Wednesday, September 22, 2021

कराडात डेंग्यू, चिकन गुनीयाचे पेशंट वाढू लागले...पालिकेकडून काहीच उपाययोजना होताना दिसत नाही...शहरात चर्चा


वेध माझा ऑनलाइन
कराड
शहरात डेंग्यू चिकन गुनीया चे पेशंट वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे शहरातून  औषध फवारणी किंवा इतर उपाययोजना होताना दिसत नाहीत लोकांच्या याबाबत तक्रारी वाढल्या आहेत शहरात दिवसेंदिवस पेशंट वाढत आहेत शहरातील नगरसेवक चिकन गुनियाने बाधीत झाल्याची माहिती मिळत आहे आरोग्य सभापतींनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे दरम्यान शहरात औषध फवारणी व इतर आवश्यक उपाययोजना सुरू आहेत असे वाटेगावकर याविषयी बोलताना म्हणाले आहेत तर पालिकेतील विरोधी लोकशाही गटाचे नेते सौरभ पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना कामकाजाबाबतीत शहरात आरोग्य खात्याच्या नियोजनाचा अभाव असल्याचे सांगितले 

 शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी काही दिवसापूर्वी शहरात डेंग्यू मलेरिया चिकन गुनीया चे रुग्ण वाढत असल्याचे दाखवून देत येथील पालिकेला त्याबाबत काही उपाययोजना करा असे निवेदन देऊन सुचित केले होते मात्र अद्याप  परिणामकारक अशा काहीही उपाययोजना पालिकेकडून झाल्या नाहीत हि वस्तुस्थिती आहे केवळ वेळ मारून नेण्याचं काम सुरू असल्याचे दिसते आहे खरतर पाऊस अधून मधून सुरू आहे त्यामुळे डास हे होणारच हे समजून घेऊन डेंग्यू आणि चिकन गुनीयाबाबत नियोजनबद्ध काम होणे शहराला अपेक्षित होतेमात्र तसे झाले नाही त्यामुळे पेशंट वाढू लागले आहेत ही वस्तूस्थिती आहे 

येथील दवाखान्यातून शहरातील पेशंट ऍडमिट आहेत की आसपासच्या गावातील आहेत हे पाहण्यातच वेळ घालवण्याचे काम येथील पालिकेकडून चालू आहे... कारण शहरातील पेशंट ऍडमिट नाहीत...  बाहेरचे लोक ऍडमिट आहेत... असे कोणी विचारले तर सांगायला बरे पडते...पण शहरातील रुग्णांचे काय...असे विचारले तर त्यांचे उत्तर काहीच नसते...खरतर शहरात धुरंडी फिरवणे,औषध फवारणी करणे पावडर फवारणी किंवा तत्सम घटक वापरून डासांचा बंदोबस्त करणे तसेच शहरातील लोकवस्तीमध्ये पालिकेकडून ठिकठिकाणी डेंग्यू किंवा चिकन गुनीया सदृश्य एरियामध्ये त्याबाबतचा सर्व्हे होणे गरजेचे असताना अद्याप यापैकी काहीच होताना का दिसत नाही हाच मोठा प्रश्न आहे...शहरात ठिकठिकाणी वाढलेली अनावश्यक झाडी काढा त्यामुळे डासांचा त्रास होतोय असे लोकांनी पालिकेत येऊन तक्रार देऊन देखील ती झाडी अद्यापही काढली जात नाही... असे का ?... हेही लोकांना आता कळेना झालंय...

 कामानिमित्त काढून ठेवलेले खड्डे आणि त्यातून झालेला चिखल काही ठिकाणी तसाच आहे तुंबलेले नाले स्वच्छ केलेले अद्यापही दिसत नाहीत या सर्व प्रकारामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे त्याचे काय ? डेंग्यू पासून बचाव करण्यासाठी लोकानी काय करायचे हे सांगणारा व्हीडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर  फिरत होता खरतर  लोकांनी काळजी घेतलीच पाहिजे त्यांबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही पण केवळ लोक अमुक अमुक पाळत नाहीत... अमुक अमुक करत नाहीत... असे बोलून लोकांच्या माथ्यावर सगळा दोष देऊन याविषयाचा तोडगा निघणार नाही,तर आरोग्य विभागाच्या चोख व जबाबदारीच्या कारभाराची जनतेला आता अपेक्षा आहे लोकांनी अमुक करा...तमुक करा...हे सांगणारी कराड पालिका डासांच्याबंदोबस्तासाठी स्वतः काय उपाययोजना करणार आहे... हा देखील खुलासा लोकांना आता हवा आहे...कारण पेशंट वाढत आहेत...सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्तही केल्या आहेत 


आरोग्य खात्याने नियोजनबद्ध काम करणे गरजेचे - नगरसेवक सौरभ पाटील

फाईट द बाईट हा उपक्रम केवळ कागदावरच आहे का ? याबाबतची अमलबजावणी प्रॉपर होताना दिसत नाही...
डासांचा बंदोबस्त करण्यासाठी आरोग्य खात्याने औषध फवारणी तसेच इतर आवश्यक उपाययोजनांची व्यवस्था करण्याची गरज आहे... डेंग्यू किंवा चिकन गुनीयाबाबत शहरातून नियोजनबद्धपणे काम होणे अपेक्षित आहे त्यासाठी प्रत्येक एरियासाठी कामाचे शेड्यूल्ड आखणे गरजेचे आहे... बाधीत परिसराचा सर्व्हे करून त्यानंतर तेथे उपाय करणे सहज शक्यही आहे... मात्र हे सगळं करण्यासाठी इच्छाशक्ती हवी... अशी मार्मिक प्रतिक्रिया विरोधी लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांनी याविषयी बोलताना दिली



No comments:

Post a Comment