Saturday, September 17, 2022

कराड शहर भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस उत्साहात साजरा ;

वेध माझा ऑनलाइन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज देशात सर्वत्र भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन होत असताना कराड शहर भाजपच्या वतीने देखील पंतप्रधान मोदींचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आज  कराड शहर भाजपच्या वतीने येथील मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला त्यानंतर त्या मुलांना खाऊ वाटपही करण्यात आले 
तसेच येथील कॉटेज हॉस्पिटल येथील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाची सोय देखील येथील रोटरी क्लबच्या सहकार्याने कराड शहर भाजपच्या वतीने करण्यात आली होती
यावेळी भाजप शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगांवकर, घनःश्याम पेंढारकर, नितीन वास्के विशाल कुलकर्णी, राजु कुंडले, सुनील पावसकर, प्रमोद शिंदे, किसन चौघुले, गणेश कापसे, मुठेकर, दत्ता कलबुर्गी आदी मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment