वेध माझा ऑनलाइन
साताऱ्यातील विकासकामांबाबत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सोबत घेऊन काम करणार का? या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी जनता माझ्या पाठीशी असल्याचे उत्तर देत शिवेंद्रराजे यांना सोबत घेऊन सातारा नगरपालिका निवडणूक लढणार नसल्याचे पुन्हा संकेत दिले आहेत. उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांमधील मतभेद नगरपालिकेच्या निवडणुकी आधीच दिसू लागले आहेत. उदयनराजे भोसले हे सातारा नगरपालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटन करत आहेत. उदयनराजे पत्रकारांना विकास कामांची माहिती देत असताना पत्रकारांनी राजेंना आमदार शिवेंद्रराजे यांना सोबत घेऊन काम करणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयाला बगल देत जनता माझ्या पाठीशी असल्याचे विधान केल आहे. यावरून दोन्ही राज्यांमध्ये मतभेद असल्याचं दिसून येत आहे. उदयनराजे भोसलेंच्या या भूमिकेमुळं साताऱ्याच्या राजकारणाची पुढील दिशा कशी असेल हे स्पष्ट होतं आहे.
No comments:
Post a Comment