वेध माझा ऑनलाइन । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष, सनबीम शिक्षण समूह व श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील यांचा ५१ वा वाढदिवस कराड येथे साध्या पध्दतीने पण उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान वाढदिवसानिमित्ताने राज्य स्तरावरील व सातारा लोकसभा मतदारसंघाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत तर काहींनी फोनवरून सारंग पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
शनिवारी गोटे, कराड येथील संपर्क कार्यालयात उपस्थित राहून सारंग पाटील यांनी शुभेच्छा स्विकारल्या. माजी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, खा.सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी पालकमंत्री आ.बाळासाहेब पाटील, आ.मकरंद पाटील, आ.शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर, खा.डॉ.अमोल कोल्हे, शिरूर हवेलीचे आ.अशोक पवार, उदयसिंह पाटील-उंडाळकर, डॉ.अतुल भोसले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.
प्रत्यक्ष भेटून जयंतकाका पाटील, हर्षद कदम, मानसिंगराव जगदाळे, दयानंद पाटील, पै.नाना पाटील, झाकिर पठाण, ॲड.नरेंद्र पाटील, हंबीरराव जाधव, धोंडिराम जाधव, बेलवडेचे शुभम मोहिते, पाटणचे सुभाष पवार, राजाभाऊ काळे, सचिन कुंभार, संजय हिरवे, रघुनाथ जाधव, संदिप जाधव, प्रतापराव देसाई, श्रीकांत पाटील, गांधीटेकडीचे माजी प्राचार्य डी.जी.नांगरे, मारूल हवेलीच्या सरपंच अक्काताई मस्के, उपसरपंच गणपत पाटील, ग्रामविकास अधिकारी मधुकर पाटील व सदस्य, कोरीवळेच्या भराडीदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, जनसहकार निधी लि.चे मारूती मोळावडे, प्रविण मस्के, सिद्धनाथ कन्ट्रक्शनचे संजय नांगरे-पाटील, नांगरे पॉलीमर्सचे अभय नांगरे, वेळेचे निलेश डेरे, नितीन डेरे, सुरेश पाटील, संदिप कोळेकर, विशाल माने, भिमराव शिंदे, संग्राम पाटील, श्रीरंग चाळके, युवराज देसाई, सचिन जाधव, किरण साबळे-पाटील, माणिकराव पाटील, अशोकराव पाटील-पोतलेकर, सनबीमचे अनिल गांवडे, प्रशांत लाड व कर्मचारी, हणमंतराव माने, तुकाराम कदम, नरेंद्र साळुंखे, विकास भोसले, सुदाम जाधव, महम्मद आवटे, विकास पाटील, अभिजीत सोमदे, धनंजय जगताप यांच्यासह सामाजिक, राजकीय, प्रशासकिय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सारंग पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment