Wednesday, September 14, 2022

कराडचे चंद्रकुमार डांगे रोटरी क्लबच्या बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्डने सन्मानित ;

वेध माझा ऑनलाइन - रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 सन 2021-22 चा वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच लातूर येथे संपन्न झाला. वर्षभरामध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट मधील एकूण 13 जिल्ह्यांमधील शंभर क्लबमधून निवडून हे पुरस्कार दिले जातात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ ओम प्रकाश मोतीपावले यांचे हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले रोटरी क्लब ऑफ कराडने संपूर्ण वर्षभरामध्ये केलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन यावेळी क्लबला सन्मानित करण्यात आले 

यावेळी प्रेसिडेंट चंद्रकुमार डांगे  सेक्रेटरी अभय पवार, राजेश खराटे, डॉ राहुल फासे, किरण जाधव, प्रबोध पुरोहित, गजानन माने, डॉ शेखर कोगनुळकर, बद्रीनाथ धस्के, सौ रुपाली डांगे, निखिल डांगे व सेजल डांगे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment