Friday, September 17, 2021

उद्या राजेंद्रसिह यादव यांचा वाढदिवस होणार विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा...


वेध माझा ऑनलाइन
कराड
प्रतिवर्षी प्रमाणे दिनांक 19 सप्टेंबर रोजी कराडचे माजी उपनगराध्यक्ष व यशवंत जनशक्ती विकास आघाडीचे गटनेते नगरसेवक राजेंद्रसिंह यादव बाबा यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो यावर्षी काही सामाजिक उपक्रम राबवून यादव मेहेरबान याचा वाढदिवस साजरा होणार असल्याची माहिती त्यांच्या मित्रपरिवारा कडून देण्यात आली आहे
  
गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मेहेरबान यादव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नाही  त्यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मेळावा,रोजगार मेळावा आदर्श युवा पुरस्कार इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात मात्र यावर्षी राजेंद्रसिंह यादव मित्रपरिवार कडून काही सामाजिक उपक्रम राबवून राजेंद्रसिंह यादव बाबा यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे अशी माहिती राजेंद्रसिंह यादव मित्रपरिवार विजयसिंह यादव मित्रपरिवार यांच्या वतीने देण्यात आली...

साजरे होणारे सामाजिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे... 

* मॅरेथॉन स्पर्धा 
* उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप
* रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीर
* गणपती मंदिर आरती व जिलेबी वाटप
* रिमांड होम येथील मुलांना भोजन व वहीवाटप
* आशा किरण महिलाश्रम या संस्थेस फ्रिज भेट व महिलांना भोजन
* कराड नगरपरिषदेच्या आरोग्य महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटप
* कोळेवाडी येथील अनाथ आश्रमास धान्यरुपी मदत
* शाहू चौक येथे गणेश भक्तांना प्रसाद वाटप
* कराड शहरातील पोलीस बांधवांना अल्पोहार व बिस्लरी वाटप
* मा राजेंद्रसिंह यादव बाब यांची वही तुला
* कराड शहरात 1200 धान्य किट वाटप
* शाळा नंबर 3 येथे गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप
* पाटण कॉलनी येथे वृक्षारोपण
* कराड शहरातील वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप आदी उपक्रम साजरे केले जाणार आहेत

यादव मेहेरबान यांचे आवाहन...

दि १९ सप्टेंबर रोजी माझा वाढदिवस असून दरसाल माझ्यावर प्रेम करणारे सर्वच मित्र परीवार मोठ्याप्रमाणावर हा वाढदिवस आपण साजरा करत असतो मात्र यंदा राज्यावर कोरोनाचे संकट पुन्हा ओढावले असून लोकप्रतिनिधी म्हणून माझी आणि जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सर्वाची कोरोनाचे नियम पाळणे ही जबाबदारी आहे यामुळे यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला असून कोणीही भेटून शुभेच्छा देण्याचे टाळावे , परगावी असल्याने यंदा आपल्या सोशल मिडीयावरील आपल्या शुभेच्छांचा मी आनंदाने स्वीकार करीनच ... ! यामुळे मी पुन्हा एकदा नम्र विनंती करीतो कि वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भेटणे टाळावे तसेच कोरोना पार्श्वभूमीवर स्वतःची कुटुंबाची काळजी घ्या सॅनीटायझर , मास्क , सुरक्षित अंतर अशा नियमांचे पालन करा आपल्या शुभेच्छा नेहमीच माझ्या सोबत असून याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे . !          
आपला 
राजेंद्रसिंह आत्माराम यादव( नगरसेवक )
गटनेते यशवंत जनशक्ती विकास आघाडी कराड नगरपरिषद कराड

               

No comments:

Post a Comment