वेध माझा ऑनलाइन - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आला आहे. या फोटोत श्रीकांत शिंदे हे चक्क मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने श्रीकांत शिंदे यांच्या या कृतीवरून आक्षेप घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्वीट केला असून त्यावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय .हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर? असं म्हणत त्यांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment