Tuesday, September 27, 2022

...तर मला मोदी देखील हरवू शकत नाहीत...भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे आश्चर्यकारक विधान...राज्यभर चर्चा...

वेध माझा ऑनलाइन -  मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हरवू शकत नाहीत असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडमधील अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यामित्ताने समाजातील "बुद्धिजिवी लोकांसोबत संवाद" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या.  त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. 

मी जनतेच्या मनात असले तर मोदीजीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत. काँग्रेस मध्ये वंशवादाचे राजकारण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा वंशवाद संपवत आहेत असे पकंजा मुंडे म्हणाल्या. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंशवाद संपवत आहेत हे सांगताना पंकजा मुंडे थोड्या थांबल्या आणि मी देखील वंशवादाचं प्रतिक असल्याचे त्या म्हणाल्या. पण मी तुमच्या मनात असेल तर मला कोणीही संपवू शकत नाही. जर जनतेच्या मनात मी असेल तर मोदीजी देखील माझं राजकारण संपवू शकत नाहीत, असं पंकजा मुंडे पुढं बोलताना म्हणाल्या. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणामध्ये आपल्याला वेगळेपण आणायचे आहे. आगामी काळात राजकारणात बदल करावा लागणार आहे. राजकारणामध्ये लोकहिताचे निर्णय होतात. परंतु, अलिकडे राजकारण हे करमनुकीचे साधन होत आहे. हे राजकारण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांना अपेक्षीत नाही. 
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी यापूर्वी देखील बोलताना अनेक वेळा नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे देखील त्यांनी या आधी म्हटले होते. त्यावेळीपासून त्यांना नेतृत्वाकडून डावलण्यात येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. ही खदखद पंकजा यांनी देखील आपल्या भाषणातून अनेक वेळा बोलून दाखवली आहे. त्यातच आता त्यांनी हे वक्तव्य केलंय.

No comments:

Post a Comment