Thursday, September 29, 2022

कराडचे युवा नेते अतुल शिंदें, पोपटराव साळुंखे, आणि सागर बर्गें यांची शंभू स्मारकासाठी लाखाची मदत...



वेध माझा ऑनलाइन - 
येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणीस जिल्हाधिकाऱयांनी मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर या स्मारकाच्या उभारणीसाठी निधी संकलन करण्यावर भर देण्याचा निर्धार स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीने केला आहे. स्मारक प्रतिकृतीच्या अनावरणप्रसंगी माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी 1 लाख 11 हजार 111 रूपयांची देणगी जाहीर केली तर, स्मारक प्रतिकृती अनावरण कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी शिवराज ढाबातर्फे 1 लाख 11 हजार 111 रूपयांची मदत जाहीर केली. तर मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे यांनी देखील 1 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे

येथील अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये या स्मारकाच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. स्मारक उभारण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने कराड शहर व तालुक्यात शिव-शंभूप्रेमींकडून प्रयत्न करण्याची ग्वाही देण्यात आली. स्मारक समितीने यापूर्वीच कराड तालुक्यात शंभू स्मारक संवाद यात्रा सुरू केली आहे. त्यामाध्यमातून निधी संकलन करण्यात येत आहे.  
दरम्यान, माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी आपल्या दातृत्वाचा परिचय करून देत याच कार्यक्रमात स्मारकासाठी 1 लाख 11 हजार 111 रूपयांची देणगी जाहीर करत ती समितीकडे सुपुर्द केली. तर स्मारक प्रतिकृती अनावरण कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी शिवराज ढाबातर्फे 1 लाख 11 हजार 111 रूपयांची मदत जाहीर केली. तर मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे यांनी देखील 1 लाख रूपयांची मदत जाहीर केली

समितीच्या वतीने रणजितनाना पाटील यांनी त्यांचे आभार मानले.  
स्मारक उभारणीसाठी लोकसहभाग महत्वाचा असून शहरासह गावोगावच्या शिव-शंभूप्रेमींनी निधी संकलनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन रणजितनाना पाटील यांनी यावेळी केले.  


No comments:

Post a Comment