वेध माझा ऑनलाइन - पत्राचाळीच्या कथित घोटाळ्याचा पैसा राऊतांनी कुटुंबातील सदस्य, सहकारी आणि या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराच्या नावाने विविध बनावट कंपन्यामध्ये गुंतवला असं ईडीच्या तपासात पुढे आले आहे. १ ऑगस्टला संजय राऊतांना अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार झाले. त्यात राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यावर पैसे जमा झाले असा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला चौकशीत सांगितले की, एप्रिल २०२१ मध्ये अधिग्रहित केलेल्या मद्य कंपनीमध्ये राऊतांचे व्यावसायिक हितसंबंध आहेत दरम्यान, प्रविण राऊत यांच्या २ कर्मचाऱ्यांना सामना कार्यालयात आलेले आणि थेट संजय राऊतांना पैसे सोपवताना पाहिलं आहे असंही त्यांनी सांगितले आहे
संजय राऊतांनी बेहिशेबी रोकड वापरून पत्नी आणि कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावे जमीन खरेदी केल्या. कुठल्याही गॅरंटीशिवाय राऊतांनी नातेवाईकांकडून कर्जाच्या नावाखाली पैसे घेतले. आई, भाऊ, चुलत भाऊ आणि अन्य लोकांकडून संजय राऊतांनी कर्ज घेतलेत ज्यांच्याकडे उत्पन्नाचं स्त्रोत नाही.
प्रविण राऊतांच्या २ कर्मचाऱ्यांनी संजय राऊतांना पैसे दिले होते असा दावा ईडीच्या तपासात या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. स्वप्ना पाटकर म्हणाल्या की, अलिबाग येथे खरेदी केलेल्या जमिनीवर संजय राऊतांना रिसोर्ट बांधायचं होतं. परंतु त्याठिकाणी असलेल्या सीआरझेड निकषांमुळे ही योजना फिस्कटली.
२००८ ते २०१४ या काळात मी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात स्तंभलेखिका होती. राऊतांना इंग्रजीत लेख लिहण्यात मदत करत होती. राज्यसभेच्या कामातही मी त्यांना मदत केली. या काळात या प्रकरणातील आरोपी प्रविण राऊत यांच्या २ कर्मचाऱ्यांना सामना कार्यालयात आलेले आणि थेट संजय राऊतांना पैसे सोपवताना पाहिलं आहे असं त्यांनी सांगितले.
ईडीच्या म्हणण्यानुसार, प्रविण राऊत हा संजय राऊतांसाठी ‘फ्रंट मॅन’ म्हणून काम करत होता. पत्रा चाळ प्रकल्पाबाबत साक्षीदाराने ईडीला सांगितले की, २००८-०९ दरम्यान परिसरातील रहिवाशांनी चाळीच्या पुनर्विकासासाठी स्थानिक नेत्यांमार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संपर्क साधला होता.
No comments:
Post a Comment