वेध माझा ऑनलाइन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कराड दक्षिणच्यावतीने कृष्णा फिजीओथेरपी महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले. या शिबीरात १०७ जणांनी रक्तदान करुन सहभाग नोंदविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान भारतीय जनता पार्टीच्यावतीने सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आजपासून रक्तदान शिबीराच्या आयोजनाने करण्यात आला. भाजपा कराड दक्षिणच्यावतीने कृष्णा फिजीओथेरपी महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या शिबीरात १०७ जणांनी रक्तदान करुन सहभाग नोंदविला.
याप्रसंगी कृष्णा कारखान्याचे संचालक बबनराव शिंदे, सयाजी यादव, मोहनराव जाधव, राजू मुल्ला, सुरेश खिल्लारे, तानाजी देशमुख, चंद्रहास जाधव, डॉ. सारिका गावडे, संजय पवार, हर्षवर्धन मोहिते, धनाजी माने, संतोष हिंगसे, प्राचार्य डॉ. जी. वरदराजुलू यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment