कराड
येथील पालिकेचे बांधकाम सभापती हणमंतराव पवार यांच्या पुढाकाराने आणि येथील पालिकेच्या सहकार्याने येथील दिवटे गल्लीतील चौंडेशवरी मंदिर याठिकाणी मोफत कोविड 19 लसीकरण केंद्र शहरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे यापूर्वीही त्यांनी ही सेवा पालिकेच्या माध्यमातून शहरातील लोकांना दिली होती आता पुन्हा पवार मेहेरबान यांनी ही मोहीम सुरू केली आहे शहर व परिसरातील अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हणमंतराव पवार यांनी केले आहे
नगरसेवक हणमंतराव पवार यांनी शहरात कोरोनाचा कहर चालू असताना रस्त्यावर उतरून लोकांना कोरोना बद्दल प्रबोधन करत मास्क आणि सॅनिटायझर चे शहर व परिसरातून वाटप केले होते स्वतः घरोघरी जाऊन लोकांचे टेम्प्रेचर चेक करत रुग्णांना ऍडमिट करून बेड मिळवून देण्याचे कामही केल्याचे शहराला माहीत आहे कोरोना पेशंटच्या मृत्यूनंतर त्यांनी स्मशानभूमीत जाऊन कोविड योध्याचे मनोधैर्य वाढण्याचे काम देखील वारंवार केले आहे
शहरात पूरपरिस्थिती निर्माण होते तेव्हा तेथील पाटण कॉलनी येथील रहेवाश्यांची गैरसोय होते त्यांना अनेक अडचणी ना सामोरे जावे लागते याचे भान ठेवून काही दिवसापूर्वी झालेल्या मोठ्या पावसाने शहरात काही दिवसांपूर्वी दाणादाण उडवून दिली होती तेव्हा स्वतः बांधकाम सभापती रस्त्यावर आले होते त्यांनी त्या कॉलनीतील लोकांची त्यावेळी सर्वतोपरी सोय करून देण्यासाठी धडपड केली होती व प्रशासनाला योग्य त्या सूचनाही केल्या होत्या प्रसिद्धीपासून चार हात लांब राहणारे पवार मेहेरबान वेळ पडली की जनतेसाठी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य कसे पेलतात याचे उदाहरण यानिमित्ताने लोकांसमोर आले होते
हणमंतराव पवार यांनी नुकतेच येथील दिवटे गल्ली येथील चौडेश्वरी मंदिरं येथे मोफत कोविड 19 लसीकरण सेंटर सुरू केले आहे त्याठिकाणी शहरातील अधिकाधिक लोकांनी येऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यांच्या वतीने करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment