Sunday, September 12, 2021

कोयना धरणामध्ये 103.19 TMC पाणीसाठा

आज दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता धरणाची पाणी पातळी 2161 फूट 11 इंच झाली असून धरणामध्ये 103.19 TMC पाणीसाठा झाला आहे.

पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक अपेक्षित आहे.

धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजता धरणाची वक्रद्वारे 1 फुट उचलून सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 10000 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडणेत येणार आहे. तसेच, धरणामधील आवक वाढल्यास सदर विसर्गामध्ये वाढ होणार* असल्याने कोयना नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment