कराड
चरेगांवकर ब्रदर्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे विकसित केले गेलेल्या विंग येथील श्रीकृष्ण व्हॅली या बहुउद्देशीय प्रकल्पास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी भेट देणार आहेत.
यावेळी प्रकल्पातील सामान्यांना परवडणाऱ्या घरांच्या योजनेतील पूर्ण झालेल्या घरांचा चावी प्रदान कार्यक्रम, लघु उद्योजकांना मालकी तत्वावर द्यावयाच्या कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या टर्फचे उदघाटन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे देखील उपस्थित असणार आहेत.
कोरोना नियमांमुळे मोजक्या निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे. नागरिकांना हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे पाहता येणार आहे.
No comments:
Post a Comment