वेध माझा ऑनलाईन - जिल्हा परिषदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे त्यामध्ये राज्यातील केवळ 9 ठिकाणी खुल्या गटासाठी आरक्षण पडले आहे तर 11 ठिकाणी महिलासाठी राखीव प्रवर्ग राहिला आहे आता सर्वांना पुढील अध्यादेशाची प्रतीक्षा आहे
दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे आता लवकरच प्रलंबित पालिका निवडणुकांचेही बिगुल वाजणार असे संकेत मिळत आहेत
याबाबतचे राजपत्र राज्यसरकारने रात्री उशिरा जाहीर केले आहे. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करत अनेकांना धक्का दिला आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. राज्यात केवळ रत्नागिरी आणि सातारा येथेच ओबीसी महिला आरक्षण पडले आहे.दरम्यान, प्रलंबित असणाऱ्या पालिका निवडणुकांचेही लवकरच बिगुल वाजतील असे संकेत यानिमित्ताने मिळत आहेत
No comments:
Post a Comment