Saturday, September 17, 2022

स्व.पी.डी.पाटील यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान ; प्रा.डॉ.शिवाजीराव कदम...

वेध माझा ऑनलाइन - शिक्षण क्षेत्रात काम करताना विविध पदावर काम करण्याच्या अनेक संधी मिळाल्या आजवर अनेक पुरस्कारही मिळाले. पण मी जिथे शिकलो, वाढलो, घडलो त्या मातीतील स्व.पी.डी.पाटील यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझा सर्वात मोठा सन्मान असल्याची भावना प्रा.डॉ.शिवाजीराव कदम यांनी आज येथे व्यक्त केली.

दिवंगत जेष्ठ नेते.पी.डी.पाटील यांचा 14 वा स्मृतीदिन शनिवारी साजरा करण्यात आला. स्मृती दिनाच्या निमित्ताने आदरणीय पी.डी.पाटील गौरव प्रतिष्ठाणच्या वतीने देण्यात येणारा आदरणीय पी.डी.पाटील महाराष्ट्र भुषण पुरस्कार भारती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.शिवाजीराव कदम यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

यावेळी मधुकर भावे म्हणाले... स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा जपत पी डी साहेबांनी स्व.चव्हाण साहेबांच्या मतदार संघाचे नेतृत्व केले. तर सलग 42 वर्षे नगराध्यक्षपद भुषवत पी.डी.पाटील यांनी कराड शहराला विकासाच्या शिखरावर पोहचवले. यांनी साकारलेली विकासकामे पिढयान पिढया स्व.पी.डी.पाटील यांच्या कार्याची साक्ष देतील. अशा उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या नावाचा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील तपस्वी प्रा.डॉ.शिवाजीराव कदम यांना प्रदान करण्याचे भाग्य मला मिळणे हे मी माझे भाग्यच मानतो

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, शाळांना चांगली शिस्त लागावी व शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी आदरणीय पी.डी.पाटील गौरव प्रतिष्ठाणच्या वतीने दर वर्षी स्वच्छ शाळा, सुंदर शाळा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तर स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी हजारो विद्यार्थांचे एक ताल एक सुरात समुह गित गायन करण्यात येते. तसेच प्रतिवर्षी राज्यभर आपल्या कार्यकतृत्वाचा ठसा उमटवणाऱया मान्यवराला आदरणीय पी.डी.पाटील महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. पुण्यात स्थापन झालेल्या भारती विद्यापिठाने देशात ठसा उमटवला आहे. अशा भारती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.शिवाजीराव कदम यांना यंदाचा आदरणीय पी.डी.पाटील महाराष्ट्र भुषण पुरस्कार देण्यात येत असल्याचे आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले. प्रास्ताविक डॉ.अशोक गुजर यांनी केले. मानपत्र वाचन मुकुंद कुलकर्णी यांनी केले. तर आभार ऍड.मानसिंगराव पाटील यांनी मानले.

   


No comments:

Post a Comment