Wednesday, September 8, 2021

आज सातारा जिल्ह्यात विक्रमी 1लाख 19 हजारापेक्षा अधिक लोकांचे लसीकरण - आज पर्यंत 20 लाखापेक्षा अधिक लोकांचे लसीकरण

सातारा दि.8 ( जिमाका )  जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यायला सुरुवात केल्या पासून आज पर्यंत 20 लाख 82 हजार 410 लोकांचे लसीकरण केले आहे. आज जे लसीकरण झाले ते आज पर्यंतचा उच्चाकं असून ते 1 लाख 19 हजार 630 एवढ्या लोकांना आज लस देण्यात आली. मलकापूरच्या आरोग्य टीमचे यात मोलाचे योगदान आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद सीईओ विनयकुमार गौडा यांनी    या कार्याचे कौतुक केले आहे.
   जिल्ह्यात आज पर्यंत 14 लाख 93 हजार 239 एवढ्या लोकांना पहिला डोस तर 5 लाख 89 हजार 171एवढ्या लोकांना दुसरा डोस मिळाला आहे.

No comments:

Post a Comment