वेध माझा ऑनलाइन - तुमची काही महत्त्वाची बँकेतील कामं असतील तर ती याच महिन्यात करून घ्या. ऑक्टोबर महिन्यात सगळ्यात जास्त सुट्ट्या असणार आहेत. ऑक्टोबर सणांचा महिना असल्याने या महिन्यात देशभरात २१ दिवस बँक बंद राहणार आहे. दुर्गा पूजा, दसळा, दिवाळी आणि छट पूजा यासोबत आणखी काही सण असल्याने सुट्ट्या असणार आहेत.
संपूर्ण महिन्यात फक्त 9 दिवस बँका काम करतील. म्हणजेच 21 दिवस बँकांमध्ये सुट्टी असेल. त्यामुळे तुमच्याकडेही बँकिंगची काही महत्त्वाची कामे असतील, जी तुम्हाला बँकेच्या शाखेत जाऊन करावी लागणार असतील तर ती तुम्ही याच महिन्यात करून टाका.
ऑक्टोबरमध्ये देशभरातील बँका 21 दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयने सुट्ट्यांची जी यादी जाहीर केली आहे, त्यातील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय स्तरावरील आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. त्याच वेळी, काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तराच्या असतात. त्या दिवशी बँकेच्या शाखा फक्त त्याच्याशी जोडलेल्या राज्यांमध्येच बंद असतात. वेगवेगळ्या राज्यांसाठी सुट्ट्यांची यादीही वेगळी असते.
वेध माझाच्या वाचकांसाठी बँकांच्या सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे...
1 ऑक्टोबर –बँक अर्धवार्षिक बंद (देशभर सुट्टी)
2 ऑक्टोबर – रविवार आणि गांधी जयंती सुट्टी
3 ऑक्टोबर – महाअष्टमी (दुर्गा पूजा) (अगरतला भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पटना, रांचीमध्ये बँक बंद)
4 ऑक्टोबर – महानवमी/श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव (अगरतला, बेंगळुरु, भुवनेश्वर, गुवाहाटी, कोलकाता, चेन्नई, गंगटोक, कानपूर, कोच्ची, कोलकाता, लखनऊ, पटना, रांची, शिलांग, तिरुवनंतपुरम भागांमध्ये सुट्टी)
5 ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दशहरा (विजय दशमी) देशभरात सुट्टी
6 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (गंगटोकमध्ये सुट्टी)
7 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (गंगटोक बँक बंद राहणार)
8 ऑक्टोबर – दुसरा शनिवार मिलाद-ए-शरीफ/ईद-ए-मिलाद-उल-नबी (सुट्टी)
9 ऑक्टोबर – रविवार
13 ऑक्टोबर – करवा चौथ (शिमला इथल्या बँकांना सुट्टी)
14 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू, श्रीनगर)
16 ऑक्टोबर – रविवार
18 ऑक्टोबर – कटि बिहू (गुवाहाटी)
22 ऑक्टोबर – चौथा शनिवार
23 ऑक्टोबर – रविवार
24 ऑक्टोबर – नरक चतुर्दशी
25 ऑक्टोबर – लक्ष्मी पूजा
26 ऑक्टोबर – गोवर्धन पूजा
27 ऑक्टोबर – भाऊबीज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / दीपावली / निंगोल चक्कूबा गंगटोक, इंफाल, कानपुर, लखनऊमध्ये सुट्टी)
30 ऑक्टोबर – रविवार
31 ऑक्टोबर– छठ पूजा (अहमदाबाद, रांची आणि पटनामध्ये सुट्टी)
No comments:
Post a Comment