वेध माझा ऑनलाइन - भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते अमित शहांसोबत फोनवर चर्चा केल्यामुळे घरवापसीची चर्चा रंगली आहे. मात्र, या चर्चेवर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्याबद्दल मला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया देऊन पुढे बोलण्याचं टाळलं.
भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत एकनाथ खडसे हे दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. पण, अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही. पण एकनाथ खडसे यांची फोनवरुन अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे अशी माहिती खुद्द भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली. या खुलाशानंतर खडसेंच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. मात्र, याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याचं टाळलं आहे.
अमित शहा आणि एकनाथ खडसे यांनी फोनवर चर्चा झाली, याबद्दल मला कल्पना नाही, असी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
No comments:
Post a Comment