वेध माझा ऑनलाइन - मॉलमधील वाईन विक्री ही राज्याच्या आणि शेतकऱ्याचा हिताची आहे, अशी मत व्यक्त करत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मॉल मधून वाईन विक्री होण्याबाबतचे संकेत दिले आहेत? ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रकरणी जनता नेमकी किती टक्के समर्थनात आहे आणि किती टक्के विरोधात आहे याचा अंदाज काहीच दिवसात विभागाला येईल. त्यानंतर आम्ही स्वत: या विषयाचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चाही करणार आहे. सगळ्यांचा आदेश घेऊन हा वाईन विक्रीचा निर्णय घेतला जाईल, असंंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय त्यांच्या काळात घेतल्याचं सांगितलं जात होतं. मात्र या निर्णयाला तेव्हा भाजपने आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून विरोध केला होता. तसेच हे मद्यप्यांचे सरकार आहे अशा शब्दात त्यांनी तेव्हा टीकाही केली होती. या विषयी सध्या उलटसुलट चर्चा पुन्हा सूरु झाली आहे
No comments:
Post a Comment