Thursday, May 18, 2023

सुषमा अंधारेंसमोरच ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा, जिल्हाप्रमुखाची गाडी फोडली!

वेध माझा ऑनलाइन । महाप्रबोधन यात्रेच्या सभेआधीच बीडमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये राडा झाला आहे. बीड शहराच्या माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये सभेच्या ठिकाणची पाहणी करतानाच शिवसैनिकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाची गाडी फोडण्याचा प्रकार घडला आहे.

उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात शाब्दिक बाचाबाचीतून हा वाद विकोपाला गेला, पण अजूनही पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. सुषमा अंधारे यांच्यासमोरच हा राडा झाल्याने काही काळ गोंधळ उडाला होता, शेवटी सुषमा अंधारे यांनीच मध्यस्थी करून हा वाद मिटवण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या गाडीची काचही या राड्यात फुटली आहे.शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेमध्ये संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा बीडमध्ये होणार आहे. या सभेआधीच ठाकरे गटातला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान गैरसमजातून वाद झाला असून हा वाद आता मिटलेला आहे, असं नंतर सांगण्यात आले आहे 

उद्या कराडातील हाटकेश्वर मंदिरात साजरी होणार शनैश्वर जयंती ; अभिषेक करू इच्छिणार्यांनी सदानंद उमराणी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन । कराडातील सोमवार पेठ येथील हाटकेश्वर मंदिर येथे उद्या शुक्रवार दिनांक 19 रोजी शनैश्वर जयंती उत्सव साजरा होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी सदानंद उमराणी यांनी दिली तसेच सर्व भाविकांनी उद्या दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले आहे

उद्या सकाळी सुरुवातीला शनी देवाला अभिषेक होईल त्यानंतर भक्तभाविक शनी देवाच्या मूर्तीवर तेल वाहू शकतील सायंकाळी 6 ते 8 भजनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर आरती होईल दरम्यान दिवसभर प्रसादाचे वाटप होणार आहे अशी माहिती श्री उमराणी यानी दिली शनैश्वर जयंती निमित्त ज्या भक्तांना अभिषेक करावयाचा असेल त्यांनी 9667691293 या नंम्बर वर कॉल करून त्यासाठी आवश्यक नोंदणी करायची आहे असेही आवाहन करण्यात आले आहे

हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आता विकता येणं अवघड; सरकारने नियम बदलले..

वेध माझा ऑनलाइन। खरेतर आता हॉलमार्क नसलेले दागिने घरात पडून असल्यास ते विकणं अवघड झालं आहे. तसेच नवीन दागिने घेताना जुन्या दागिण्यांची देवाणघेवाणही करता येणंही मुश्कील आहे.

भारतातील बहुतेक कुटुंबांकडे सोन्याचे दागिने आहेत. अनेक जण सोन्याला संकट काळातील साथीदार मानतात. परंतु आताची बातमी ज्यांच्या घरात हॉलमार्क नसलेले केडीएम किंवा इतर सोने आहे, त्यांच्यासाठी फार चांगली नाही. घरात पडून असलेले हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आता विकता येणं अवघड झालं आहे किंवा नवीन दागिन्यांसह त्यांची देवाणघेवाण करण्यासाठीही खटपट करावी लागणार आहे. सरकारच्या हॉलमार्किंग नियमाच्या अंमलबजावणीमुळे हे संकट उद्भवले आहे. सरकारने १ एप्रिल २०२३ पासून सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य केला आहे. याबरोबरच सोन्याच्या दागिन्यांसाठी भारतीय मानक ब्युरो (BIS) चा लोगो आणि शुद्धता चिन्ह (जसे की 22K किंवा 18K लागू) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फसवणुकीपासून दिलासा मिळणार असून, खरेदीवर शुद्ध सोने मिळणार आहे. मात्र, याबरोबरच संकटही निर्माण झाले आहे. खरे तर आता हॉलमार्क नसलेले दागिने घरात पडून असल्यास ते विकणं अवघड झालं आहे. तसेच नवीन दागिने घेताना जुन्या दागिण्यांची देवाणघेवाणही करता येणंही मुश्कील आहे.

विक्री किंवा देवाणघेवाण करण्यापूर्वी हॉलमार्क करणे आवश्यक
BIS नुसार, ज्या ग्राहकांकडे सोन्याचे दागिने अनहॉलमार्क आहेत, त्यांनी ते विकण्यापूर्वी किंवा नवीन दागिन्यांसह देवाणघेवाण करण्यापूर्वी हॉलमार्क करणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत लोकांसमोर दोन पर्याय असतील. पहिल्यांदा तुमचे दागिने बीआयएस नोंदणीकृत असलेल्या ज्वेलर्सकडे घेऊन जा. बीआयएस नोंदणीकृत ज्वेलरी हॉलमार्क न केलेले सोन्याचे दागिने बीआयएस मूल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्राकडे हॉलमार्क करण्यासाठी घेऊन जाईल. तेथे दागिन्यांवर हॉलमार्क करून देईल. मात्र, यासाठी ग्राहकाला प्रति वस्तू ४५ रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे.

सर्ज्या-राजाची जोडी पुन्हा उधळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, बैलगाडा शर्यतीला दिली परवानगी!

वेध माझा ऑनलाइन । गेल्या अनेक महिन्यांपासून अवघ्या महाराष्ट्राला प्रतिक्षा असणाऱ्या बैलगाडा आणि जल्लीकट्टू खेळांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. डिसेंबर महिन्यात यासंदर्भातली सुनावणी पूर्ण झाली होती. तेव्हा याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज यासंदर्भातला निकाल न्यायालयाने दिला असून त्यानुसार महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना परवानगी दिली आहे. अशा खेळांमध्ये प्राण्यांचे हाल होत असल्याचा दावा करणाऱ्या याचिका प्राणीमित्र संघटनांनी केल्या होत्या. त्यावर अखेर न्यायालयाने निकाल दिला आहे.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत, तामिळनाडूमध्ये जल्लाकट्टू आणि कर्नाटकमध्ये कम्बाला या खेळांसाठी संबंधित तिन्ही राज्य सरकारांनी त्या त्या राज्यांसाठी वन्यजीव संरक्षण कायद्यात काही सुधारणा केल्या होत्या. त्यानुसार त्या त्या राज्यांनी या खेळांना मान्यताही दिली होती. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. यासंदर्भात सविस्तर सुनावणी घेऊन डिसेंबरमध्ये हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. अखेर आज त्यासंदर्भातला निकाल आला आहे.
राज्य सरकारांनी पारित केलेल्या कायद्यांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच २०१४मध्ये जल्लीकट्टू आणि त्यासारख्या खेळांवर बंदी घालण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर राज्य सरकारांनी या कायद्यातच सुधारणा करून नवीन विधेयक मंजूर केलं होतं.

काय म्हटलं न्यायालयाने?
न्यायालयाने यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्याचा राज्य सरकारांचा अधिकार यावेळी मान्य केला. “तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू गेल्या शतकाहून अधिक काळापासून चालू आहे. हा खेळ तामिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे की नाही हे ठरवण्याचं काम न्यायालयाचं नाही. जर विधिमंडळानं असं ठरवलं असेल की जल्लीकट्टू तामिळनाडूच्या संस्कृतीचा भाग आहे, तर न्यायव्यवस्था त्याहून वेगळी भूमिका घेऊ शकत नाही. यासंदर्भात निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार विधिमंडळाला आहे. हीच बाब महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांनाही लागू होते”, असं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

Wednesday, May 17, 2023

मुंबईत झालेल्या "त्या' दशतवादी हल्ला प्रकरणात भारताला मोठं यश ; "आरोपी' च्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने दिली परवानगी :

वेध माझा ऑनलाइन । 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला मान्यता दिली.

16 मे रोजीच्या 48 पानांच्या आदेशात, कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टसाठीच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी सांगितलं की, सुनावणीच्या वेळी युक्तिवादासाठी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे न्यायालयाने पुनरावलोकन केले आणि त्यावर विचार केला. ज्या गुन्ह्यांसाठी त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती करण्यात आली आहे, त्या गुन्ह्यांसाठी 62 वर्षीय राणा प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे, असं न्यायाधीशांनी सांगितलं.
26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. राजनयिक माध्यमांद्वारे त्याला भारतात आणण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यास तयार असल्याचे एनआयएने म्हटले आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या 26/11 च्या हल्ल्यातील राणाच्या भूमिकेची एनआयएकडून चौकशी सुरू आहे.
न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, अमेरिकन सरकारच्या वकिलांनी युक्तिवाद केला की राणाला माहित होतं की त्याचा बालपणीचा मित्र, पाकिस्तानी-अमेरिकन डेव्हिड कोलमन हेडली हा लष्कर-ए-तोयबामध्ये सामील होता. त्यामुळे त्याने हेडली, दहशतवादी संघटना आणि त्याचे सहकारी यांच्या कारवायांमध्ये मदत केली आणि बचावही केला. .
दुसरीकडे राणाच्या वकिलाने प्रत्यार्पणाला विरोध केला. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन लोकांसह एकूण 166 जणांचा मृत्यू झाला होता. हे हल्ले 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केले होते. मुंबईतील प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या ठिकाणी हे हल्ले 60 तासांहून अधिक काळ सुरू होते.
भारत आणि अमेरिका यांच्यात प्रत्यार्पण करार आहे. राणाचे भारताकडे प्रत्यार्पण हे पूर्णपणे कराराच्या अधिकारक्षेत्रात होते, असा निकाल न्यायाधीशांनी दिला. या हल्ल्यामध्ये दहशतवादी अजमल कसाब जिवंत पकडला गेला होता, त्याला 21 नोव्हेंबर 2012 रोजी भारतात फाशी देण्यात आली होती. या हल्ल्यादरम्यान उर्वरित दहशतवादी भारतीय सुरक्षा दलांनी मारले.

Tuesday, May 16, 2023

कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना नुकताच मिळाला बदलीचा आदेश ; नाशिक जिल्ह्यात झाली बदली; उद्याच व्हावे लागणार रुजू ;

वेध माझा ऑनलाइन । कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची नाशिक जिल्ह्यातील सांदवड येथे नुकतीच बदली झाल्याचे वृत्त हाती आले आहे 
आज मंगळवारी सायंकाळी 7, 45 वाजता हा आदेश डाके याना आला ते उद्याच  त्याठिकाणी रुजू होणार आहेत असेही खात्रीशीर समजते

सारंग पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

वेध माझा ऑनलाइन । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष, सनबीम शिक्षण समूह व श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील यांचा ५१ वा वाढदिवस कराड येथे साध्या पध्दतीने पण उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान वाढदिवसानिमित्ताने राज्य स्तरावरील व सातारा लोकसभा मतदारसंघाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत तर काहींनी फोनवरून सारंग पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
   
शनिवारी गोटे, कराड येथील संपर्क कार्यालयात उपस्थित राहून सारंग पाटील यांनी शुभेच्छा स्विकारल्या. माजी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, खा.सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी पालकमंत्री आ.बाळासाहेब पाटील, आ.मकरंद पाटील, आ.शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर, खा.डॉ.अमोल कोल्हे, शिरूर हवेलीचे आ.अशोक पवार, उदयसिंह पाटील-उंडाळकर, डॉ.अतुल भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.

प्रत्यक्ष भेटून जयंतकाका पाटील, हर्षद कदम, मानसिंगराव जगदाळे, दयानंद पाटील, पै.नाना पाटील, झाकिर पठाण, ॲड.नरेंद्र पाटील, हंबीरराव जाधव, धोंडिराम जाधव, बेलवडेचे शुभम मोहिते, पाटणचे सुभाष पवार, राजाभाऊ काळे, सचिन कुंभार, संजय हिरवे, रघुनाथ जाधव, संदिप जाधव, प्रतापराव देसाई, श्रीकांत पाटील, गांधीटेकडीचे माजी प्राचार्य डी.जी.नांगरे, मारूल हवेलीच्या सरपंच अक्काताई मस्के, उपसरपंच गणपत पाटील, ग्रामविकास अधिकारी मधुकर पाटील व सदस्य, कोरीवळेच्या भराडीदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, जनसहकार निधी लि.चे मारूती मोळावडे, प्रविण मस्के, सिद्धनाथ कन्ट्रक्शनचे संजय नांगरे-पाटील, नांगरे पॉलीमर्सचे अभय नांगरे, वेळेचे निलेश डेरे, नितीन डेरे, सुरेश पाटील, संदिप कोळेकर, विशाल माने, भिमराव शिंदे, संग्राम पाटील, श्रीरंग चाळके, युवराज देसाई, सचिन जाधव, किरण साबळे-पाटील, माणिकराव पाटील, अशोकराव पाटील-पोतलेकर, सनबीमचे अनिल गांवडे, प्रशांत लाड व कर्मचारी, हणमंतराव माने, तुकाराम कदम, नरेंद्र साळुंखे, विकास भोसले, सुदाम जाधव, महम्मद आवटे, विकास पाटील, अभिजीत सोमदे, धनंजय जगताप यांच्यासह सामाजिक, राजकीय, प्रशासकिय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सारंग पाटील यांना शुभेच्छा दिल्या.