Wednesday, May 8, 2024

कन्येकडे महाराष्ट्राच नेतृत्व देण्याची विनंती शरद पवारांनी काँग्रेसकडे केली होती./ काँग्रेसमध्ये विलीनिकरण करण्याबाबतच्या शरद पवारांच्या विधानावर माजी काँग्रेस नेत्याचा मोठा दावा ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राच्या राजकारणतील दिग्गज नेते शरद पवार यांनी आज एक मोठं विधान केलं. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असं माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे. यानंतर शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? या विषयी विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. आता एका माजी काँग्रेस नेत्याने या बद्दल मोठा दावा केला आहे. “शरद पवार अनेक दिवसांपासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत होते. शरद पवार यांनी आपल्या मुलीला महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली होती. ती काँग्रेसने फेटाळून लावली” असं दावा संजय निरुपम यांनी केला. संजय निरुपम मागची अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते. मुंबईत लोकसभेच्या जागावाटपावरुन त्यांचं पक्षासोबत बिनसलं. त्यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.

“बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी त्यांच्या मुलीकडे असलेली राजकीय कुशाग्र बुद्धिमत्ता अपुरी आहे. काँग्रेसनेही त्यांना अनेकदा हा प्रस्ताव दिला होता. मुलीबाबत समस्या होती. आता त्यांच्या पक्षाचे विघटन झाले आहे. त्यांच्या ताज्या विधानाचा अर्थ असा आहे की, बारामती त्यांच्या हातातून निसटून जाऊ शकते, कदाचित त्यांना तशी भीती वाटते. काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही” असं संजय निरुपम म्हणाले.
आपल्या पक्षाच्या विलीनीकरणा संदर्भात शरद पवार म्हणाले की, “काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही. या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचारांची आहे. परंतु यावर मी सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही. परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे कठीण आहे”

महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान, कुठं किती टक्के मतदान? कुठं झाली कमाल तर कुठं वाढलं टेन्शन?

वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्रात नुकतंच लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ५३.४० टक्के मतदान झाल्याची नोंद. आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी पाचपर्यंत सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर ६३. ७१ तर सर्वात कमी ४५.६८ टक्के मतदान हे बारामतीमध्ये झालंय.

महाराष्ट्रात नुकतंच लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ५३.४० टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. कोल्हापुरात सर्वाधिक मतदान झालं तर बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान झालंय. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ५ जागांवर ६१.९ टक्के मतदान झालं. ८ जागांवर दुसऱ्या टप्प्यात ५९. ६ टक्के तर तिसऱ्या टप्प्यात ११ जागांवर ५३. ४० टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर ६३. ७१ टक्के तर सर्वात कमी ४५.६८ टक्के मतदान हे बारामतीमध्ये झालंय. काँग्रेसने आमदारांना मतदानाची खास जबाबदारी सोपवली होती. त्याचा परिणाम कोल्हापुरातील मतदानाच्या टक्केवारीवरून दिसतोय. 



एकनाथ शिंदे म्हणाले होते...ईडी-सीबीआयवाले माझ्या मागे लागलेत…”, राऊतांनी सांगितला अयोध्या दौऱ्यातील प्रसंग

वेध माझा ऑनलाइन
एकनाथ शिंदे कसले शिवसैनिक? यांच्यासारखा डरपोक शिवसैनिक मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही, असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, “ते अटकेच्या भितीने भाजपाबरोबर पळून गेले.” शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे (विद्यमान खासदार) यांच्या प्रचारार्थ शिवसेनेने ठाण्यात आयोजित केलेल्या प्रचारसभेत संजय राऊत बोलत होते. यावेळी राऊत यांनी शिवसेना फुटण्यापूर्वी त्यांच्यात आणि एकनाथ शिंदेंमध्ये झालेलं संभाषण सांगितलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हाचा प्रसंग संजय राऊत यांनी सांगितला.

संजय राऊत म्हणाले, आम्ही सर्वजण १५ जून २०२२ रोजी अयोध्या दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा राजन विचारे, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, शिवसेनेचे आमदार, खासदार आमच्याबरोबर होते. आम्ही अयोध्या दौऱ्यावर असताना १४ जूनच्या रात्री हे महाशय (एकनाथ शिंदे) माझ्या खोलीत आले आणि मला म्हणाले, “आपण आता काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे”. त्यावर मी त्यांना विचारलं, “काय निर्णय घ्यायचा?” तर ते मला म्हणाले, “हे काही माझं तुरुंगात जायचं वय नाही.” मी त्यांना विचारलं, “तुम्हाला तुरुंगात कोण टाकतंय?” तर ते मला म्हणाले, “मला भीती वाटते, मी तुरुंगात जाऊ शकत नाही”. आमचा हा संवाद अयोध्येत रामाच्या साक्षीने चालला होता. ज्या रामाच्या प्राणप्रतिष्ठेला हे महाशय पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर गेले होते, त्या श्रीरामाच्या साक्षीने हा संवाद चालू होता.

संजय राऊत यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे मला म्हणाले, “तुम्ही काहीतरी करा…” त्यावर मी त्यांना विचारलं, “काय करायचं?” तर ते मला म्हणाले, “आपण मोदींबरोबर जायला पाहिजे”. मी त्यांना म्हटलं, “मोदींबरोबर का जायचं? इथे आपलं सगळं चांगलं चाललंय. आपल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार उत्तमपणे चाललं आहे. उद्धव ठाकरे यांच्या राज्यकारभाराने गती पकडली आहे आणि तुम्ही म्हणताय हा निर्णय बदलायला हवा, कशासाठी बदलायचा?” त्यावर ते मला एवढंच म्हणाले, माझी तुरुंगात जायची इच्छा नाही. “मी त्यांना (एकनाथ शिंदे) विचारलं तुम्हाला तुरुंगात कोण आणि का पाठवतंय? तुम्ही या राष्ट्रासाठी असं काय क्रांतिकारक काम केलं आहे? शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं असं काय कार्य केलं आहे? तुम्ही असं कोणतं भूमिगत कार्य केलं आहे की ज्यामुळे या देशाची सत्ता तुम्हाला तुरुंगात पाठवायला निघाली आहे?” त्यावर ते मला म्हणाले, “माझ्या मागे ईडी आणि सीबीआयवाले लागले आहेत”. मी त्यांना लगेच म्हटलं, “ईडी आणि सीबीआयवाले उगाच कोणाच्या मागे लागत नाहीत. ते माझ्याही मागे लागले होते, मात्र त्यांना मला सोडावं लागलं. त्यांना वाटलं, याला जास्त दिवस डांबून ठेवलं तर हा भिंती फोडून बाहेर येईल. त्यामुळे तुम्हाला कशाला फोन पकडतंय.” त्यावर ते मला म्हणाले, ‘आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, मी काही तुरुंगात जाणार नाही.” याचा अर्थ हे महाशय घाबरून पळून गेले आहेत. म्हणजेच यांच्याकडे निष्ठा, नैतिकता, विचार असं काहीच नाही.

Tuesday, May 7, 2024

मतदानावेळी सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी ? अजित पवारांच्या बंगल्यावर सुप्रिया सुळे का आल्या? काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी चुरशीची लढत रंगत असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी का पोहोचल्या? राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दादांच्या घरी जाण्याचं कारण सांगितलं...

मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या काटेवाडीतील घरी आल्या. बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी चुरशीची लढत रंगत असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी का पोहोचल्या? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी दादांच्या घरी जाण्याचं कारण सांगितलं. आपण अजित पवारांच्या भेटीसाठी नाहीतर अजित पवारांच्या आई आशा काकूंच्या भेटीसाठी आल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटलं. सुप्रिया सुळे जेव्हा घरी आल्या तेव्हा अजित पवार घरीच होते मात्र आपली त्यांच्याशी भेट झाली नाही. तसेच आशा काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे सुळेंनी म्हटलं तर अजित पवारांनी यावर अधिक न बोलता, आपल्याला काही माहिती नाही तर मी घरीच नव्हतो अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली...

शरद पवारांच्या विधानाने राजकारणात खळबळ ; म्हणाले...प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात ; पवारांनी आणखी काय टाकले बॉम्ब ? वाचा बातमी ...

वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं प्रत्येक विधान अगदी बारकाईने बघावं लागते… पवार कधी काय बोलतील? त्याचा अर्थ काय निघतो याचा थांगपत्ता मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांना सुद्धा लागत नाही. आताही शरद पवारांनी असच एक मोठं विधान करून देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असं भाकीत पवारांनी वर्तवलं आहे. काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय प्रादेशिक पक्षांना सर्वोत्तम आहे असं पवारांनी म्हंटल. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शरद पवारांनी हा राजकीय बॉम्ब टाकला आहे.

शरद पवार म्हणाले, 2024 च्या निवडणुकीनंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होऊ शकतो का? असा उलट सवाल केला असता काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या, आम्ही गांधी, नेहरू विचारसरणीचे आहोत. .परंतु त्यावर आत्ताच काही बोलणं योग्य नाही . सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही, याबाबतचा कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल असं म्हणत शरद पवारांनी चर्चाना उधाण आणलं आहे. महत्वाचे म्हणजे काही महिन्यापूर्वीच शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याच्या बातम्या प्रसारीत झाल्या होत्या, मात्र त्यावेळी त्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या होत्या.

शरद पवारांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत सुद्धा भाष्य केलं. उद्धव (ठाकरे) देखील (समविचारी पक्षांसोबत) एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. “मी त्याची विचारसरणी पाहिली आहे… ती आमच्यासारखीच आहे असं शरद पवारांनी म्हंटल. पवारांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरेंची अडचण होण्याची शक्यता आहे, कारण भाजप आधीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून डिवचत असते, त्यातच आता पवारांनी ठाकरेंचे आणि आमचे विचार एकसारखं असल्याचे बोलल्याने ठाकरेंची राजकीय अडचण होण्याची शक्यता आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात सरासरी 63 टक्के मतदान ; जिल्ह्यात तुतारी वाजणार की कमळ फुलणार ? जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा लोकसभा मतदारसंघात आज एकूण  63.7 % टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे... त्यामुळे आता जिल्ह्यात तुतारी वाजणार की कमळ फुलणार ?याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे

दरम्यान जिल्ह्यातील पाटण तालुक्यात 56.50 तसेच सातारा 62.77कराड उत्तर  65.33 कराड दक्षिण 65.68 वाई 60.78
आणि कोरेगाव तालुक्यात 67.51टक्के इतके मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे
गेले महिनाभर संपूर्ण जिल्ह्यात या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत चालले होते कोणाला तिकीट मिळणार ?कोण जिंकणार?मतदार संघ कोणत्या पक्षाला मिळणार? याबाबत तर्क लावले जात होते अखेर शरद पवारांचे निकटवर्तीय कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे हे तुतारी घेऊन तर उदयनराजे कमळ चिन्हावर उभे राहिले त्यानंतर प्रचाराचा धुरळा प्रचंड प्रमाणात उडाला या निवडणुकीबाबत अनेक पैजा लागल्या पंतप्रधान मोदींची सभा या निवडणुकीच्या चर्चेचा प्लस पॉईंट ठरला त्यानंतर शरद पवार यांच्या देखील सभा झाल्या दोन्ही नेत्यांनी आपापल्या उमेदवारांना लोकांसमोर आणून मते मागितली दरम्यान शशिकांत शिंदे यांच्यावरील मुंबईतील तथाकथीत मुतारी घोटाळा दरम्यानच्या चर्चेने चांगलाच रंगला  इतर अनेक उमेदवार देखील या रिंगणात आले दरम्यान खऱ्या अर्थाने आज शिंदे - विरुद्ध राजे यांच्यात थेट लढत झाली त्यात 63 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली त्यामुळे आता साताऱ्यात तुतारी वाजणार की कमळ फुलणार याचीच चर्चा सध्या जोरदार सुरू झाली आहे




Breaking...

सातारा लोकसभा मतदार संघात दुपारी 3 पर्यंत सरासरी 43 टक्के मतदान ; मतदानाचे अजून दोन तास बाकी...

वेध माझा ऑनलाइन।
सातारा लोकसभा मतदारसंघात आज दुपारी 3 पर्यंत 43.83 % टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे
 
तसेच जिल्ह्यातील कराड उत्तर 43.45, वाई 41.88,कोरेगाव, 45.62 कराड दक्षिण 46.38, पाटण 41.74, आणि सातारा या ठिकाणी 44.07टक्के मतदान पार पडल्याची माहिती मिळाली आहे...

BREAKING...