वेध माझा ऑनलाइन ; एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याचवेळी सत्ताधारी विरुद्ध विरोधक असाही राजकीय कलगीतुरा पाहायला मिळत आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ घेत आज मंत्री शंभूराज देसाई यांनी खोचक शब्दांत टोला लगावला. तसेच, स्थानिक राजकारणावरून त्यांनी अजित पवारांना सूचक इशाराही दिला आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करा
अजित पवार उपमुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत काम केल्याचं यावेळी शंभूराज देसाई म्हणाले आहेत. “कुणी कुणाला गद्दार म्हणावं? अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या दोन खात्यांचा मी राज्यमंत्री होतो. मी दादांचं काम जवळून पाहिलं आहे. पण अजित पवारांनी आम्हाला गद्दार म्हणताना एकाच गोष्टीचा विचार करावा की..... हा शिवसेनेतला अंतर्गत प्रश्न आहे... आम्ही आजही शिवसेनेतून बाहेर गेलेलो नाही... आम्ही शिवसेनेतच आहोत, असा सल्ला देत त्यांनी यावेळी हळुवार टोलाही लगावला...
No comments:
Post a Comment