Thursday, September 15, 2022

आज रात्री 11:00 वाजता कोयना धरणाचे 6 दरवाजे 3 फुटावर घेणार ; 27,400 क्युसेक्स पाण्याचा होणार विसर्ग ;

वेध माझा ऑनलाइन - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पर्जन्य आवक वाढल्याने आज दि 15 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 11:00 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रदरवाजे एका फुटावरून 3 फुट उघडून  27,400क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे.

धरण पायथा विद्युत गृहामधून 1050 क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 28,450क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment