वेध माझा ऑनलाइन : औरंगाबादेतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. MIM चे माजी नगरसेवक अज्जु नाईकवाडे यांना मारहाण करण्यात आली आहे. शहरातील चिश्तीया या भरचौकात त्यांना मारहाण करण्यात आली आहे. डोक्यात रॉड मारल्याने डोके फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे. उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जुन्या वादातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. .
No comments:
Post a Comment