Sunday, May 9, 2021

18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सत्राचे आयोजन

सातारा 
10 मे 2021 पासून सातारा जिल्ह्यातील  खालील ठिकाणी 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. सदर सत्रे ही फक्त 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठीच असून ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करुन अपॉइनमेन्ट घेणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी उद्या दि. 10 मे 2021 पासून रोजी सकाळी 11 www.cowin.gov.in किंवा https://selfregistration.cowin.gov.in या संकेत स्थळावर आपली अपॉइनमेन्ट निश्चित करता येईल. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. 
         सातारा जिल्ह्यातील  खालील प्रमाणे कोविड लसीकरण सत्राची ठिकाणे : कराड येथील उपजिल्हा रुग्णालय, कोरेगांव येथील ग्रामीण रुग्णालय,खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,पाटण येथील ग्रामीण रुग्णालय,फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय,महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय, माण येथील ग्रामीण रुग्णालय,दहिवडी. मेढा येथील ग्रामीण रुग्णालय,वाई येथील ग्रामीण रुग्णालय,खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,शिरवळ. व सातारा येथील जिल्हा रुग्णालय,सातारा.असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी कळविले आहे. 
                                              0000

2334 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 59 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि. 9 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2334 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 59 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 148 (5908), कराड 379 (18190), खंडाळा  171 (7590), खटाव 281(10717), कोरेगांव 149 (10335),माण 231 (7972), महाबळेश्वर 17 (3528), पाटण 91 (5061), फलटण 288 (16320), सातारा 424(27816), वाई 140 (9179 ) व इतर 15 (685) असे आज अखेर  एकूण   123301  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 18 (126), कराड 8 (503), खंडाळा 1 (97), खटाव 5 (294), कोरेगांव 3(260), माण 3 (162), महाबळेश्वर 0 (36), पाटण 1 (129), फलटण 2 (208), सातारा 13(839), वाई 5 (233) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2887 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमधील वॉर्ड बॉयला अटक;...करत होता रेमिडिसवरचा काळाबाजार...

सातारा दि. 9 
जिल्हा प्रशासन रोजच्या रोज रुग्णालयांच्या मागणीनुसार 35 टक्के रेमिडिसवर पुरवठा करीत आहेत. फलटण येथील सुविधा हॉस्पीटलमध्ये  वॉर्ड बॉय रेमिडिसवर काळाबाजार करीत असल्याचे समजताच,अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक अरुण गोडसे यांनी वॉर्ड बॉयला रंगेहात पकडले.
 हा वॉर्ड बॉय रेमिडिसवरचे एक इंजेक्शन  35 हजार रुपयांना विकत असल्याचे निर्दशनास आले आहे. या वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली असून पोलीस विभाग पुढील तपास करीत आहे. यापुढे असा कोणी रेमिडिसवर औषधाचा  काळाबाजार करीत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
00000

Saturday, May 8, 2021

शहरातून निर्जंतुकीकरण करण्यास कराड पालिकेच्या आरोग्य सभापतींचा विरोध - नगराध्यक्षांचा आरोप...शहरासाठी नव्हे तर, फोटोसेशनसाठी अध्यक्षांचा खटाटोप...वाटेगावकरांचा आरोप...


वेध माझा ऑनलाइन 
कराड
नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी सध्याच्या कोरोना संकटात सम्पूर्ण शहरातून निर्जंतुकीकरण सुरू केले आहे मात्र शहरातील एका प्रभागात चक्क पालिकेच्या आरोग्य सभापतींनीच निर्जंतुकीकरण करण्यास विरोध केल्याची माहिती स्वतः नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी दिली दरम्यान वाटेगावकर यांनीही नगराध्यक्षावर याबाबत बोलताना आरोप केले आहेत फोटोसेशनसाठी त्यांचा हा खटाटोप असल्याचे ते म्हणाले आहेत...

या एकूणच घडलेल्या प्रकाराबद्दल बोलताना नगराध्यक्षा सौ शिंदे म्हणाल्या शुक्रवार पेठेतील काही लोकांनी त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याबाबत मला विनंती केली होती त्यामुळे मी रोजच्याप्रमाणे शहराच्या निर्जंतूकिकरणासाठी बाहेर पडले त्यावेळी मी पालिका कर्मचाऱ्यांना या कामाबाबत सूचना करून शुक्रवार पेठेत नियोजित जागेवर येण्यास सांगितले मात्र त्या ठिकाणी कोणी आलेले दिसले नाही... मग मी माहिती घेतली असता धक्कादायक बाब समोर आली ...चक्क आरोग्य सभापतीं गुंड्याभाऊ वाटेगावकर यानी आरोग्य कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षानी बोलावलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याकरिता जायचं नाही असे धमकावले अशी माहिती समोर आली... आपल्या वार्डात मला न विचारता फवारणी करायची नाही... मी आरोग्य सभापती आहे... अशा प्रकारची चर्चाही कर्मचारी व वाटेगावकर यांच्यात झाल्याचे त्यांनी सांगितले...

याबाबत बोलताना वाटेगावकर म्हणाले आरोग्य विभागाने फवारणी संबंधी नियोजन केले आहे त्यानुसार कर्मचारी काम करत आहेत त्यात अध्यक्षांचा हस्तक्षेप नको आहे तरी फक्त फोटोसेशनसाठी अध्यक्ष काम करत आहेत ज्या वार्डात काम करायचे त्याठिकाच्या नगरसेवकाला तेथील काम करताना कल्पना देणेही गरजेचे आहे 

रतर नगराध्यक्षा सौ शिंदे व आरोग्य सभापती वाटेगावकर या दोघांचेही शहराच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत मोठं काम आहे...मग आत्ताच असलं राजकारण का..? असा शहराला पडलेला सवाल आहे... शहरात कोरोनाचा  प्राधुरभाव प्रचंड वाढला असताना कोणत्या वार्डात कोण काम करतंय हे महत्त्वाचं नाही... तर प्रत्येक वार्ड सॅनिटायझिंग करून शहराचे आरोग्य जपण्याची गरज आहे रोजचे वाढते पेशंट, त्यांना न मिळणारी सुविधा, वाढता मृत्युदर थरकाप उडवणारा असताना, अशावेळी राजकारण
करणे कितपत योग्य आहे...? राजकारण करायला शहरातील अनेक विषय आहेत मात्र, कोरोना संकटात राजकारण विरहित एकत्र काम करून शहराला कोरोनामुक्तीकडे नेणें महत्वाचे आहे...अशी चर्चा आहे. वाटेगावकर् यानी आपल्या वार्डात नगराध्यक्षा सौ शिंदे याना निर्जंतुकीकरण करण्याकरिता केलेल्या विरोधाबाबत मात्र शहरातूंन आश्चर्य व्यक्त होतंय...

Thursday, May 6, 2021

2292 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 40 बाधितांचा मृत्यू

सातारा दि. 6 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2292 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 40 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 92 (5527), कराड 279 (17285), खंडाळा  81 (7139), खटाव 312 (10035), कोरेगांव 127 (9743),माण 179 (7467), महाबळेश्वर 36 (3468), पाटण 144 (4827), फलटण 392 (15175), सातारा 483 (26393), वाई 147 (8731 ) व इतर 20 (627) असे आज अखेर  एकूण   116417  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2 (108), कराड 6 (475), खंडाळा 4 (92), खटाव 3 (281), कोरेगांव 4 (253), माण 1 (152), महाबळेश्वर 0 (34), पाटण 0 (123), फलटण 3 (197), सातारा 12 (805), वाई 5 (220) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2740 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000

Wednesday, May 5, 2021

ज्ञानदेव अण्णा पाटील - आटकेकर यांचे निधन...येत्या 9 तारखेला होणार दशक्रिया विधी...

कराड
 मंगळवार पेठ पाटील गल्ली येथील जितेंद्र पाटील यांचे वडील व भाजपाचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष पैलवान धनाजी पाटील (आटकेकर) यांचे चुलते ज्ञानदेव अण्णा पाटील- आटकेकर (आप्पा) यांचे शुक्रवार दिनांक 30 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 88 वर्षाचे होते
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुली नातवंडे असा परिवार आहे

 दशक्रिया विधी दिनांक 9 रोजी व उत्तरकार्य दि 12 रोजी घरगुती पद्धतीने मंगळवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे
उपनगराध्यक्ष जयवन्त पाटील,माजी नगरसेवक अशोक पाटील ,अरुण पाटील,सुरेश पाटील धनाजी पाटील यांचे ते नातलग होत.

2376 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 58 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि. 5 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2376 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 58 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 128 (5442), कराड 310 (17006), खंडाळा  183 (7058), खटाव 215 (9753), कोरेगांव 193 (9616),माण 151 (7288), महाबळेश्वर 27 (3432), पाटण 153 (4683), फलटण 410 (14783), सातारा 409 (25990), वाई 175 (8584 ) व इतर 22 (607) असे आज अखेर  एकूण   114242  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (106), कराड 17 (469), खंडाळा 3 (88), खटाव 5 (278), कोरेगांव 5 (249), माण 4 (151), महाबळेश्वर 0 (34), पाटण 3 (123), फलटण 0 (194), सातारा 12 (793), वाई 9 (215) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2700 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
0000