कराड
येथील नगरसेवक व विरोधी लोकशाही गटाचे नेते सौरभ पाटील व नगरसेविका सौ अनिता सुहास पवार यांच्या पुढाकाराने आणि येथील पालिकेच्या सहकार्याने आज दिनांक 30 रोजी रूक्मिणी नगर येथे व उद्या शुक्रवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी आदरणीय पी डी पाटील पाणीपुरवठा संस्था वाखान रोड याठिकाणी तर परवा दिनांक 2 रोजी स्विमिंग पूल रूक्मिणी नगर या परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सलग तीन दिवस मोफत कोविड लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे अधिकाधिक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक सौरभ पाटील मित्र परिवार व युवा नेते सुहास पवार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे
शहराच्या हितासाठी कोणतेही निमित्त असो... सौरभ तात्या तिथे असतातच...नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवासाठी अगदी सुरुवातीपासून त्यांनी ग्राउंड वरती राहून शहरातील गणेश मंडळांसाठी केलेले प्रयत्न असोत किंवा झालेल्या मोठ्या पावसाळ्यातील पुरासारख्या आपत्तीप्रसंगी तात्याची तत्परता पहायला मिळाल्याचे प्रसंग असोत...अशावेळी तात्या शहरासाठी पुढे असतातच...पहिल्यांदाच निवडून येऊन देखील जुन्या जाणत्या अनुभवी नगरसेवकाची प्रगल्भता त्यांच्यात आहे... तात्या शहराच्या कोणत्याही प्रभागाची समस्या सोडवण्यासाठी पुढे असतात...नगरसेवक शहराचा असतो केवळ आपल्या वार्डासाठी नव्हे अशी त्यांची वैचारिकता आहे...त्यांच्या एकूणच कामाची पद्धत व शहरासाठी झटण्याची प्रवृत्ती त्यांच्या भविष्यातील उत्तुंग नेतृत्वाची चुणूक नक्कीच दाखवते...
नगरसेविका सौ अनिता पवार यांचे पती व ना बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक युवा नेते सुहास पवार यांचे देखील वार्डात वाखाणन्याजोगे काम आहे कार्यकर्त्याला ताकद कशी द्यायची हे शिकण्यासाठी सुहास पवार यांचे उदाहरण पुरेसे आहे त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे लोकांच्यात मिसळून काम करण्याची त्यांची वृत्ती त्यांना नेतृत्वाची संधी देत असल्याने त्यांच्या कामाचे नेहमीच शहरातून कौतुक होत असते सौरभ तात्यांना त्यांची नेहमीच खंबीर साथ असते नगरसेविका सौ अनिता पवार व पती सुहास पवार यांनी लोकसेवेसाठी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे आज उद्या आणि परवा असे सलग तीन दिवस कोविड लसीकरण मोहीम पालिकेच्या मदतीने याठिकाणी होत असल्याने लोकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन सौरभ तात्या व सुहास पवार मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment