वेध माझा ऑनलाइन - छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक कराडमध्ये व्हावे, अशी कराडवासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. यासाठी स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची स्थापना करून येथील जुन्या भेदा चौकात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला. त्याच्या उभारणीस आता सातारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी मंजुरीही दिली आहे अशी माहिती समितीचे सचिव रणजित नाना पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली
यासाठी गेली दोन वर्षे सदर स्मारक समिती पाठपुरावा करत होती. नगरपालिकेने 16 फेब्रुवारीला ठराव करून जुन्या भेदा चौकातील जागा देण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर गेले सात महिने विविध शासकीय विभागाच्या परवानग्या मिळवल्या असून समितीने केलेल्या या प्रयत्नांना यश मिळाले आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी 16 सप्टेंबर 2022 रोजी कराड येथील नियोजित स्मारकाच्या उभारणीस मंजुरी दिली आहे.
यावेळी अध्यक्ष जयंत पाटील, सचिव रणजित पाटील, सदस्य एॅड. दीपक थोरात, प्रतापराव साळुंखे, प्रताप इंगवले, स्वाती पिसाळ, विद्या मोरे, भूषण जगताप यांच्यासह सर्व सदस्य पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
No comments:
Post a Comment