Saturday, September 18, 2021

कराड पालिकेची महावितरण कंपनीला नोटीस...महावितरण कंपनीने 300 वृक्षांना इजा पोचवल्याची सी ओ डाकें यांची माहिती...प्रतिझाड 1 लाख दंड वसुली होणार...

वेध माझा ऑनलाइन
कराड
 वृक्षांच्या फांद्या विनापरवाना छाटून झाडांना इजा पोचवली या कारणाने कराड पालिका प्रशासनाने राज्य विद्युत कम्पनीला नोटीस बजावली असल्याचे सी ओ डाके यांनी सांगितले एकूण अंदाजे 300 झाडांना महावितरण कम्पनीने इजा पोचवल्याचे सी ओ डाके म्हणाले म्हणजे प्रतिझाड 1 लाख रुपए याप्रमाणे 300 झाडांची दंड वसुली होवू शकते असेही त्यांनी सांगितले

येथील राज्य विद्युत कम्पनीच्या कराड विभागामार्फत नगर प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता शहरातील विविध भागांतील वृक्षांना इजा पोचवण्यात आली आहे
त्यापैकी काही झाडे हेरिटेज प्रकारातली असल्याचे सांगण्यात आले महाराष्ट्र अधिनियम 1975 चे कलम 8 (1)चे उलनघन केले आहे झाडांना इजा पोचवल्यामुळे कलम 20 अन्वये महावितरण कम्पनाला सदर नोटीस बजावण्यात आली आहे
महावितरण कम्पनीला 3 दिवसात याबाबत खुलासा करावयाचा आहे अन्यथा प्रति झाड 1 लाख रुपये इतकी दंड आकारणी केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी डाके म्हणाले एकूण अंदाजे 300 झाडांना महावितरण कंपनीने इजा पोचवल्याचीही त्यांनी सांगितले

No comments:

Post a Comment