कराड
येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते ना बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक रणजीत (नाना) पाटील यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शहरातील सर्व गणेशभक्तांना तसेच पालिका कर्मचाऱ्यांना मोफत जेवण व बिसलेरी बॉटल चे वितरण आज येथील घाट परिसरात करण्यात आले
रणजीत पाटील हे शहरातील गणेशभक्तांना मोफत जेवण व बिसलेरी बॉटल चे वितरण प्रत्येक वर्षी नित्यनियमामे करत असतात गणेश भक्तांची सेवा हीच खरी भक्ती या श्रद्धेने ते हे काम करत असतात शहर व परिसरातून कितीही भक्त येवोत त्यांना पोटभर जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून होते
त्यांच्या या कार्याचे कायमच कौतुक होत असते
रणजीत पाटील यानी कोरोना काळात देखील मोठं काम केलं आहे मास्क सॅनिटायझर चे वाटप करण्यासह कित्येक लोकांना ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देत त्यांनी आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली असल्याचे शहराने
पाहिले आहे मधल्या काळात झालेल्या मोठ्या पावसामुळे नुकसान झालेल्या अनेक ठिकाणी त्यांनी स्वतः जाऊन कपडे जेवण पिण्याचे पाणी औषधे अशी मदत पुरवली आहे समाजाचे आपण काही देणे लागतो या निस्वार्थी भावनेने त्यांचे कार्य शहर व तालुक्यात अविरत चालू असते त्यांच्या कार्याची नेहमीच वाहवा होत असते त्यांचा कार्याचा आदर्श इतरांनीदेखील घेतला पाहिजे अशी शहर व परिसरातील लोकांची अपेक्षा आहे
No comments:
Post a Comment