Thursday, February 29, 2024

प्रीतिसंगम घाट परिसराच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्नशील : : ऐतिहासिक महत्व टिकविणार: डॉ. अतुल भोसले ;

वेध माझा ऑनलाईन। कराडमध्ये कृष्णा नदीच्या काठी असलेल्या प्रीतिसंगम घाटाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याठिकाणच्या उद्यानाच्या दक्षिणेला असलेला पंतांचा कोट, हा पूर्वीचा भुईकोट किल्ला आहे. या भागाचे ऐतिहासिक महत्व टिकविण्याच्या दृष्टीने, प्रीतिसंगम घाट परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी राज्य शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी दिली. प्रीतिसंगम घाट परिसराच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते.

कराड येथील प्रीतिसंगम घाट परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याठिकाणी लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळास भेट देण्यासाठी राज्यभरातून अनेक नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. या भागाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन, या परिसराच्या सुधारणेसाठी कराड नगरपालिकेने विकास आराखडा तयार केला आहे. याची माहिती घेऊन डॉ. भोसले यांनी घाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली.

या परिसरात उद्यानालगत असलेल्या पायऱ्यांच्या भागावर आकर्षक फ्लॉवर बेड करणे शक्य आहे. तसेच या भागातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजांची डागडुजी करून, त्यावर लाईट शोच्या माध्यमातून आकर्षक विद्युत रोषणाई करणे शक्य असल्याच्या सूचना डॉ. भोसले यांनी केल्या. या परिसराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणखी काही सुधारणा करता येतील का, याबद्दल या क्षेत्रातील लोकांशी बोलून सविस्तर विकास आराखडा शासन दरबारी दाखल करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. तसेच यासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीदेखील यावेळी दिली.

दरम्यान, कराडमधील सायकलस्वारांनी कराड ते जगन्नाथपुरी ते पुन्हा कराड असा प्रवास १५ दिवसात सायकलवरून पूर्ण केला. यामध्ये माजी उपनगराध्यक्ष दिपक बेलवणकर, तेजस गुरसाळे, अमोल बेलवणकर, वैभव गुरसाळे, उमंग पवार, राजेंद्र भोसले यांचा सहभाग होता. तसेच चिपळूण ते अक्कलकोट व पुन्हा चिपळूण असा ६१० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून अवघ्या ३८ तासांत पूर्ण करून पत्रकार चंद्रजित पाटील व  रणजीत शिंदे यांनी अनोखा विक्रम केला आहे. याबद्दल या सर्वांचा डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी शिवसेनेचे नेते रणजित पाटील, कराडचे माजी नगराध्यक्ष सुभाषराव डुबल, राजेंद्र डुबल, आशुतोष डुबल, माजी नगरसेवक सुहास जगताप, घनश्याम पेंढारकर, मुकुंद चारेगावकर, अभिषेक भोसले, किरण मुळे, नगरपालिकेचे सहाय्यक अभियंता ए. आर. पवार, वृक्ष अधिकारी मुझफ्फर नदाफ यांच्यासह हास्य क्लब, स्विमिंग क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्यानातील खेळण्यांसाठी लवकरच निधीची तरतूद!

प्रीतिसंगम बागेतील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी कोणतीही साधने उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे याठिकाणी खेळण्यांची चांगली व्यवस्था करण्याची मागणी माजी नगरसेवक सुहास जगताप यांनी डॉ. अतुल भोसले यांच्याकडे केली. यावेळी डॉ. भोसले यांनी प्रीतिसंगम उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी मिळवून देण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. 


ब्राम्हणांना संपवण्याची भाषा करणाऱ्याला अटक करा ; कराडात विविध ब्राम्हण संघटनांच्या वतीने डीवायएसपी ना निवेदन ;


वेध माझा ऑनलाईन।
ब्राह्मणांना संपवण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी कराडमधील विविध ब्राम्हण संघटनांच्या वतीने आज निवेदनाद्वारे करण्यात आली कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर याना या मागणीबाबतचे निवेदन देण्यात आले

निवेदनात म्हटले आहे की गावरान विश्लेषक या चॅनेलवर मराठा आरक्षणाबाबत काही व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यामध्ये एका व्यक्तीने ब्राम्हण समाजाला तीन मिनिटात संपवू असे विधान केले या व्यक्तीच्या विधानामुळे ब्राम्हण समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करून ब्राह्मण समाजाच्या कत्तली करण्याचे षडयंत्र यातून रचले जात आहे यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो मराठा आरक्षणाला ब्राम्हण समाजाने नेहमीच पाठिंबा दर्शवला आहे कधीही विरोध केलेला नाही असे असताना ब्राम्हण समाजाची नाहक बदनामी करण्याचे विनाकारण षडयंत्र सुरू आहे दरम्यान ब्राम्हणांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या  या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करा व त्याच्यावर कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली जय परशूराम, जय श्रीराम अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली

यावेळी समस्त ब्राम्हण समाज सामाजिक संस्था,चित्पावन ब्राम्हण संघ, बहुभाषिक ब्राह्मण संघ विद्यानगर, वेदशास्त्र विद्या संवर्धन मंडळ , ऋग्वेद स्वाहाकार समिती, आणि ब्राम्हण बहुद्देशीय चॅरिटेबल फाउंडेशन या संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ब्राम्हण महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Wednesday, February 28, 2024

ब्राम्हणांना संपवण्याची भाषा करणारा पोलिसांच्या ताब्यात ; त्याचा पत्ता बारामतीचा; त्याच्या मागे कोण? चौकशीची मागणी ; तालिका अध्यक्षांचे चौकशीचे आदेश ;

वेध माझा ऑनलाईन। विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभागृहात पाँईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत भाजपा आमदार राम कदम यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात जातीवाद कसा पसरेल याचं मोठं षडयंत्र व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. देवेंद्र फडणवीसांना या मातीत गाडणार असं त्यातला इसम बोलतो, देवेंद्र फडणवीसांसारखं महाराष्ट्रातले ब्राह्मण ३ मिनिटांत संपवून टाकू असं बोलतो. याबाबत सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यात ज्याला पकडण्यात आले. त्याला सोडवण्यासाठी रोहित पवारांनी पोलिसांना फोन केला. रोहित पवार आणि या व्यक्तीचा काय संबंध असा सवाल कदम यांनी विचारला. 
दरम्यान, एक समाज ३ मिनिटांत आम्ही संपवू, देवेंद्र फडणवीस तुला संपवू असं व्हिडिओत आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने तक्रार केली. त्यात योगेश सावंत सापडला. त्याने तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी आहे असं मान्य केले. रोहित पवार यांनी स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांचा संबंध काय? मराठा समाज शांततेत आंदोलन करतो. जरांगे पाटलांच्या आंदोलनावेळी आम्ही सुरुवातीपासून त्यांच्या बाजूने भूमिका घेतली. परंतु जेव्हा त्यांच्या आंदोलनातून राजकीय वास यायला लागला तेव्हा आता सर्व गोष्टी बाहेर यायला लागल्या. योगेश सावंतचा पत्ताही बारामतीतला आहे. रोहित पवार यांचा योगेश सावंतशी संबंध काय ? योगेश सावंत याच्यामागे कोण कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे असं आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. त्यावर या प्रकरणाची सखोल चौकशी करावी असे आदेश तालिका अध्यक्षांनी दिले.


विधानसभेत आमदार राम कदम म्हणाले की, महाराष्ट्र मराठ्यांचा आहे आणि मराठेच राज्य करणार असं तो बोलतो. देवेंद्र फडणवीसांबद्दल कोण असं बोलणार असेल तर ते सहन करणार नाही. योगेश सावंत असं या माणसाचे नाव आहे. त्याचे संबंध बारामतीशी असून या माणसाला सोडण्यासाठी रोहित पवार यांनी पोलिसांना फोन केला. रोहित पवारांचा योगेश सावंतशी काय संबंध? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण मराठ्यांच्या आडून राज्यात जातीतेढ निर्माण करण्याचं काम रोहित पवार आणि त्यांचे बगलबच्चे करत असतील तर ते मराठा समाजाला बदनाम करतायेत. मराठा समाजाला एकही मोर्चा चुकीच्या मार्गाने गेला नाही. शांततेत निघाला. पण बीडमध्ये जाळपोळ, दगडफेक केली असं त्यांनी म्हटलं. 
तर कुठल्याही नेते, समाजाविरोधात असं विधान करणे कुणीही मान्य करणार नाही. मात्र सभागृहात शरद पवारांचे नाव घेतलं गेले, कुणाचेही नाव घेण्याआधी नोटीस द्यावी लागते. पाँईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून कुणाचेही नाव घेण्याचा अधिकार नाही. जर नाव घेतले असले तर कामकाजातून काढून टाकावे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 


डॉ. अतुल भोसले यांच्याकडून विकासकामाचा धडाका सुरूच ; येरवळे येथे १० लाखांच्या विकासकामाचे भूमिपूजन ;

वेध माझा ऑनलाईन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने देशाला बळकटी मिळवून देणारे गौरवशाली नेतृत्व लाभले आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. येरवळे (ता. कराड) येथे विकासकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून येरवळे गावातील रस्ते सुधारणा कामासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या २५-१५ ग्रामविकास योजनेतून १० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून होणाऱ्या विकासकामाचे भूमिपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना ते म्हणाले, देशाला नरेंद्र मोदींच्या रुपाने दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. मोदींनी देशात सामाजिक सलोखा टिकविण्याचे काम करत, विकासाला गतिमान केले. सरकारच्या अनेक योजनांचा सामान्य नागरिकांना होत असून, सर्वसामान्य जनतेची उन्नती साधण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कराड दक्षिणसाठी भरघोस निधी प्राप्त होत असून, भविष्यातही जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. 

याप्रसंगी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सयाजी यादव, माजी पं. स. सदस्या सौ. नंदाताई यादव, सरपंच रुपाली यादव, माजी सरपंच गीतांजली यादव, सेवा सोसायटीचे संचालक बाबासो यादव, वसंत यादव, रामभाऊ लोकरे, काजल चव्हाण, कविता यादव, सुवर्णा यादव, सुनील यादव, डॉ. आनंदराव लोकरे, कैलास यादव, भरत यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


Tuesday, February 27, 2024

शरद पवार, रोहित पवार यांच्याकडून जरांगे पाटील यांना मदत ; संगीता वानखेडे यांचे आरोप ; राष्ट्रवादीच्या राजेश टोपे यांच्या कारखान्यात ठरले आंदोलनाचे प्लॅनिंग ; प्रवीण दरेकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट ;

वेध माझा ऑनलाईन। मराठा आरक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. सागर बंगल्यावर येत आहे, मला  मारण्यासाठी फडणवीसांनी षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा आंदोलनामध्ये फूट पडलेली दिसली, अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशातच संगीता वानखेडे यांनी जरांगे यांची SIT चौकशीची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांचं नाव घेत खळबजनक वक्तव्य केलं आहे.
दरम्यान, विधीमंडळाच्या अर्धसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रविण दरेकर यांनी जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप केला. त्यानंतर राजेश टोपे यांच्या कारखान्यामध्ये आंदोलनाचं षडयंत्र रचलं गेल्याचंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

मी SIT चौकशी करा हीच मागणी करत होते. अनेक राजकीय नेत्याचा जरांगे पाटील यांना सपोर्ट आहे. जरांगे पाटलाची चौकशी झाल्यावर सगळं दूध कमी पाणी का पाणी होईल. शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार यांच्याकडून जरांगे यांना मदत मिळत आहे. सगळ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करा म्हणत जरांगेचं आंदोलन स्क्रिप्टेड आहे, गरज पडल्यास माझे देखील चौकशी करा, असं संगीता वानखेडे यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाची दिशाभूल जरांगे यांनी केली असन आरक्षणात फसवणूक केली आहे. जाणून बुजून माझी बदनामी केली जाते, सगेसोयरे मान्य होणार नाही आम्हाला तसं आरक्षण नको. येत्या निवडणूकित जरांगे याला त्याची माणसे निवडून आणायची आहेत. गावागावातून पैसे गोळा होत आहेत. गाड्या कुठून आल्या याची चौकशी करा. आमच्या समाजाच वाटोळं केलं असून आमच्या मुलांवर गुन्हे दाखल होत असल्याचं वानखेडे म्हणाल्या.

ते सामान्य कार्यकर्ते होते तोवर ठीक होतं, आता नाही. आपल्या लिमीटच्या बाहेर गेलं तर आपण कार्यक्रम करुन टाकतो,' मुख्यमंत्री शिंदे कोणाबद्दल म्हणाले?'

वेध माझा ऑनलाईन
राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन वातावरण तापलेलं असतानाच  विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आज विधानपरिषदेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरु झाले तर विधानसभेचे कामकाज दुपारी 12 वाजता सुरू झालं.  आज 27 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. सभागृहाच्या कामकाजामध्ये पुरवण्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. दरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंदरम्यानच्या दरम्यान एक संवाद झाला त्याची सध्या जोरदार चर्चा आहे

नाना पटोले आणि मुख्यमंत्र्यांची प्रवेशद्वाराजवळ भेट झाली. दोन्ही नेते एकमेकांशी हस्तांदोलन करताना व्हिडीओत दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे एका हाताने चष्मा सरळ करत असताना...
 नाना पटोले, 'हे काय चाललंय? तुम्हीच त्यांना मोठं केलंय,' असं म्हणत शिंदेंना प्रश्न विचारतात. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी हातवारे करुन उत्तर देताना दिसत आहेत.

हातवारे करत मुख्यमंत्र्यांचं उत्तर...म्हणाले...
नाना पटोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे, 'ते सामान्य कार्यकर्ते होते तोवर ठीक होतं आता नाही. आपल्या लिमीटच्या बाहेर गेलं तर आपण कार्यक्रम करुन टाकतो,' असं अगदी हातवारे करुन सांगतात. 

मात्र या दोघांमधील हा संवाद नेमका कोणाबद्दल आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तरी पत्रकारांच्या गराड्यात अडकण्याआधी विधानसभेच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही नेत्यांमध्ये झालेला हा संवाद व्हिडीओमध्ये अगदी स्पष्टपणे ऐकू येत आहे. यानंतरही नाना पटोले आणि मुख्यमंत्री शिंदे एकमेकांशी हसून काहीतरी बोलतात. मात्र व्हिडीओमध्ये त्यांच्या संवादामधील शेवटची काही वाक्य स्पष्टपणे ऐकू येत नाहीत. तरी या दोघांमधील ही चर्चा नेमकी कोणाबद्दल होती याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Monday, February 26, 2024

मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढणार ; जरांगेची एसआयटी चौकशी होणार ; त्यांच्या मागे कोण? हे तपासले जाणार ;

वेध माझा ऑनलाईन। आज विधिमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर मराठा आरक्षणावरून सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी मनोज जरांगे पाटलांच्या विधानांमागे नेमका कोणाचा हात आहे? हे तपासण्यासाठी एसआयटी चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी केली. त्यांनी केलेल्या या मागणीनंतरच जरांगे पाटलांच्या आंदोलनाची SIT चौकशी व्हावी, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. त्यामुळे मनोज पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली 
आहे

विधिमंडळात बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “काल मी मनोज जरांगे-पाटील यांचा व्हिडिओ बघितला. यामध्ये महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यांच्यामागे कटकारस्थानाची भाषा आहे. जरांगेंची भाषा त्यांना शोभत नाही. राज्यात पंतप्रधानांविरोधात कटकारस्थान सुरू आहे. तसेच आमच्या जीवाला देखील धोका आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी” त्यांनी केलेला या मागणीनंतरच विधानसभा अध्यक्ष यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.