Friday, September 30, 2022

कराड पालिकेच्या प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून खास दखल ...ब्ल्यक फ्लाय सोल्जर प्रकल्पाचे कौतुक...

वेध माझा ऑनलाइन - मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर शासनाच्या नगर विकास विभागाने स्वच्छ सर्वेक्षण 2022 मधे बक्षीसपात्र महापालिका व नगर परिषदांनी या अभियानात केलेल्या विविध उपक्रमांचे प्रदर्शन आयोजित केले होते. राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनात कराड नगरपालिकेच्या स्टालला भेट देऊन पाहणी केली. तसेच कराड पालिकेच्या ब्लॅक फ्लाय सोल्जर या प्रकल्पासह विविध प्रकल्पांची खास दखल घेतली. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी अकरा वाजता झाले. या प्रदर्शनात पुणे,उल्हासनगर,नागपुर,नवी मुंबई,अहमदनगर या महा पालिकांबरोबर कराड,सिन्नर,वाई सिन्नर व दौंड या नगर परिषदांचा सहभाग होता.उद्घाटनानंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक कक्षाला भेट देवुन विविध उपक्रमांची माहीती घेतली.

कराड नगर परिषदेच्या कक्षात एसटीपी प्लांट,बायोगॅस,मेडीकल वेस्ट,कचरा वर्गीकरण.ब्लॅक सोल्जर फ्लाय या उपक्रमांच्या प्रतिकृती ठेवल्या होत्या. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी कराड नगर परिषदेच्या कक्षाला भेट देवुन विविध उपक्रमांची सविस्तर माहीती घेताना ब्लॅक सोल्जर फ्लाय या ओला कचरा निर्मुलनात वैशिष्ठ्यपुर्ण ठरलेल्या उपक्रमात विशेष रस दाखविला. यावेळी त्यांना या उपक्रमाची सविस्तर माहीती मुख्याधिकारी रमाकांत डाके व प्रोजेक्ट इनचार्ज सुधीर एकांडे यांनी दिली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल,नगर विकास सचिव मोपलवार,स्वच्छ सर्वेक्षणचे प्रमुख सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या महापालिका व नगर परिषदांनी कचरा निर्मुलनात बीएसएफ या नाविन्यपुर्ण उपक्रमाचा अंगिकार करावा असे अवाहन केले.पालिकेचे अधिकारी शुभांगी पवार गणेश जाधव, सुधीर खर्जुले, प्रमोद जगदाळे, अमित कांबळे, पुनम गव्हाणे, आनंद डांगे, श्रीकांत लोहार, सुजित साळुंखे, प्रताप पाटील, सुधीर एकांडे यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment