Friday, September 3, 2021

कराड पालिकेची इकोफ्रेंडली गणेशमूर्ती ऑनलाइन कार्यशाळा उत्साहात...

वेध माझा ऑनलाइन
 कराड
 नगरपालिकेकडून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत इको फ्रेंडली गणेशमुर्ती तयार करण्याची ऑनलाईन कार्यशाळा झाली. यावेळी माती तयार करण्याचे व गणपती मुर्ती तयार करण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी इको फ्रेंडली गणेशमूर्ती व माझी वसुंधरा अभियानाची माहिती आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी दिली.ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून विद्यार्थी व नागरिकांना गणेशमूर्ती तयार करण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण यूट्यूब, फेसबुक लाईव्ह करून देण्यात आले. कार्यशाळेत  250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गणेशोत्सव कालावधीत सवार्र्नी पर्यावरण पूरक उत्सव साजरा करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पालिकेकडून इको फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धा घेण्यात येणार असून सर्वोत्तम गणपती बनवणार्‍यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच घरगुती गणेशमुर्तींबाबतही स्पर्धा घेण्यात येणार आहेत. इच्छूकांनी आशिष रोकडे यांचेकडे संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, अभियंता अशोक पवार यांनी सहभागी होवून मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment