Saturday, September 17, 2022

आम्ही अजित पवारांना गद्दार म्हणायचं का?गुलाबराव पाटील यांचा खोचक सवाल...काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन - शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये आरोपप्रत्यारोप होताना पहायला मिळत आहे. दरम्यान एकेकाळी शिवसेनेचे कट्टर असलेले गुलाबराव पाटील यांच्यावर शुक्रवारी विरोधी पक्षनेते अजित पवार  यांनी टीका केली होती. यावर आता गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. जळगावमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्यात पाटील बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले कि, अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत. टीका करणं त्यांचे काम आहे. पण अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का, असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला आहे.

या सरकारने शेतकऱ्यांना मदत केली, साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले हे पण त्यांनी मान्य करायला पाहिजे. परंतु त्यांनी आम्हाला गद्दार म्हटले आहे, ते आम्हाला मान्य आहे, असे पाटील म्हणाल. मात्र अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, सरकारच्या चांगल्या व वाईट अशा गोष्टी सांगण्याची जबाबदारी त्यांची होती असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

तीन पक्ष एकत्र लढतील वाटत नाही
महाविकास आघाडीचे प्रॉपर उमेदवारच ठरत नाहीये, प्रॉपर मतदारसंघ ठरलेला नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अजून त्यांची युती पक्की झालेली नाही तर आमदारकीच्या निवडणुकीत कोण? आगामी विधानसभेत तीन पक्ष महाविकास आघाडी लढवतील असे आपल्याला वाटत नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.


No comments:

Post a Comment