Saturday, September 25, 2021

कोरोना काळात कृष्णा हॉस्पिटलचे कार्य उत्तुंगच - ना नितीन गडकरींचे गौरवोद्गार...

वेध माझा ऑनलाइन
कराड
एकूणच सम्पूर्ण देश कोरोना काळात मोठ्या संकटातून जात असताना येथील कृष्णा हॉस्पिटलचे त्याकाळातील योगदान व कार्य उत्तुंगच होते हे विसरून चालणार नाही असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे काढले. आज येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना योद्ध्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. प्रशांत परिचारक, माजी आ. आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, भाजपाचे नेते मकरंद देशपांडे, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर आदी उपस्थित होते

 ते पुढे म्हणाले, सरकारी यंत्रणेला जे शक्य नाही, त्यापेक्षा जास्त सेवा कृष्णाने दिल्या आहेत. सद्य:स्थितीला देशात ६०० मेडिकल कॉलेज, ‘एम्स’सारख्या ५० वैद्यकीय संस्था आणि २०० सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची आवश्यकता आहे मात्र तितकीच डॉक्टरांचीही कमतरता जाणवते  वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी मेडिकल आणि इंजिनियरिंग कॉलेज उभे केले. लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने उभे राहिलेल्या या संस्थांचं योगदान मोठं आहे. शाळेंची सध्या अवस्था बिकट आहे. विद्यार्थी आहेत तर शिक्षक नाहीत, शिक्षक आहेत तर इमारत नाही तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्रामीण भागात, आर्थिक शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कामाची गरज आहे, असं नितीन गडकरी म्हणाले. 
महाराष्ट्रातील साखर कारखानदारांना विनंती आहे साखर उत्पादन कमी करा, इथेनॉल निर्मितीवर भर द्या असेही ते यावेळी म्हणाले

No comments:

Post a Comment