वेध माझा ऑनलाइन - वेदांता-फॉक्सकॉन हा हजारो कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (बुधवार) दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यात केंद्रीय मंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले जात आहे.
वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प गमावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शिंदे हे दिल्ली दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
No comments:
Post a Comment