Monday, December 4, 2023

मराठा आरक्षणाबाबत वाचा मोठी बातमी ! 6 डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी ;

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर 6 डिसेंबर रोजी पहिली सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सुनावणीमध्ये अॅड. जयश्री पाटील विरोधक आहेत.

राज्य सरकारने 13 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडत आहे. या याचिकेवर आता मराठा आरक्षणाचे सर्व भवितव्य अवलंबून असणार आहे. राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेटले आहे. अशातच आता सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या सुनावणीवर मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे. 
मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झाले होते. त्याच निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 5 सदस्यांनी याबाबत रीतसर सुनावणी घेऊन मराठा समाजाची आरक्षणाची मागणी फेटाळून लावत मराठा समाजाला आरक्षण देता येणे शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले होते. 
राज्य शासनाने 2018 साली एसईबीसी कायद्यांतर्गत मराठा समाजाला दिलेले आरक्षण मराठा समाज सामजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. त्यावेळी  मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये राज्य शासनाने दिलेले आरक्षण या निर्णयामुळे रद्द झाले होते. मराठा समाज शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे कोर्टात सिद्ध करण्यात याचिकाकर्ते अपयशी ठरल्याने न्यायालयाने हे आरक्षण  रद्दबातल ठरवले होते. 
सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना 3:2 मतानुसार राज्यघटनेच्या 102 व्या दुरुस्तीनुसार राज्य सरकारला कोणत्याही एका समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करण्याचे अधिकार नसल्याचे निरीक्षण नोंदवले होते. यानंतर केंद्र सरकारने राज्य शासनाला  एसईबीसी ठरवण्याचा अधिकार नसल्याचा युक्तिवाद करत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची याचिका देखील फेटाळून लावल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग अवघड झाला होता.

मुजावर कॉलनीतील झालेल्या स्फोटाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला ! ...वाचा काय आहे हा रिपोर्ट...?

वेध माझा ऑनलाइन।
कराडातील मुजावर कॉलनीत ओक्तोबर महिन्यात मोठा स्फोट झाला होता. त्यामध्ये  घराच्या भिंतींची पडल्या होत्या  आहे. आता या स्फोटाबाबतचा फाॅरेन्सिक लॅबचा रिपोर्ट समोर आला असून त्यामध्ये झालेला स्फोट कोणत्याही स्फोटक वस्तूमुळे झाला नसल्याचे त्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे सदरचा अहवाल कराड शहर पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान या सर्व घटनाक्रमाबाबत आमदार नितेश राणेंनी कराडात येऊन जी शंका व्यक्त केली होती ती यानिमित्ताने खोटी ठरली आहे असेच म्हणावे लागेल.

Breaking...

कराडात डॉ अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने राबवला आयुष्यमान भारत योजना उपक्रम ; हा उपक्रम जनतेच्या हिताचा ; अभिषेक भोसले


वेध माझा ऑनलाईन। देशातील प्रत्येक वर्गाला उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेद्वारे कोट्यवधी अल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीय लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळत आहे. हि योजना खरोखरच नागरिकांच्या हिताची असल्याचे मत डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे अभिषेक भोसले यांनी व्यक्त केले.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत भाजप सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक भोसले मित्रपरिवाराच्या वतीने बुधवार पेठ येथील कराड नगरपरिषद शाळा क्र 10 मध्ये नुकतेच मोफत लाभार्थी कार्ड नोंदणी अभियान शिबीर घेण्यात आले. यावेळी आरोग्य मित्र म्हणून संभाजी पाटील, कल्पेश सुतार, दिलीप जाधव,ओंकार ढेरे ,सागर माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमेटीचे अध्यक्ष राहुल भोसले, रमेश मोहिते, नितीन शहा, विकी वाघमारे, वैभव आवळे, आनंदकुमार तपासे, समता पर्व कराडचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी अभिषेक भोसले म्हणाले की, 23 सप्टेंबर 2018 रोजी ही योजना सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देशातील सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. यासोबतच रुग्णालयात दाखल केल्यानंतरही पुढील 15 दिवसांचा सर्व खर्च सरकार उचलते. या योजनेची विशेष बाब म्हणजे यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांचे वय आणि संख्या लक्षात घेऊन योजनेचा लाभ मिळतो. यावेळी १७८ नागरिकांनी या शिबिरात सहभागी घेतला.

यामध्ये तुम्हाला एक रुपयाही रोख भरावा लागणार नाही. कारण आयुष्मान योजना ही पूर्णपणे कॅशलेस योजना आहे. कराड येथे या योजनेचा लाभ नागरिकांना मिळवून देण्यासाठी कराड नगरपरिषद शाळा क्र 10 मध्ये मोफत लाभार्थी कार्ड नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे. कराड येथील शिबिराचा १७८ हुन अधिक नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला आहे. आयुष्यमान भारत कार्ड धारकांना कृष्णा वैद्यकीय रुग्णालय येथे 5 लाखापर्यंत मोफत उपचार दिले जात असल्याचे भोसले यांनी यावेळी म्हंटले.


कोयना वसाहत येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन : युवा नेते यशराज देसाई व विनायक भोसले यांची उपस्थिती; २० लाखांचा निधी मंजूर ;

वेध माझा ऑनलाइन। कोयना वसाहत (ता. कराड) येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य उत्पादनशुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांच्या माध्यमातून २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

शिवदौलत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून कोयना वसाहत येथे मंजूर झालेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी यशराज देसाई व विनायक भोसले यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून, कोयना वसाहतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

यावेळी सरपंच सौ. सुवर्णा वळीव, उपसरपंच उमेश कुलकर्णी, शिवाजीराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य विनायक कुलकर्णी, चंद्रशेखर पाटील, सम्राट पाटील, निलेश भोपते, रजनी गुरव, सुनीता भोसले, संगीता पाटील, कुसूम पुजारी, शीतल जाधव, ग्रामविकास अधिकारी दिपक हिनुकले, माजी उपसरपंच महेश कुलकर्णी, माजी ग्रा.पं. सदस्या सुषमा कोळेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Sunday, December 3, 2023

सातारा जिल्हा भाजपचा कराडच्या चावडी चौकात आनंदोत्सव साजरा ; तीन राज्यातील भाजपचा विजय हा जनतेच्या मोदींवरील विश्वासाचा विजय ; धैर्यशील कदम

वेध माझा ऑनलाईन।  देशातील राजस्थान मध्यप्रदेश छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यातील निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले त्यामध्ये तीन राज्यात भाजपची निर्विवाद सत्ता आली त्याबद्दल सातारा जिल्हा भाजप च्या वतीने कराडच्या चावडी चौक येथे पेढे वाटून  फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी ठेक्यावर ताल धरत डान्स देखील केला
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम युवा नेते रामकृष्ण वेताळ जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील शहर अध्यक्ष एकनाथ बागडी माजी नगरसेवक सुहास जगताप श्री पेंढारकर महिला आघाडीच्या नेत्या सौ स्वाती पिसाळ सीमा घार्गे शीतल चौगुले
तसेच युवा नेते प्रशांत कुलकर्णी अजय पावसकर संतोष काळे दिलीप जाधव सागर माने धनंजय माने सुनील शिंदे सागर शिवदास धनंजय खोत विशाल कुलकर्णी दिलीप रामदासी शैलेंद्र गोंदकर नितीन शाह सौरभ शाह सागर मिरजकर मानसिंग कदम भरत देसाई धनंजय खैर संतोष हिंगसे रविकुमार अवसरे विषवनाथ फुटाणे ओंकार ढेरे प्रकाश जाधव गणेश मोहिते हर्षद मोहिते रमेश मोहिते सागर लादे नितीन वास्के तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले या सर्व राज्यातील विजयाचे श्रेय निवडणुकीत झटणारे सर्व कार्यकर्ते मतदार यांना दिले पाहिजे तसेच आपल्या देशाला स्वयंपूर्ण व सुरक्षित बनवायचे असेल तर नरेंद्र मोदिशिवाय पर्याय नाही हे जनतेने जाणले आहे विरोधातील इंडिया आघाडी ने या तिन्ही राज्यांत भाजप विरोधात कितीही अपप्रचार केला तरी जनतेने त्यांना थारा दिला नाही काहिठिकानी मोफत सुविधा देण्याची आश्वासने देत मतदारांना ओढण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला मात्र नरेंद्र मोदींवरील विश्वास आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळे भाजप ला याठिकाणी विजय मिळाला आहे महाराष्ट्रात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुती चे 45 हुन अधिक तर विधानसभेला 225 हुन अधिक उमेदवार निर्विवाद निवडून येतील असा विश्वास देखील जिल्हाध्यक्ष कदम यांनी व्यक्त केला 

दरम्यान 3 राज्यातील भाजप च्या भरघोस यशामुळे सातारा जिल्हा भाजप च्या पदाधिकाऱ्यांनी कराडच्या चावडी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत व पेढे वाटून आनंद व्यक्त केला...   देश का नेता कैसा हो...नरेंद्र मोदी जैसा हो...भाजप चा विजय असो...अशा घोषणांनी चावडी चौक दणाणून सोडला तेथे असलेल्या दुकानात जाऊन जिल्हाध्यक्ष कदम यांनी पेढे वाटप केले  संगीताच्या तालावर सर्व पदाधिकाऱ्यांनी डान्स  करत आपला आनंद त्याठिकाणी व्यक्त केला


देशाला मोदींशिवाय पर्याय नाही ; अजित पवार ; शरद पवारांवर केली टीका ,म्हणाले... काहींनी आशीर्वाद द्यायला पाहिजेत परंतु ते थांबायला तयार नाहीत ;

वेध माझा ऑनलाइन। तीन राज्यात भाजपने सत्ता खेचली आहे. तेलंगणा एबीव्हीपीचा कार्यकर्ता काँग्रेसने खेचला अन्यथा तेलंगणाचं चित्रही वेगळं दिसलं असते. आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झालं, भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. इंडिया, इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील. ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. मोंदींसमोर कोण उमेदवार असणार आहे हे सुद्धा विरोधकांचं ठरलं नाही. जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे. ईव्हीएम घोटाळा एकाला शक्य नाही.

कर्जतमध्ये दोन दिवसाचं शिबिर घेतलं. त्यावर वरिष्ठांनी काही प्रतिक्रिया दिली. मी अनेक वर्ष सत्तेत आहे. मला खोट बोलत येतं नाही. काहीजण दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनां प्रतिनिधी केलं आहे. आम्ही काही चांगलं करत आहोत. यासाठी नरेंद्र मोदी अमित शाह यांची मदत घेऊन महाराष्ट्राला एक नंबर करण्याच काम करत आहोत, असे अजत पवार म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय पुढाऱ्यांना अनेक ठिकाणी गावबंदी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, काहीजण लगेचच आरक्षण द्या अन्यथा मुंबईकडे येऊ म्हणत आहेत. परंतु टिकणारे आरक्षण देण्याच काम सुरू आहे. काहीजण गावबंदी आंदोलन करत आहेत त्यांना सांगणं आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं करू नये.

अजित पवारांनी यावेळी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणाले, काहींनी आशीर्वाद द्यायला पाहिजेत परंतु ते थांबायला तयार नाहीत त्यामुळे आम्ही बहुमताने निर्णय घेतला आहे. तीन राज्यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात देखील लोकसभा जागा निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार अहोत. 48 पैकी 45 जागा आम्ही निवडून आणणार आहोत.

Saturday, December 2, 2023

शरद पवार म्हणाले..भाजप बरोबर 2004 मधेच होणार होती युती ; शरद पवारांनी सगळंच उलघडून सांगितलं ;

वेध माझा ऑनलाइन। काल शुक्रवारी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबीर झाले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट करत त्यांनी सांगितले की, '२००४ मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युती करणार होते. याबाबत दिल्लीत बैठकाही झाल्या होत्या, जवळपास सर्व निश्चित झाले होते, असा मोठा गौप्यस्फोट केला होता. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता खासदार शरद पवार यांनी यावर खुलासा केला आहे. 

"प्रफुल्ल पटेल त्यावेळी माझ्या घरी येऊन काही तास त्यांनी आपण भाजपसोबत गेलं पाहिजे, असा आग्रही विषय मांडला. पण ती गोष्टी शक्य नाही असं मी त्यांना सांगितलं.  तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता, असंही मी त्यांना सांगितलं, यानंतर ते थांबले. पुढ त्यांचा निवडणुकीत पराभव झाला त्यावेळी पराभव होऊनसुद्धा पक्षाने त्यांनी केंद्रीय मंत्रिपद दिलं, असंही शरद पवार म्हणाले.

२००४ मध्येच होणार होती युती
राष्ट्रवादीची २००४ मध्येच भाजपसोबत युती होणार होती. जागावाटपही ठरले होते. पण त्यात त्यावेळी प्रमोद महाजन यांनी खोडा घातला. राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना- भाजप यांची युती करण्याचे तेव्हा ठरले होते.
अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या सूचनेवरून माझ्या घरी बैठक झाली होती. तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा लढवण्याचे ठरवले  होते. दिल्लीत जवळपास सर्व निश्चित झाले होते, असा गौप्यस्फोट पटेल यांनी केला.ही युती होणार म्हणून गोपीनाथ मुंढे खुश होते. परंतु चर्चेत मुंढे फारसे सहभागी नव्हते. प्रमोद महाजन यांना ही युती नको होती. कारण जर युती झाली असती, तर दिल्लीतील श्रेष्ठी शरद पवारांचे जास्त ऐकतील आणि आपले महत्त्व कमी होईल, असे त्यांना वाटत होते.महाजन यांनी ही बातमी बाळासाहेबांना सांगितली. त्यानंतर बाळासाहेबांनी काही विधाने केली आणि २००४ मध्ये होणारी युती फिसकटली, असा दावा त्यांनी केला.