वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकार के.सी. ठाकरे असा उल्लेख केला होता. प्रबोधनकार ठाकरे यांची आज 137 वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांनी हे ट्विट केलं होतं. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट करुन नव्याने ट्विट केलं. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या ट्विटवर मनसेने आक्षेप घेतला होता.
खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, सत्यशोधक विचारांचा वारसा घेऊन त्यासाठी आयुष्यभर लढा देणारे प्रबोधनकार के.सी. ठाकरे यांची आज जयंती, यानिमित्ताने त्यांच्या स्मतृींना विनम्र अभिवादन अशी पोस्ट केली. त्यात असलेल्या फोटोवर के.सी. ठाकरे हे नाव ठळक अक्षरात दाखवण्यात आले. तर प्रबोधनकार अगदी लहान शब्दात लिहिले होते. या ट्विटवरुन वाद निर्माण होताच सुप्रिया सुळे यांनी ते ट्विट डिलीट केलं.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत...
ताई...तुम्ही एवढ्या मोठ्या झाला नाहीत असा टोला लगावला आहे.
देशपांडे यांनी सांगितले की, प्रबोधनकार ठाकरेंना के.सी. ठाकरे म्हणण्या एवढ्या मोठ्या ताई झाला नाही. सध्या या ट्विटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकीय वर्तुळातूनही यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
No comments:
Post a Comment