गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड व पुणे येथून खाजगी वाहनाने येणाऱ्या गणेश भक्तांना विविध टोल नाक्यावर काही अडचण आली आहे का याविषयी प्रवाशांची विचारपूस आज राज्याचे गृह(ग्रामीण)राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. मंत्री असावा तर शंभुराजेंसारखा... लोकांची काळजी घेणारा... अशा प्रतिक्रिया गणेशभक्तांनी यावेळी व्यक्त केल्या
गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आनेवाडी टोलनाक व तासवडे टोलनाक्यावर प्रवाशांची विचारपूस करुन येणाऱ्या अडचणींबाबत जाणून घेतले. यावेळी अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील उपस्थित होते.
यावेळी श्री. देसाई यांनी मुंबईहुन इथपर्यंत येण्यास आपणास टोल नाक्यावर काही अडचण आली का? याबाबत प्रवाशांशी चर्चा करुन अडचणी जाणुन घेतल्या. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. तसेच गणपती सणासाठी येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी टोलनाक्यावरील व्यवस्थापकांना योग्य त्या सुचना केल्या. गणेश भक्तांनी व गणेश मंडळांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत शासनाने घालुन दिलेल्या निर्देशाचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करुन गणेशोत्सवानिमित्त राज्यातील सर्व जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
00000
No comments:
Post a Comment