Wednesday, April 21, 2021

राज्यात कडक लाॅगडाऊन लागू : सरकारची मोठी घोषणा; जाणुन घ्या काय आहेत नवे निर्बंध

मुंबई | राज्यात कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर होत असताना लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच काळात राज्य सरकारने लॉकडाऊनची तयारी सुद्धा केली आहे. नवीन नियमानुसार आता राज्यात 22 एप्रिल रात्री 8 वाजेपासून कडक निर्बंध लागू होणार आहेत. काय आहे ही नियमावली याबाबत जाणून घेऊ.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा या बैठकीत झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज याबद्दल निर्णय जाहीर करणार होते. यानुसार आज नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
अशी आहे नवीन नियमावली
किराणा दुकाने, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री, फळे विक्री, अंडी,मटण, चिकन,मासे विक्री, कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने, पशूखाद्य विक्री, बेकरी व मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने तसेच, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने अत्यावश्यक दुकाने आणि विक्री ही सकाळी 7 ते 11 या वेळेत राहील

शहरातील हॉस्पिटल्समधला ऑक्सिजनचा साठा संपत आलाय... "या' समाजसेवकानी अक्षरशः धावपळ करून शहरातील हॉस्पिटल्सना मिळवून दिल्या ऑक्सिजन मशिन्स...

कराड -
 येथील दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह व लोकप्रतिनिधी यांना ईमेल केलेला आहे. त्यामध्ये कराड येथील कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आला असून त्याबाबत माहीती घेवून पुरवठा करण्याची मागणी केली आहे.दरम्यान येथील काही समाजसेवकांनी शहरातून पोर्टेबल ऑक्सिजन मशिन्स अक्षरशः गोळा करून त्या मशिन्स येथील हॉस्पिटल्सला रुग्णसेवेसाठी देऊ केल्या आहेत त्या सर्व समाजसेवकांचे शहरातून खूप कौतुक होतंय

दरम्यान,याबाबतीत प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, राज्यात, जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. कराड तालुक्यात देखील रुग्ण वाढताना दिसत आहेत. अगोदरच रेमडीसीव्हीर इंजिक्शनचा तुटवडा सूरु असतानाच, आता कराडमध्ये एक नवीनच संकट उभे ठाकले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल झपाट्याने कमी होते. अशा स्थितीत रुग्णालयात रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मधील ऑक्सिजन लावून ऑक्सिजन लेव्हल स्थिर ठेवण्याचे प्रयत्न सुरु असतात. तेव्हा कराडमधील बऱ्याच कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आला आहे.
सध्य स्थितीतील साठा केवळ एक किंवा दोन दिवस पुरेल एवढाच आहे. काही रुग्णालयांनी रुग्णांच्या नातेवाईकांना फोन करून मोठ्या मशीन उपलब्ध होत आहेत का याची विचारणाही केली आहे, असे समजते. तसेच ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनींच्या गाड्या कोल्हापुरात वेटिंग वर आहेत असे समजते. परिस्थिती अजून बिकट होण्याअगोदर आपण माहिती घेऊन प्रशासकीय पातळीवर हालचाली करून ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये. यासाठी लवकरात लवकर हालचाली करणे गरजेचे आहे.  असा ईमेल प्रमोद पाटील यांनी पाठवला आहे कराड मधील एरम हाॅस्पीटल, राजश्री हाॅस्पीटलमध्ये ऑक्सिजन संपत आलेला आहे दरम्यान आज सकाळ पासून मनसे अध्यक्ष सागर बर्गे,दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकते गणेश पवार,रयत संघटनेचे विजय मुठेकर, तसेच साबीर मुल्ला , रोहित बागल,शाहू चौक मित्रपरिवारचे समाधान चव्हाण सिद्धार्थ पाटणकर गबबर ग्रुपचे रणजित पाटील राहुल चव्हाण अमित पाटणकर यांनी शहरातून पोर्टेबल ऑक्सिजन मशीन अक्षरशः गोळा करून गरज असणाऱ्या हॉस्पिटल्सना त्या मशिन्स रुग्ण उपचारासाठी देऊ केल्या या सर्वांचे शहरातून मोठे कौतुक होत आहे.

गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्या पुढाकाराने शाळा क्रमांक 3 मध्ये लसीकरण केंद्र सुरू ; सर्वांनी लसीकरण करून घ्या- गटनेत्यांचे आवाहन...


कराड
येथील पालिकेतील जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या पुढाकाराने व पालिकेच्या सहकार्याने शाळा क्रमांक 3 मध्ये आजपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला.यावेळी विजय यादव, निशांत ढेकळे, ओमकार मुळे, राजेंद्र डुबल, बापू देसाई, नरेंद्र लिवे संदीप मुंडेकर, परेश माने, प्रमोद पवार नगरपरिषदेचे भालदारसाहेब, डॉ सोळंखी,शशिकांत घोडके आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी लोकांचा मोठा प्रतिसाद या मोहिमेस मिळाल्याचे दिसून आले.

आज सकाळपासूनच येथील शाळा क्रमांक 3 मध्ये गटनेते राजेंद्र यादव यांच्या उपस्थितीत लसीकरण सुरू झाले सोशल डीस्टन्स चे पालन करत तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या मोहिमेस प्रारंभ झाला लसीकरणास येणाऱ्या प्रत्येकाचे गुलाब पुष्प देऊन यावेळी स्वागत करण्यात आले  शहर व परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात या लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला आज पहिल्याच दिवशी तब्बल शंभर लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतल्याची माहिती याठिकाणी देण्यात आली यावेळी राजेंद्र यादव म्हणाले सध्या कोरोनाची दुसरी मोठी लाट सुरू आहे त्याचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण हा नक्कीच पर्याय आहे सर्वांनी लसीकरण करून घेऊन आपण व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले 


Tuesday, April 20, 2021

मद्य विक्री बाबत जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी

सातारा दि. 20 (जिमाका) : कोविड-19 निमित्त प्रशासनाने दि. 30 एप्रिल पर्यंत निर्बंध लागु केले आहेत. त्यानुसार नमुना FL-2 Form E, Form E-2 व FLW-2 या अनुज्ञप्तीतून घरपोच या  प्रकाराने मदय विक्री करता येईल व नमुना CL-3 अनुज्ञप्तीतून फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच या प्रकाराने मदय विक्री करता येईल, असे कळविले आहे. 
 जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह, सातारा यांनी  क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार, प्राप्त असलेल्या अधिकारान्वये, सातारा जिल्हयात खालीलप्रमाणे सुधारित आदेश जारी केले आहे. 
  सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत नमुना FL-2 Form E, Form E-2 व FLW-2 या अनुज्ञप्तीतून घरपोच या  प्रकाराने मदय विक्री करता येईल. सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत नमुना CL-3 अनुज्ञप्तीतून फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच या प्रकाराने मदय विक्री करता येईल. कोणत्याही परिस्थितीत मदय विक्रीची दुकाने उघडून Take away किंवा पार्सल पध्दतीने दुकानातून ग्राहकास विक्री करता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानास भेट देता येणार नाही. माल वाहतूकीचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये असलेने मदय उत्पादित होत असलेल्या ठिकाणापासून घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना मदय पुरवठा करण्यासाठी वाहतूक करणेस परवानगी राहील.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.
00000

किराणा माल, मेडिकल दुकान व खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी

सातारा दि. 20 (जिमाका) : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणेच्या अनुषंगाने दि. 30 एप्रिल पर्यंत कलम 144 लागु केला आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये, खालीलप्रमाणे सुधारित आदेश जारी केले आहेत.
  सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने/स्टॉल, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खादयपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणार्या  साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने फक्त सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू राहतील.  तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीतच चालू ठेवणेस परवानगी राहील. 
  मेडिकल दुकाने ही सकाळी 7.00 ते रात्री 08.00 पर्यंत चालू राहतील व हॉस्पीटल मधील मेडिकल दुकाने पुर्णवेळ चालू राहतील.
  वृत्तपत्रे/मासिके/नियतकालिके याची घरपोच सेवा सकाळी 5.00 ते सकाळी 11.00 व  स्टॉल वरील विक्री सकाळी 7.00 ते 11.00 या कालावधीत चालू राहील. 
या आदेशांची अंमलबजावणी दिनांक 20 एप्रिल, 2021 चे रात्री 8.00 वाजल्यापासून ते दिनांक 01 मे, 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यत लागू राहील
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.
0000

1571संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू

 सातारा दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1571  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  
कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 161, सदरबझार 9, संगम माहुली 1, माळवाडी 1,लिंब 1, कंरजे 9, व्यंकटपुरा पेठ 4,देगांव 2, गडकरआळी 2,एमआयडीसी 2, मंगळवार पेठ 9, ठोसेघर 2,शाहुपुरी 13,गोडोली 7,जकातवाडी 1,आरळे 1,नांदवळ 1,भरतगाववाडी 1,आसगाव2,भरतगाव 4, कुमठे 1,गुरुवार पेठ 1,बुधवार पेठ 1, दरे खु.2, सोनगाव 4, आरेदरे 1, रामाचागेट 2, म्हसवे 2,संगममाहुली 3,बिभवी 1,कोडोली 2,  दरे 1,शाहुनगर 4,कोंडवे 1, रविवार पेठ 1,शनिवार पेठ 4, नागेवाडी 1,गोजेगाव1,केसरकर पेठ 2,मुंडेवाडी 1, राजापुरी 1,माचीपेठ 2, प्रतापगंज पेठ 1,वर्ये 1, शुक्रवारपेठ 1,दौलतनगर 1,मोळाचाओढा 1, यतेश्वर 1, नेले 1, आरफळ 1, म्हासुर्णे 1, कोंढवे  1,  संगमनगर 1, कृष्णानगर 1, खामगाव पिंपळवाडी 1, खेड 1, 

*कराड तालुक्यातील* कराड 34, चचेगांव 1, कार्वे नाका 5,ओगलेवाडी 5,निगडी 1,रेटरे बु.1, सोमवार पेठ 1,गणेशवाडी 1, पाडळी 1,कोळे 1,सुपने 7,विद्यानगर 5, सैदापुर 8,वाघीरे 2,खोडशी 1,सोमवार पेठ 1,  मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, नादलापुर 2,मलकापूर 10, कोपर्डे हवेली 5,काले 1, सावदे 8, चोरमारवाडी 1,पोटले 1,वाडोली नीलेश्वर 5, मसूर 3,कोनेगाव 1, करवडी 1,उंब्रज 6,मंगळवार पेठ 2,गोवारे 1,तासवडे 1,गोळेश्वर 7, किरपे 1,मिरवेवाडी 3 , वीरवडे 2,किवळ 1,कोरेगाव 1,रीसवड 1, साबळेवाडी 1, शेणेाली 1, कार्वे 2,मुंडे 1, आगाशिवनगर 2, बनवडी 2, विंग 1, शेरे 2, रेठरे बु 2, ओगलेवाडी 1, गोटे 1, हजारमाची 1, कुसुर 1, पठारवाडी 1, गोवारे 1, वडगाव 1,  पार्ले 1, कोयना वसाहत 1, औंड 3, शेनोली 1, 

*पाटण तालुक्यातील* पाटण 7,खडकवाडी 1, वजरोशी 9,दौलतवाडी 3,डीगेवाडी 3, गावडीवाडी 1,मावशी 1, केर 1,कावरवाडी 1,तारळे 23,कडवेबु. 5,धनगरवाडी 1, काळेवाडी कडवे 1, आडूळ 3,आवर्डे  2,मल्हारपेठ 5,निसरे 1, मंडुरे 2, कोयनानगर 1, 

फलटण तालुक्यातील* फलटण 75, लक्ष्मीनगर 9, महतपुर पेठ 2, सोमवार पेठ 1, कोळकी 10, जींती 1, बरड 1, खडकी 2, कांबळेश्वर 1,वेळोशी 1,पंदारे  1,जीरपवाडी 1, जावली 8,पिंपरद 5,गोळीबार मैदान 1, सस्तेवाडी 1,गुडेवाडी 2, मंगळवार पेठ 1,  चौधरवाडी 1,बुधवार पेठ 2,सोनगाव 1 मलटण 6, तांबवे 2,चव्हाणवाडी 3, निरगुडी 1, मठाचीवाडी 1,बीरदेवनगर 1,सेामंथळी 2, गिरवी 1, फरतडवाडी 3, काशिदवाडी  1, मंगळवार पेठ 1  वीढणी 3,वाडळे 4, निंभोरे 1,काळज 1, आसु 1, राजुरी 2, मिरढे 11,वाजेगाव 1,मुजंवडी 1,गोखळी 1, बरड2, कुरवली 1, गुढेवाडी 2,  साखरवाडी 1, जिंती 3, पवारवाडी 1, ठाकुरकी 4, सुरवडी 1, बुधवार पेठ 1, निरगुडी 1, पिराचीवाडी 1, खुंटे 4, तिरकवाडी 2, सोमनथळी 1, पिंपळमळा 1, वाठार निंबाळकर 2, फडतरवाडी 1, मांडव खडक 1, गोलेवाडी 1, चौधरवाडी 1, वाखरी 3, निंभोरे 3, ढवळ 4, राजाळे 1,  राजुरी 1, 

खटाव तालुक्यातील* खटाव 5,खबालवाडी 35,पुसेसावळी 1, कातरखटाव 1,लोणी 3, भुरकवाडी 9, कुरोली 1, वरुड 8,औंध 1,पुसेगाव 4,निढळ 2,बुध 8, काटेवाडी 4,खदगुण 1, फरतडवाडी 1, वर्धनगड 6,ललगुण 2, कातलगेवाडी 1, वडूज 1, धोंडेवाडी 1, कानरवाडी 2, कुमठे 12, पेडगाव 21, मायणी 2, वडूज 2,शिरसवाडी 1, बुध 1, कोकराळे 1,  
*माण तालुक्यातील* पांगारी 6, रानंद 4, बिदाल 2, जाधववाडी 1,मोही 4,कासरवाडी 2, मार्डी 8,गोंदवले 14,भाडवंली 1,श्रीपल्लवन 1,वारकुटीमलवडी 1, माळवाडी 1,शिंगणापूर 3,सोकासन 1,तादळे 1,झाशी 2, राजेवाडी 1,लोधवडे 25,पळशी 4, कोळेवाडी 1,नरवणे 3, भालवडी 5,वावरहिरे 1, दहिवडी 19,मोगराळे 1,पिंगळी 1,तडवळे 1,ऊकीर्डो 1,शेवरी 1,म्हसवड 7,मलवडी 1,पर्यती 1, मोही 3, वरकुटे म्हसवड 1,  माळेवस्ती 1, 

 *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 10, वेळंग 1, सातारारोड 5,ऐकंबे 5, जांब 13,पाडळी स्टेशन 1, धामणेर 1,सायगाव1,मंगळापूर 1,बनवडी 1, पिंपोडे बु.1, वाठारस्टेशन 1, रेवडी 2, सायगाव 2, नलवडेवाडी 1, 

खंडाळा तालुक्यातील*खंडाळा 1,शिरवळ 20, शिंदेवाडी 4,लोणंद 9,देवघर 1,कापर्डे 1,निरा 1,अंढोरी1,केंजळ 1,

*वाई तालुक्यातील* वाई 30, दत्तनगर 4, बावधन नाका 3,विरमाडे 1, बावधन 8,पांडे 2,यशवंतनगर 2,जायगुडेवाडी 4,धर्मपुरी 3,गंजे 8,बोपेगाव 2, कवठे 7 ओझर्डे 1,वेळे 3,सुरुर 1,गुळुंब2, कुडाळतर्फे 2,गंगापुरी 3,मधली आळी 3, धोम 1, गणपतीआळी 1,  फुलेनगर 3, बोरगाव 1,रामडोहआळी 7,सह्याद्रीनगर 1, धोमकॉलनी 1,बोपर्डी 2, कानुर1, लोहारे 1,रविवार पेठ 5, धावडी 1, पसरणी 1, अनपटवाडी  3,गुंडे 1, भेागाव 3,दह्याट 1, कोडगाव 2,वेळंग 1, किकली 1, 

*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 7,धोंडेघर 1,गुरेघर 2, बोरधानी 1,पाचगणी 12,जावली 1, भिलार 7,गोडवली 1,मेटगुताड1,तळदेव 2, बोंडारवाडी 1,  
*जावली  तालुक्यातील*जावली 1,केळघर 1,वेठंबे 1,हातगेघर 9, मेढा 4,वीवर 1,कुडाळ 6,भोगवली 2,बामणेली 3,कुसुंबी 8, गंजे 9,बेलदारवाडी 1, म्हातेबु. 3,वारोशी 2, कारंडी 4,घारटघर 4, अंबेघर 13, वाळवा 1, भणंग 1,
*इतर*5, देवपुर 1, शेणवडी 1, जागमिने 5, नारळवाडी 1,वासेले 1,करजे 1,बहुले 1, सावली 10, मामुर्डी 9,दापवाडी 2,आसनी 1, टेकवली 2,नांदगणे 1,गावडी 4,शेटे 1,भीवडी 2,येवती 1,बलकवडेवाडी 1, सोनवने 1,शीरवडे 1,बेलवडेबु.1,काळगाव1,आंधारी 12, सैदापुर 1,राजपुरी 1,येराळवाडी 1,कुरुळोशी 1,कण्हेरखेड 7,तेटली 4, मेाहाट1,पिंपरी 4,सरजापुर 6, खर्शी 1,निपाणीमुरा 1,अंधेरी 4,धामणेर 2, धनवली 1, किवळ 1, गुजरवाडी 2, दालमोडी 2,येळीव 4,एनकूल 2, सिंगडवाडी 2,कुरोली 2,डांबेवाडी 1,बोंबळे 7अंबेघर 1,अंभेरी 2,मांडवे 1,वेटणे 6,तडवळे 1,खिंगर 5,डिस्काळ 4,कोकराळे 1,खरसिंगे 3, भोसरे 1,नडशी 1,गरवाडी 1, नांदवन 3,निगडी 2,पावशेवाडी 2, आसनी 1,शामगाव1,भोडारवाडी  1, जायगाव 3,बेलोशी 1,पानवन 1,गुरसाळे1, आवकाळी 2,आंब्रळ 1,पाटीलवाडी 1, गवानवाडी 1, मारुल 1, मार्ली 4, पिराचीवाडी 1, बोपर्डी 1, शिरगाव 1, अमृतवाडी 1, व्याहाळी 1, ,चिखली 1, बिचुकले 1, घीगेवाडी 2, वाशीवली 2, चिखली केडगाव 1, केडगाव 1,   

*बाहेरील जिल्ह्यातील* मुंबई 3,बीड1,बारामती 1,सुपा 1,लातुर 1,सोलापूर 1, पलूस 2, येडेमच्छींद्र 1,रायगड 1, पुणे 2, औरंगाबाद 1,रत्नागिरी 1, सांगली 1,  

*36 बाधितांचा मृत्यु*
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सदर बझार सातारा येथील 77 वर्षीय  महिला, चंदनवाडी ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 68 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावली येथील 45 वर्षीय महिला, किरोली ता. कोरेगा येथील 42 वर्षीय पुरुष, व जिल्ह्यिातील विविध कोविड हॉस्पिटमध्ये औंध ता. खटाव येथील 75 वर्षीय महिला, लोढणवाडी ता. माण येथील 48 वर्षीय पुरुष, राजापूर ता. खटाव येथील 76 वर्षीय महिला, अंबवडे ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, विदणी ता. फलटण येथील 72 वर्षीय महिला, हेळवाक ता. पाटण येथील 40 वर्षीय पुरुष, फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, ठाकूरकी ता. फलटण येथील 64 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ फलटण येथील 77 वर्षीय पुरुष, मलठण ता. फलठण येथील 55 वर्षीय पुरुष, फडतरवाडी बु ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, पाल ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, सासवड ता. फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 67 वर्षीय महिला, कुडाळ ता. जावली येथील 84 वर्षीय महिला, नाशिक ता.जि. नाशिक येथील 72 वर्षीय महिला, वाटेगाव ता. तासगाव जि. सांगली येथील 50 वर्षीय महिला, रामाचागोट ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, पुण येथील 33 वर्षीय पुरुष, बोरगाव ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला,  गोंदवले ता. माण 75 वर्षीय्‍ महिला, बोरगाव ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, काळेवाडी ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले पिंगळी ता. माण येथील 86 वर्षीय पुरुष, कल्याण ता. जि.मुंबई येथील 58 वर्षीय पुरुष, कामाठीपुरा ता. सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, सागरनगर ता. फलटण येथील 37 वर्षीय पुरुष, मठनगर ता. फलटण येथील 66 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर ता. खंडाळा येथील 65 वर्षीय्‍ महिला, सदरबझार सातारा येथील 82 वर्षीय महिला अशा एकूण 36 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

*एकूण नमुने -484230*
*एकूण बाधित -84497*  
*घरी सोडण्यात आलेले -67329*  
*मृत्यू -2191* 
*उपचारार्थ रुग्ण-14977* 
0000

नगरसेवक अप्पा माने यांच्या पुढाकाराने लवकरच सुरू होणार कोरोना लसीकरण केंद्र...


वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील नगरसेवक व काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र उर्फ अप्पा माने यांच्या पुढाकाराने व पालिकेच्या सहकार्याने लवकरच आणखी एक कोरोना लसीकरण केंद्र शहरात सुरू होणार आहे माने यांनी याबाबत प्रशासनाकडे मागणीदेखील केली आहे

अप्पा माने हे ग्राऊंडवर काम करणारे नगरसेवक म्हणून शहरात परिचित आहेत.कोणाला कसलीही अडचण असली तरी तो कोणत्या पार्टीचा आहे ,आपला आहे का परका आहे...याचा विचार न करता ते लोकांच्या मदतीला धावतात. पालिकेतील कोणतेही सत्तेतील पद नसताना केवळ आपल्या व्यक्तिगत इमेजवर ते लोकांना आपलेसे वाटतात...काँग्रेस पक्षाचे नेते  म्हणून त्यांचा लौकिक आहे.वेळप्रसंगी पदरमोड करून ते  जनतेसाठी मदतीला धावून जातात अशीही त्यांची ओळख आहे....  जनतेतून निवडून येण्याची त्यांची स्वतंत्र ताकद त्यांच्या प्रभागात नक्कीच आहे.... ते आ पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत, जिकडे सत्ता तिकडे चांगभलं म्हणणारे संधीसाधू राजकारण सगळीकडेच होत असताना दुसरीकडे मात्र,अप्पा माने यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक त्यांचे विरोधकदेखील करताना दिसतात..
त्यांनी कोरोना काळात मोठं काम केलं आहे त्याची कसलीही जाहिरात बाजी त्यांनी केली नाही गरजूंना मदत करत त्यांनी बांधिलकीदेखील जपल्याचे सर्वानाच माहीत आहे कोरोनाबद्दलचे प्रबोधन,मास्क सॅनिटायझर चे वाटप अशा अनेक बाबीतून त्यांचे काम आजही चालूच आहे
त्यांनी कोरोना लसीकरण केंद्रासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे लवकरच ते सुरूही होणार आहे
असे अप्पा माने म्हणाले