वेध माझा ऑनलाइन - कराडच्या पालिका कर्मचाऱ्याचा काल ड्रेनेज साफ करताना दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेबाबत माझे येथील सी ओ डाके यांच्याशी बोलणे झाले आहे मृत कर्मचाऱ्याच्या घरच्यांना आवश्यक ती शासकीय मदत मिळेल मात्र या घटनेची चौकशी झाली पाहिजे असे आपलं मत असल्याचे सूतोवाच माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथील आयोजित पत्रकार परिषदेत केले
आ चव्हाण पुढे म्हणाले, माझ्या काँग्रेस सोडण्याबाबत काहीजण मुद्दामहून बातम्या पसरवत आहे मात्र मी काँग्रेस मधेच राहणार आहे चिंता करू नका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नाराज आहेत का याबाबत काहीच माहीत नसल्याचेही त्यांनी आज येथे स्पष्ट केले
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आ पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस श्रेष्ठीना सल्ला देण्यावरून टीका केली होती त्याविषयी बोलताना आ चव्हाण म्हणाले मी काही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतोय पक्षांतर्गत निवडणूक त्याचाच एक भाग आहे त्यात काँग्रेसचेच हित आहे पण शिंदे यांना ते नको असेल तर चालुद्या आहे असं,...माझं काहीच म्हणणं नाही.. दरम्यान, काँग्रेसमध्ये पूर्णवेळ देणारा अध्यक्ष असावा ही मागणी सोनिया गांधींना मान्य असल्याचेही ते म्हणाले
काँग्रेस एकमेव पक्ष आहे की जो भाजप ला टक्कर देऊ शकतो त्यामध्ये नेमणूक पध्दतीने अध्यक्ष न होता निवडणुकीने व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली...
वेदांता फॉक्सकोन प्रकल्प राज्यातून गुजरातला गेला या गोष्टीला पंतप्रधान मोदींचे हुकूमशहा राजकारण कारणीभूत असल्याचे सांगून ते म्हणाले गुजरातचे महत्व वाढवून मुंबईचे महत्व कमी करण्याकडे मोदींचा कल आहे एवढा मोठा प्रकल्प हायजॅक करण्याचा या अगोदर कधीही प्रयत्न झाला नसल्याचे त्यांनी सांगितले
सध्याचे राज्यातील सरकार हे फार टिकेल अशी परिस्थिती नाही...कधीही पडेल...त्यामुळे पुढील मंत्रीपद विस्तार आणि जिल्ह्याची पालकमंत्रीपदे अद्याप दिली नसावीत अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली
दरम्यान जिल्ह्यात "लम्पि' आजाराचा प्राधुरभाव जनावरांमधून संसर्गजन्य पद्धतीने होत असल्याचे सांगून ज्या ठिकाणी बाधीत जनावरे आहेत त्या परिसराच्या 5 किलोमीटरच्या अंतरात या आजाराचे लसीकरण सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले
No comments:
Post a Comment