कराड
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या वतीने 17 सप्टेंबर या दिवशी चालक सन्मान दिन घोषित करण्यात आला आहे यानिमित्ताने कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे ज्यांनी रिक्षा व्यवसाय करताना प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू रिक्षेत राहिल्या असताना त्यांनी प्रवाशांना त्या प्रामाणिकपणे परत केल्या अशा रिक्षाचालकांचा पुष्पगुच्छ देऊन आज सत्कार करण्यात आला
यावेळी सत्कार करताना कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कणसे आगवणे साहेब संजय राजमाने प्रियदर्शनी वाहतूक संघटनेचे संस्थापक अशोकराव पाटील दादा आदी मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व रिक्षा चालक मालक मोटर व्यवसायिक उपस्थित होते
रिक्षाचालकांना पुढील व्यवसायासाठी परिवहन विभागामार्फत यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या यानिमित्ताने रिक्षा संगटनेचे नेते अशोकराव पाटील यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व त्यांचे सर्व सहकारि यांचे यावेळी आभार मानले
No comments:
Post a Comment