून सायंकाळी पाच वाजता कुंकुमार्चन होणार आहे. शनिवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता भजन सायंकाळी चार वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे तर रात्री नऊ वाजता महा बोंडला होणार आहे. रविवार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता शालेय स्पर्धा, रांगोळी, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा होणार आहेत. सोमवार 3 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता होम हवन व रात्री नऊ वाजता सिने अभिनेते सुरेश चव्हाण यांचा गोंधळ होणार आहे. मंगळवार 4 ऑक्टोबर रोजी खंडे नवमी व कुमारीका पूजन सकाळी 11 वाजता तर सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता भव्य दरबार मिरवणूक काढण्यात येणार आहे.
 या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री आदिमाया मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे

Thursday, September 22, 2022

काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक ; पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य नेतेही चर्चेत...

वेध माझा ऑनलाइन - काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे नवी दिल्लीतील पक्षाच्या कार्यालयातील वातावरण बदललं आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या निवडणूक कार्यालयात सध्या आवाज अन् गडबड गोंधळ पाहायला मिळत आहे. या कार्यालयात दोन अतिरिक्त टेबलांसह नव्या स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. हा स्टाफ निवडणूक लढण्यास इच्छूक असणाऱ्या नेत्यांचं मार्गदर्शन करणार आहे. ऑक्टोबर महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, शशी थरूर यांनी निवडणुकीचा फॉर्म घेतल्यानंतर कार्यालयातील वातावरणच बदललं. त्यांनी काँग्रेसच्या सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्रींसह फोटोदेखील क्लिक केले. यामुळे तेदेखील राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याची पुष्टी झाली.दरम्यान,पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य नेतेही या निवडणुकीच्या मैदानात असल्याच्या चर्चा आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी यापूर्वीच सांगितलं आहे की.....
त्या या निवडणुकीत तटस्थ राहतील आणि पक्षातील कोणताही सदस्य निवडणूक लढवू शकतो. पक्षात शशी थरूर हे उच्च शिक्षित आहेत. अनेकदा ते पक्षाच्या लाइनरही फिट बसत नाहीत. मात्र तरीही ते तिरुवनंतपूरमची सीट जिंकले. थरूर काँग्रेसचा विद्रोही ग्रूप G-23 चा भाग होते.

पृथ्वीराज चव्हाण आणि अन्य नेतेही मैदानात...???
थरूर यांच्याप्रमाणे खासदार मनिष तिवारीदेखील पार्टी विद्रोही आहेत. म्हटलं जातं की, गांधी कुटुंबीयांशी यांचे संबंध फारसे चांगले नाही. सध्या मनिष तिवारी पंजाबमधील आपलं विधानसभेच्या दौऱ्यावर आहेत. कोणकोणते नेते त्यांचे समर्थक करू शकतील, याचा चाचपणी ते करीत आहेत. गांधी कुटुंबाचे जवळचे मल्लिकार्जून खर्गे देखील राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या मैदानात आहे. खर्गेनी जर निवडणूक लढवली तर त्यांना बरीच मतं मिळू शकतात. त्यांचे पक्षातील नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. या रांगेत मुकुल वासनिकदेखील आहे. मुकुल हे महाराष्ट्रातील दलित नेते आहेत. सध्या ते गांधी कुटुंबायाच्या जवळचे मानले जातात. या नेत्यांप्रमाणे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, भूपिंदर सिंग हुड्डा, पृथ्वीराज चव्हाणदेखील पक्षाच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत सामील आहेत अशा चर्चा आहेत.


इमाम ऑर्गनायझेशनचे इलयासी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचा राष्ट्रपिता म्हणून केला उल्लेख ...

वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी दिल्लीमधील मशिदीला भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम नेत्यांशी चर्चा केली. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे डॉक्टर उमर अहमद इलयासी यांच्यासोबत मोहन भागवत यांची तब्बल एक ते दीड तास बंद दाराआडा चर्चा झाली. मोहन भागवत यांच्यासोबतच्या भेटीनंतर डॉक्टर उमर अहमद इलयासी यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. यावेळी इलयासी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. त्याशिवाय दोन्ही धर्मियांचा डीएनए एकच असल्याचेही ते म्हणाले. मोहन भागवत यांच्या भेटीनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.  

सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथील कस्तूरबा गांधी मार्गावर असलेल्या मशिदीला भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लीम नेत्यांशी चर्चा केली. मोहन भागवत यांनी यावेळी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे डॉ. उमर अहमद इलयासी यांच्यासोबत चर्चा केली. याआधी मोहन भागवत यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी आणि दिल्लीचे माजी राज्यपाल नजीब जंग यांच्यासह मुस्लिम नेत्यांशी चर्चा केली. 
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरु लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) जमीरुद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि परोपकारी सईद शेरवानी यांची आरएसएसच्या कार्यलयात झालेल्या बैठकीला हजेरी लावली होती. मोहन भागवत यांच्यासोबत त्यांची तब्बल दोन तास चर्चा झाली होती. सांप्रदायिक सलोखा मजबूत करणे आणि दोन्ही समाजाचे संबंध सुधारण्यावर व्यापक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी मुस्लीम संघटना जमीअत-उलेमा-ए-हिंद याचे नेता मौलाना अरशद मदनी यांनी 30 ऑगस्ट 2019 रोजी दिल्लीमध्ये झंडेवालान येथे असलेल्या आरएसएस कार्यालयात जाऊन मोहन भागवत यांची भेट घेतली होती. 

सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 14 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे 8 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 2 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 7 वाई 3 व इतर 1
आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 14 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 8 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंच्या मागे ईडी लागणार..... ; नारायण राणेंनी झोड झोड झोडपले... काय म्हणाले राणे? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन - उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. लबाड लांडगा, यांच्यासारखा खोटारडा माणूस मी पाहिला नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली. उद्धव ठाकरेंनी किती मराठी लोकांना रोजगार दिला. काल जे काही बोलले आहेत, खोका, गिधाडं आत जाल. संजय राऊतांची सोबत करायला. खोक्याची चौकशी होणार आहे, यांच्या मागे ईडी लागणार आहे, असा इशारा राणे यांनी दिला. 

 मला भाजपात घेऊ नये म्हणून उद्धव ठाकरे अमित शहांना कालपर्यंत फोन करत होते. त्याच अमित शहांवर तुम्ही गिधाडं वगैरे टीका करता. चांगले बोलता येत नाही काय? बाप पळविणाऱ्या औलादीचे भाष्य करताय, बापाची ध्येय धोरणं न ठेवणारा हा माणूस. बाळासाहेबांची एकनाथ शिंदे, आमदार आठवण काढतात, त्याला चोरी कसे काय म्हणू शकता. साहेब असे नव्हते, ते मोठ्यांचा आदर करायचे. उद्धव ठाकरे चार खासदार, दहा आमदार निवडून आणू शकत नाही, असे राणे म्हणाले. राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला.
पदासाठी आणि पैशांसाठी आणि खोक्यासाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली. अमित शहा मुंबईवर चालून आले असे म्हणता, देशाचा गृहमंत्री मुंबईत आला तर मुंबई तुमची आहे का? कलानगरला टक्केवारीसाठी ऑफिस उघडले. पालिकेच्या टेंडरमागे १५ टक्के घेत होते. आता आम्हाला ठेकेदारांनाच समोर आणावे लागेल, असा आरोप राणे यांनी केला. 
मुंबईवर संकट येते तेव्हा केंद्र सरकार नेहमी महाराष्ट्राला मदत करते. अशी एकही नैसर्गिक आपत्ती नाही, तिकडून मदत येत नाही. हे कधी वाचतच नाहीत. मातृभूमीसाठी काय केलेत तुम्ही, मुंबईच्या भूमीवर राहणाऱ्या लोकांसाठी काय केले. मुंबईत दोन लाख भिकारी आहेत. काय केलेत यांच्यासाठी, मातोश्रीच्या आजुबाजुलाच पाच-सहा हजार भिकारी आहेत, असेही राणे म्हणाले.

भावना गवळींच्या वडिलांनी आयुष्य शिवसेनेसाठी घालवले. भावना गवळी तर लहान असल्यापासून खासदार आहेत. त्यांच्यावर मोदींना राखी बांधण्यावरून टीका केली. तुम्हाला राखी बांधण्याचे काय महत्व असणार. ज्या महिलेने शिवसैनिकांचे नेतृत्व केले, एवढी वर्षे तिने पक्षाची सेवा केली, तिच्याविरोधात असे बोलतात. मी मर्द आहे, हे काल बोलले नाहीत. मोदींच्या कामासमोर तुम्ही नखाएवढे पण नाहीत. बावनकुळे की एकशेबावनकुळे कळेल कसे, कधी शाळेत गेलातच नाही, अशी टीका राणे यांनी केली. यापुढे वाकड्या नजरेने पाहिले तर महाराष्ट्रात फिरू शकणार नाहीत, असा इशारा राणे यांनी दिला. 



  

बँकिंग व्यवसायाचा परवाना रद्द करण्याच्या निर्देशाला 17 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती ; "या' बँकेला मिळाला दिलासा....

 वेध माझा ऑनलाइन - रूपी बँकेला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा  दिलासा दिला आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेवर कारवाई करत बँकिंग व्यवसायाचा परवाना रद्द  करण्याच्या निर्देशाला 17 ऑक्टोबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती गिली आहे.  आरबीआयच्या निर्णयाविरोधात बँकेनं केंद्रीय अर्थ मंत्रालयात दाद मागितली आहे.  ज्यावर 17 ऑक्टोबरला सुनावणी अपेक्षित आहे. याची नोंद घेत हायकोर्टानं आरबीआयच्या आदेशाला 17 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.

आरबीआयनं 8 ऑगस्टला जारी केलेल्या निर्णयाची पूर्तता करण्यासाठी दिलेली सहा आठवड्यांची मुदत नुकतीच संपली आहे.  मात्र हायकोर्टाच्या या स्थगितीमुळे बँकेला आणि खातेधारकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. गुरूवारी बँकेच्यावतीनं दाखल  याचिकेवर न्यायमूर्ती एस.के. शिंदे यांच्यापुढे सुनावणी झाली आहे. 
रुपी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले होते. बॅंकिंग नियमांचे पालन करण्यात बॅंक अपयशी ठरली. आर्थिक अनियमिततांमुळे तोट्यात गेलेल्या रूपी बँकेचा परवाना रद्द करण्याचे आदेश आरबीआने दिले होते. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

मॉल मधून वाईन विक्री होणार ? मंत्री शंभूराज देसाईंनी दिले संकेत....

वेध माझा ऑनलाइन -  मॉलमधील वाईन विक्री ही राज्याच्या आणि शेतकऱ्याचा हिताची आहे, अशी मत व्यक्त करत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मॉल मधून वाईन विक्री होण्याबाबतचे संकेत दिले आहेत? ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रकरणी जनता नेमकी किती टक्के समर्थनात आहे आणि किती टक्के विरोधात आहे याचा अंदाज काहीच दिवसात विभागाला येईल. त्यानंतर आम्ही स्वत: या विषयाचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चाही करणार आहे. सगळ्यांचा आदेश घेऊन हा वाईन विक्रीचा निर्णय घेतला जाईल, असंंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय त्यांच्या काळात घेतल्याचं सांगितलं जात होतं. मात्र या निर्णयाला तेव्हा भाजपने आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला होता. तसेच हे मद्यप्यांचे सरकार आहे अशा शब्दात त्यांनी तेव्हा टीकाही केली होती. या विषयी सध्या उलटसुलट चर्चा पुन्हा सूरु झाली आहे

Wednesday, September 21, 2022

हलक्यात घेऊ नका,अन्यथा,अणुहल्ला करू; पुतीन यांची अमेरिकेला उघड धमकी!

वेध माझा ऑनलाइन - रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आता सातव्या महिन्यात प्रवेश करणार असून हे युद्ध काही लवकर संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. यात राष्ट्राला संबोधित करताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी अमेरिकेसह पाश्चात्य देशांना उघड धमकी दिली आहे.

अण्वस्त्र हल्ल्याचा इशाऱ्याला हलक्यात घेऊ नका, हे काही नाटक नाही. गरज पडली तर रशिया अण्वस्त्र हल्ला देखील करेल, असं रोखठोक विधान व्लादिमीर पुतीन यांनी केलं आहे.
पुतीन यांनी अमेरिका आणि युरोपला मोठी धमकी दिली आहे. अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा कोणत्याही परिस्थितीत हलक्यात घेऊ नये, असे पुतीन म्हणाले. अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा हे नाटक नाही. रशियाला कोणत्याही प्रकारचा धोका असेल तर आम्ही अण्वस्त्र हल्ला करू आणि आमच्याकडे नाटोहून अधिक प्रगत शस्त्रं उपलब्ध आहेत, असंही पुतीन म्हणाले.

पुतिन म्हणाले की, जर रशियाच्या प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण झाला तर मॉस्को सर्व संभाव्य उपाययोजनांसह प्रत्युत्तर देईल. त्याच वेळी, अधिकाऱ्यांनी सांगितले की 300,000 सैनिकांच्या तैनातीची योजना आखण्यात आली आहे.रशियाही युक्रेनबाबत जनतेचं मत जाणून घेण्याची तयारी करत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी बुधवारी देशाला संबोधित केलं. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणानंतर पुतिन यांनी राष्ट्राला केलेलं हे पहिलंच संबोधन होतं. पुतीन यांनी देशातील जनतेला युक्रेनमधील लष्कराची सद्यस्थिती आणि तेथील परिस्थितीची जाणीव करून दिली

दुसरीकडे, अमेरिकेने रशियन-व्याप्त पूर्व आणि दक्षिण युक्रेनवर सार्वमत घेण्याच्या रशियाच्या योजनेला "नाटक" म्हटले आणि "सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वाचा अपमान" असा उल्लेख केला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी मंगळवारी दावा केला की सार्वमत चाचणीत फेरफार केला जाईल. युक्रेनच्या कोणत्याही भागावर कथित कब्जा केल्याचा रशियाच्या दाव्याचं अमेरिका कोणत्याही परिस्थितीत समर्थन करणार नाही, असंही ते म्हणाले."रशियाकडून सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वांचा अपमान होत आहे", असं सुलिव्हन यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं. “आम्हाला माहित आहे की रशियाकडून सार्वमत चाचणीत फेरफार केले जातील. रशिया लवकरच किंवा नंतर या बनावट सार्वमताचा वापर त्या प्रदेशांना जोडण्यासाठी करेल", असं ते म्हणाले.

सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 13 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 1 जणांचा मृत्यू झाला आहे 9 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 1कोरेगांव 1 माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 8 वाई 1 व इतर 1
आणि नंतरचे वाढीव 1 असे  आज अखेर एकूण 13 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 9 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

सामना कार्यालयात "फ्रंट मॅन' कडून संजय राऊतांना पैसे घेताना मी पाहिलंय ; पत्राचाळ प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडी समोर मांडले म्हणणे...

वेध माझा ऑनलाइन - पत्राचाळीच्या कथित घोटाळ्याचा पैसा राऊतांनी कुटुंबातील सदस्य, सहकारी आणि या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराच्या नावाने विविध बनावट कंपन्यामध्ये गुंतवला असं ईडीच्या तपासात पुढे आले आहे. १ ऑगस्टला संजय राऊतांना अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाले. त्यात राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यावर पैसे जमा झाले असा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला चौकशीत सांगितले की, एप्रिल २०२१ मध्ये अधिग्रहित केलेल्या मद्य कंपनीमध्ये राऊतांचे व्यावसायिक हितसंबंध आहेत दरम्यान, प्रविण राऊत यांच्या २ कर्मचाऱ्यांना सामना कार्यालयात आलेले आणि थेट संजय राऊतांना पैसे सोपवताना पाहिलं आहे असंही त्यांनी सांगितले आहे

संजय राऊतांनी बेहिशेबी रोकड वापरून पत्नी आणि कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावे जमीन खरेदी केल्या. कुठल्याही गॅरंटीशिवाय राऊतांनी नातेवाईकांकडून कर्जाच्या नावाखाली पैसे घेतले. आई, भाऊ, चुलत भाऊ आणि अन्य लोकांकडून संजय राऊतांनी कर्ज घेतलेत ज्यांच्याकडे उत्पन्नाचं स्त्रोत नाही.
प्रविण राऊतांच्या २ कर्मचाऱ्यांनी संजय राऊतांना पैसे दिले होते असा दावा ईडीच्या तपासात या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. स्वप्ना पाटकर म्हणाल्या की, अलिबाग येथे खरेदी केलेल्या जमिनीवर संजय राऊतांना रिसोर्ट बांधायचं होतं. परंतु त्याठिकाणी असलेल्या सीआरझेड निकषांमुळे ही योजना फिस्कटली.
२००८ ते २०१४ या काळात मी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात स्तंभलेखिका होती. राऊतांना इंग्रजीत लेख लिहण्यात मदत करत होती. राज्यसभेच्या कामातही मी त्यांना मदत केली. या काळात या प्रकरणातील आरोपी प्रविण राऊत यांच्या २ कर्मचाऱ्यांना सामना कार्यालयात आलेले आणि थेट संजय राऊतांना पैसे सोपवताना पाहिलं आहे असं त्यांनी सांगितले.
ईडीच्या म्हणण्यानुसार, प्रविण राऊत हा संजय राऊतांसाठी ‘फ्रंट मॅन’ म्हणून काम करत होता. पत्रा चाळ प्रकल्पाबाबत साक्षीदाराने ईडीला सांगितले की, २००८-०९ दरम्यान परिसरातील रहिवाशांनी चाळीच्या पुनर्विकासासाठी स्थानिक नेत्यांमार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क साधला होता.

सह्याद्री व कृष्णा साखर कारखान्यांनी थकित एफआरपी येत्या पंधरा दिवसात द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा रयत क्रांती संघटनेचा इशारा...



वेध माझा ऑनलाइन - 
सह्याद्री व कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील उसाची थकित एफआरपी शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसात द्यावी. अन्यथा रयत क्रांति संघटनेच्या वतीने दोन्ही कारखान्यावरती तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा रयत क्रांति संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

जेष्ठ नेते सुदाम चव्हाण, तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, योगेश झांम्बरे व शेतकऱ्यांच्या उपस्थित आज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. गेल्या वर्षीचा गळीत हंगाम पूर्ण होवून पाच महीने झाले, तरी शेतकऱ्यांना अद्यापही पूर्ण एफआरपीची रक्कम दोन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना चालू वर्षीच्या रिकवरी नुसार एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने काही कारखान्यांच्या एफआरपीमध्ये मोठा फरक पडलेला आहे. तरी सर्व साखर कारखान्यांनी मागील वर्षीच्या साखर उताऱ्या नुसार शेतकऱ्यांना वाढीव दर देण्याची मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच इथेनॉल, विज निर्मिती, मळी व इतर उप पदार्थातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिकचा दर शेतकऱ्यांना देता येतो. तो साखर कारखान्यांनी द्यावा. तसेच चालू वर्षीच्या रिकवरीनुसार दर देणाऱ्या साखर कारखान्यांच्या मागील आर्थिक अहवाल साखर आयुक्तांनी तपासावा. जास्तीच्या एफआरपीचा फरक शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

Tuesday, September 20, 2022

वेदांता प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड ; मुख्यमंत्री जाणार दिल्लीला...वेदांता प्रकरणी भेटणार केंद्रीय मंत्र्यांना...

वेध माझा ऑनलाइन - वेदांता-फॉक्सकॉन हा हजारो कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील  घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (बुधवार) दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे  दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले जात आहे.

वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प गमावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिंदे हे दिल्ली दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती गठीत... ही समिती काय काम करणार?

वेध माझा ऑनलाइन - मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बंदरे मंत्री दाद भुसे  राज्य उत्पादन शुल्क मंत्री  शंभुराज देसाई उद्योग मंत्री  उदय सामंत यांचा समावेश आहे. 
ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करणार आहे

सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट्स

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 13 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे 24 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 2 कराड 3 खंडाळा 0 खटाव 1 कोरेगांव 1 माण 0 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 6 वाई 0 व इतर 0
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 13 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 24 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

कराड नगरपालिका कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची गरज ; सफाई मजदूर कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांची मागणी ;

वेध माझा ऑनलाइन - कराड नगरपालिकेचा कर्मचारी अनिरूध्द लाड ड्रेनेजची सफाई करताना मृत्यू पावला. तर एक कर्मचारी अमोल चंदनशिवे आजही रूग्णालयात उपचार घेत आहे. कर्मचारी पडून मृत्यू पावू शकत नाही. कराड नगरपालिकेने सुप्रीम कोर्टाच्या सूचनाचे पालन केले नाही. मानवी मलमुत्र साफ करण्यास बंदी असतानाही, तुम्ही यंत्र सामुग्रीच्या माध्यमातून सफाई का केली नाही? प्रत्यक्ष मानवास श्रम करून तेथे काम करण्यास सांगत आहात. तेव्हा अशा दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी केली आहे. दरम्यान,पालिकेचे मुख्याधिकारी डाके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा जो कोणी दोषी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे असे टाक यांनी म्हटले आहे कराड येथे चरणसिंग टाक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक मारोडा, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह पालिकेतील विविध खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी चरणसिंग टाक म्हणाले, पालिकेने मुकादमाला निलंबित केलेल्या कारवाईवर आम्ही संतुष्ट नाही. जिल्हाधिकारी यांच्यासमोर या सर्व बाबी आम्ही मांडणार आहोत. चाैकशी समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत. पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा जो कोणी दोषी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. मलमुत्र संबधी साफसफाईचे काम मानवी पध्दतीने करू नये, अशा सूचना व स्पष्ट आदेश कोर्टाचे आहेत. तरीही मलमूत्र साफ करण्यासाठी पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.सुप्रीम कोर्टाच्या 10 लाख रूपये निर्देशाप्रमाणे तसेच टीसीबीएसच्या माध्यमातून 10 लाख रूपये असे एकूण 20 लाख रूपये देण्याची मागणी केली आहे. सध्या तातडीने आज 4 लाख रूपये देण्यात आले. तसेच एका वारसास नोकरी द्यावी,अशी मागणी श्री. टाक यांनी केली आहे.


 



Monday, September 19, 2022

जिल्ह्यात आज 3 बाधित...

वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 3 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 0 जणांचा मृत्यू झाला आहे 12 जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 0 कराड 0 खंडाळा 0 खटाव 0 कोरेगांव 0 माण 1 महाबळेश्वर 0 पाटण 0 फलटण 0 सातारा 1 वाई 0 व इतर 1
आणि नंतरचे वाढीव 0 असे  आज अखेर एकूण 3 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 12 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.
महाराष्ट्र PRESS at 7:06 AM

रेठरे बुद्रुक येथील कृष्णाघाटाच्या सुशोभीकरणाला मिळणार पुन्हा चालना ; डॉ. अतुल भोसले यांनी घेतली पर्यटनमंत्र्यांची भेट...

वेध माझा ऑनलाइन - रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा नदी घाटाच्या सुशोभीकरणासाठी भाजप सरकारच्या काळात सन २०१९ मध्ये मंजूर करण्यात आलेला २ कोटी ८ लाखांचा निधी, नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने रद्द केला. हा निधी पुन्हा मिळावा, या मागणीसाठी आज भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी मुंबई येथे पर्यटनमंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. त्यावेळी ना. लोढा यांनी हा निधी पुन्हा देण्याबाबत सकारात्मकता दर्शविल्याने, रेठरे बुद्रुक येथील कृष्णाघाटाच्या सुशोभीकरणाला पुन्हा चालना मिळणार आहे.

रेठरे बुद्रुक गावातून वाहणारी कृष्णा नदी ही गावासाठी जीवनदायिनी आहे. या नदीशेजारी असणाऱ्या घाटाला ऐतिहासिक महत्व असून, घाटावर असणाऱ्या विविध देवतांच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येत असतात. कराड आणि वाळवा तालुक्याच्या मध्यावर असणाऱ्या या गावातील सुसज्ज नदीघाटावरील पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी नदीघाटाचे सुशोभीकरण आवश्यक होते. या अनुषंगाने डॉ. अतुल भोसले यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत रेठरे बुद्रुक येथील नदीघाटाच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करावा, असा प्रस्ताव राज्याचे तत्कालीन पर्यटन व सांस्कृतिक कार्यमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे दाखल केला होता. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने सन २०१९ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २ कोटी ८ लाख रूपयांचा निधी रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीच्या घाट बांधकामासाठी व सुशोभीकरणासाठी मंजूर केला होता. त्यानुसार प्रत्यक्ष कामालाही प्रारंभ झाला होता. मात्र त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने हा निधी रद्द केल्याने, अनेक वर्षे हे काम रखडले आहे. या कामाला पुन्हा चालना देण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा निधी मंजूर करावा, अशी मागणी डॉ. अतुल भोसले यांनी ना. लोढा यांच्याकडे आज केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, हा निधी पुन्हा मंजूर करण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही ना. लोढा यांनी डॉ. भोसले यांना दिली. यामुळे आता लवकरच नदीकाठी विकासकार्य सुरू होऊन, रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीघाटावरील पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रेठऱ्याच्या पर्यटनाला मिळणार चालना

रेठरे बुद्रुक हे गावाला मोठी ऐतिहासिक परंपरा असून, कृष्णा नदीमुळे या गावाचे स्थान पर्यटनदृष्ट्याही अत्यंत महत्वाचे आहे. नदीघाटाच्या सुशोभीकरणामुळे रेठरे बुद्रुकच्या पर्यटनाला चालना मिळण्यास नक्कीच मदत होईल.
- डॉ. अतुल भोसले
सदस्य, भाजपा प्रदेश कार्यकारिणी