वेध माझा ऑनलाइन - जळगाव जिल्ह्यात पोलीस दलात विभागात काम करणा-या पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या किरणकुमार बकाळे यांनी मराठा समाजाबद्दल जातीवाचक आणि बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कराड तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने बकालेना बडतर्फ करुन अटक करण्यात यावी असे निवेदन कराडचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बी आर पाटील यांना देण्यात आले.
यावेळी तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने समाजा-समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य बकालेनी केले असल्याने त्यांचे नुसते निलंबन करुन उपयोग नाही. तर त्यांना बडतर्फ करुन अटक करण्याचीही मागणी मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी केली.यावेळी मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या
No comments:
Post a Comment