वेध माझा ऑनलाइन - कराडला कोयना कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोयनेश्वर मंदिरात पाणी शिरले आहे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच कोयना धरणाचे वक्र दरवाजे तीन फुटावर घेण्यात आले असून धरणात 39 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असून धरणात 39 हजार 265 क्युसिक पाण्याची प्रति सेकंद आवक होत आहे सध्या धरणात 104.82 टीएमसी पाणीसाठा असून धरणाचे दरवाजे शनिवारी पाच वाजता साडेचार फुटावरून तीन फुटावर आणण्यात आले आहेत यामुळे सध्या धरणातून 28 हजार 948 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे दरम्यान या विसर्गामुळे कोयना कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कराडच्या कोयनेश्वर मंदिरात पाणी शिरले आहे.. दरम्यान कोयना धरणातील विसर्गामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे असा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाने दिला आहे
No comments:
Post a Comment